Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ponniyin Selvan 1: थिएटरमध्ये व्हिडीओ शूट करणाऱ्यांनी ‘ही’ बातमी वाचाच; मद्रास हायकोर्टाचा मोठा निर्णय

'पोन्नियिन सेल्वन 1'चे निर्माते पोहोचले मद्रास हायकोर्टात

Ponniyin Selvan 1: थिएटरमध्ये व्हिडीओ शूट करणाऱ्यांनी 'ही' बातमी वाचाच; मद्रास हायकोर्टाचा मोठा निर्णय
पोन्नियिन सेल्वन- 1Image Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Sep 30, 2022 | 5:06 PM

मुंबई- मणिरत्नम (Mani Ratnam) यांचा बहुप्रतिक्षित ‘पोन्नियिन सेल्वन- 1’ (Ponniyin Selvan 1) हा चित्रपट आज (30 सप्टेंबर) प्रदर्शित झाला. तब्बल 500 कोटींच्या बजेटमध्ये हा चित्रपट बनवण्यात आला आहे. 1955 मध्ये कल्की कृष्णमूर्ती यांनी लिहिलेल्या ‘पोन्नियिन सेल्वन’ या उपन्यासावर या चित्रपटाची कथा आधारित आहे. भारतातील सर्वांत महागड्या चित्रपटांपैकी ही एक आहे. या चित्रपटाला पहिल्या दिवशी बॉक्स ऑफिसवर प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळतोय. अशातच कलेक्शनवर फटका बसू नये म्हणून निर्मात्यांनी कोर्टात धाव घेतली. पायरेटेड व्हर्जनविरोधात त्यांनी मद्रास कोर्टात धाव घेतली होती. त्यानंतर आता कोर्टाने PS-1 या चित्रपटाच्या पायरेटेड व्हर्जनच्या प्रदर्शनावर बंदी घातली आहे.

अनेकदा चित्रपटांना पायरसीचा फटका बसतो. प्रदर्शनाच्या दिवशीच मोठमोठे चित्रपटांचे पायरेटेड व्हर्जन लीक होतात. त्यामुळे कमाईवर त्याचा वाईट परिणाम होतो. याविरोधात पोन्नियिन सेल्वन- 1 च्या निर्मात्यांनी कोर्टात धाव घेतली होती. मद्रास हायकोर्टाने या चित्रपटाच्या पायरेटेड व्हर्जनच्या रिलीजवर बंदी घातली आहे. तब्बल 2 हजारांहून अधिक वेबसाइट्सवर कोर्टाने बंदी घातली आहे.

हे सुद्धा वाचा

निर्मात्यांनी चाहत्यांनीही विनंती केली की त्यांनी थिएटरमध्ये कोणताही व्हिडीओ शूट करू नये. पीएस- 1 या चित्रपटात चियान विक्रम, कार्ती, जयम रवी, ऐश्वर्या राय बच्चन, त्रिषा कृष्णन, शोभिता धुलिपाला, प्रकाश राज यांच्या भूमिका आहेत. मणिरत्नम यांनी दोन भागांमध्ये हा चित्रपट बनवला आहे. ए. आर. रेहमान यांनी या चित्रपटाला संगीत दिलं आहे.

दिग्दर्शक मणिरत्नम यांचा हा ड्रीम प्रोजेक्ट आहे. पोन्नियिन सेल्वनच्या डिजिटल स्ट्रीमिंगचे अधिकार ॲमेझॉन प्राइम व्हिडीओला मोठ्या किंमतीत विकले गेले आहेत. त्यामुळे प्रदर्शनाच्या आधीच निर्मात्यांचा मोठा नफा झाला आहे. या चित्रपटासाठी हा करार खूप मोठा मानला जात आहे.

संसदेत होणार छावाचं स्क्रीनिंग; पंतप्रधान मोदींसह खासदारांची उपस्थिती
संसदेत होणार छावाचं स्क्रीनिंग; पंतप्रधान मोदींसह खासदारांची उपस्थिती.
अन् एकनाथ शिंदेंनी 'त्या' मजूर कुटुंबाची जबाबदारी उचलली
अन् एकनाथ शिंदेंनी 'त्या' मजूर कुटुंबाची जबाबदारी उचलली.
भर उन्हात बरसल्या अवकाळी पावसाच्या सरी
भर उन्हात बरसल्या अवकाळी पावसाच्या सरी.
मग तुम्ही हजामत करत होते का? जयंत पाटलांनी सरकारला धरलं धारेवर
मग तुम्ही हजामत करत होते का? जयंत पाटलांनी सरकारला धरलं धारेवर.
आदित्य ठाकरे - एकनाथ शिंदे आमनेसामने; एकमेकांना बघणं टाळलं
आदित्य ठाकरे - एकनाथ शिंदे आमनेसामने; एकमेकांना बघणं टाळलं.
ठाकरे अन् शिंदे सर्वपक्षीय बैठकीत आमने-सामने, शिंदे दालनात येताच...
ठाकरे अन् शिंदे सर्वपक्षीय बैठकीत आमने-सामने, शिंदे दालनात येताच....
फक्त शिंदेवरच जोक का? कामराची वादानंतर TV9 कडे पहिली प्रतिक्रिया काय?
फक्त शिंदेवरच जोक का? कामराची वादानंतर TV9 कडे पहिली प्रतिक्रिया काय?.
शिंदेंच्या तमाशातला नाच्या म्हणजे पाटील, मनसेची गुलाबराव पाटलांवर टीका
शिंदेंच्या तमाशातला नाच्या म्हणजे पाटील, मनसेची गुलाबराव पाटलांवर टीका.
कुणाल कामराच्या CDR आणि बँक खात्यांची चौकशी होणार
कुणाल कामराच्या CDR आणि बँक खात्यांची चौकशी होणार.
कामराच्या स्टुडिओची तोडफोड कंबोज म्हणाले, अभी तो सिर्फ स्टूडिओ टूटा है
कामराच्या स्टुडिओची तोडफोड कंबोज म्हणाले, अभी तो सिर्फ स्टूडिओ टूटा है.