‘सकाळी उठली आणि आईची खोली मला…’, माधुरी दीक्षितची भावुक पोस्ट; तुमच्याही डोळ्यात येईल पाणी

आईच्या निधनानंतर भावुक पोस्ट शेअर करत अभिनेत्री माधुरी दीक्षित हिने व्यक्त केल्या भावना... आईसोबत खास फोटो शेअर करत म्हणाली...

'सकाळी उठली आणि आईची खोली मला...', माधुरी दीक्षितची भावुक पोस्ट; तुमच्याही डोळ्यात येईल पाणी
Follow us
| Updated on: Mar 13, 2023 | 3:21 PM

मुंबई : प्रत्येक मुलीसाठी तिची आई खास मैत्रिण असते. आयुष्यात एक काळ असा येतो, जेव्हा प्रत्येक ठिकाणी आईची गरज भासते. अभिनेत्री माधुरी दीक्षित ही देखील आई स्नेहलता दीक्षित यांच्या फार जवळ होती. पण रविवारी माधुरीच्या आईचं निधन झालं आणि दीक्षित कुटुंबावर दुखाःचा डोंगर कोसळला. आईच्या निधनानंतर माधुरीने भावुक पोस्ट शेअर केली आहे. आईसोबत खास फोटो शेअर करत माधुरी हिने आईबद्दल भावना व्यक्त केल्या आहेत. सध्या सर्वत्र माधुरीने आईसाठी केलेली पोस्ट चर्चेत आहे. माधुरीच्या पोस्टवर अनेक चाहते आणि सेलिब्रिटींनी कमेंट करत श्रद्धांजली वाहिली आहे.

आईचा फोटो पोस्ट करत माधुरी म्हणाली, ‘सकाळी उठली आणि आईची खोली मला रिकामी दिसली. आईने आम्हाला आयुष्य कसं जगायचं हे शिकवलं. तिने अनेक लोकांना खूप काही दिलं. आम्हाला प्रत्येक वेळी आईची खूप आठवण येईल. तिची सकारात्मकता, आशिर्वाद कायमच सोबतच असतील. आमच्या आठवणींमध्ये आई कायम असेल… ओम शांती ओम’ सध्या माधुरीची पोस्ट सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

हे सुद्धा वाचा

माधुरीच्या आई स्नेहलता दीक्षित यांनी वयाच्या ९१ व्या वर्षा राहत्या घरी अखेरचा श्वास घेतला. स्नेहलता यांनी त्यांच्या निवासस्थानीच अखेरचा श्वास घेतला. रविवारी मुंबईतील वरळी इथल्या स्मशानभूमीत दुपारी तीन वाजताच्या सुमारास त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आलं. स्नेहलता दीक्षित यांच्या निधानाची माहिती माधुरीच्या कुटुंबातील जवळची व्यक्ती रिक्कू राकेश यांनी दिली. आईच्या निधनानंतर माधुरी कोलमडली आहे.

माधुरीच्या आईच्याबद्दल सांगायचं झालं तर तिने अनेकदा मुलाखतींमध्येही आईबद्दल अनेक गोष्टी सांगितल्या. आईच्या वाढदिवसाच्या दिवशी देखील माधुरी हिने आईसोबत खास फोटो शेअर करत शुभेच्छा देत म्हणाली, ‘हॅपी बर्थडे आई. आई ही मुलीची सर्वांत चांगली मैत्रीण असते असं म्हटलं जातं आणि हे पूर्णपणे खरं आहे. आजपर्यंत तू माझ्यासाठी जे काही केलंस, मला जी शिकवण दिली ती माझ्या आयुष्यातील सर्वांत मोठी भेट आहे. तुझ्या चांगल्या आरोग्यासाठी आणि आनंदासाठी मी प्रार्थना करते’

माधुरी कायम सोशल मीडियावर सक्रिय असते. इन्स्टाग्रामच्या माध्यमातून माधुरी तिच्या आयुष्यातील महत्त्वाच्या घडामोडी चाहत्यांसोबत शेअर करत असते. सोशल मीडियीवर तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी माधुरी स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत असते.

हवा तर पोलीस बंदोबस्त देऊ,कोणालाही पाठीशी घालणार नाही - अजित पवार
हवा तर पोलीस बंदोबस्त देऊ,कोणालाही पाठीशी घालणार नाही - अजित पवार.
संतोष देशमुख यांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेतो -शरद पवार
संतोष देशमुख यांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेतो -शरद पवार.
'परभणी प्रकरणात खरी वस्तूस्थिती जाणून...,' काय म्हणाले शरद पवार ?
'परभणी प्रकरणात खरी वस्तूस्थिती जाणून...,' काय म्हणाले शरद पवार ?.
मस्साजोग प्रकरणात अख्खं गाव...',पवार भेटीवर काय म्हणाले खासदार सोनावणे
मस्साजोग प्रकरणात अख्खं गाव...',पवार भेटीवर काय म्हणाले खासदार सोनावणे.
संजय राऊत रेकी प्रकरणानंतर मंत्री नितेश राणे म्हणाले की मच्छर...
संजय राऊत रेकी प्रकरणानंतर मंत्री नितेश राणे म्हणाले की मच्छर....
देवेंद्र फडणवीस यांच्या अवतीभोवतीची मंडळी कोण ? संजय राऊत यांचा सवाल
देवेंद्र फडणवीस यांच्या अवतीभोवतीची मंडळी कोण ? संजय राऊत यांचा सवाल.
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर.
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला.
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी.
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं.