Mahadev Betting App: 200 कोटींचे लग्न, 35 कोटींची पार्टी… ईडीच्या रडारवर प्रसिद्ध सेलिब्रिटी, चौकशीत विचारले जाणार ‘हे’ प्रश्न

Mahadev Betting App: 200 कोटींचे लग्न, 35 कोटींची पार्टी... बॉलिवूडचे प्रसिद्ध सेलिब्रिटी ईडीच्या रडारवर, इतका पैसा आहे तरी कुठे? चौकशीत सेलिब्रिटींना विचारले जाणार 'हे' प्रश्न... संबंधीत प्रकरणी ईडी करत आहे कसून चौकशी..

Mahadev Betting App: 200 कोटींचे लग्न, 35 कोटींची पार्टी... ईडीच्या रडारवर प्रसिद्ध सेलिब्रिटी, चौकशीत विचारले जाणार 'हे' प्रश्न
Follow us
| Updated on: Oct 07, 2023 | 8:13 AM

मुंबई | 07 सप्टेंबर 2023 | महादेव बेटिंग ॲप संबंधीत मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ईडी कसून चौकशी करत. याप्रकरणी अनेक धक्कादायक खुलासे समोर येत आहे. आता संबंधीत प्रकरण फक्त फेब्रुवारी 2023 मध्ये दुबईमध्ये महादेव ॲप प्रमोटर सौरभ चंद्राकर याच्या 200 कोटी रुपयांच्या लग्नापुरते मर्यादित राहिलेलं नाही. तपासादरम्यान ईडीच्या हाती अनेक फोटो आणि व्हिडीओ लागले आहे. ज्यामुळे प्रकरण अधिक कठीण झालं आहे. तपासादरम्यान गेल्या वर्षी म्हणजे सप्टेंबर 2022 मध्ये दुबईतील फेअरमॉन्ट हॉटेलमध्ये आयोजित केलेल्या सक्सेस पार्टीचाही समावेश आहे.

महादेव बेटिंग ॲप मिळत असलेल्या यशाचा आनंद साजरा करण्यासाठी पार्टीचं आयोजन करण्यात आलं होतं. या पार्टीसाठी एक दोन कोटी नाही तर, तब्बल ३५ कोटी रुपये खर्च करण्यात आले होते. धक्कादायक गोष्ट म्हणजे पार्टीमध्ये अनेक सेलिब्रिटी देखील उपस्थित होतेय. जवळपास ३० पेक्षा अधिक सेलिब्रिटी पाट्रीमध्ये उपस्थित होते. ज्यामध्ये अनेक मोठी नावं समोर आली आहेत.

10 हून अधिक ऑनलाइन बेटिंग ॲपप्सच्या तपासात आहे ईडी

ईडीच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आतापर्यंतच्या तपासात एजन्सीला असेही आढळून आले आहे की महादेव ॲपची वार्षिक उलाढाल अंदाजे 5 हजार कोटी रुपये होती. यामध्ये त्यांचा नफा अंदाजे 40 टक्के होता. संबंधीत रक्कम फार मोठी आहे.

सेलिब्रिटी आणि क्रिकेटपटूंची होणार चौकशी

या सर्व ॲपसाठी, अनेक सेलिब्रिटी आणि काही क्रिकेट खेळाडूंनी सोशल मीडिया ॲप्स आणि टीव्हीसाठी प्रमोशन देखील केलं. यासाठी सेलिब्रिटींनी रोख रक्कम घेतल्याची संशय ईडीला आहे. सत्य नक्की काय आहे जाणून घेण्यासाठी सेलिब्रिटींची चौकशी होणार आहे. या प्रकरणामुळे सर्वत्र खळबळ माजली आहे.

रणबीर कपूर याची होणार चौकशी

ईडीच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ईडीली रणबीर कपूर याची फेब्रुवारी 2023 मध्ये दुबई येथे झालेल्या लग्नातील परफॉर्मेंसनिमित्त नाही तर, फेअरप्ले नावाच्या ऑनलाइन बेटिंग ॲपसाठी केलेल्या व्यावसायिक जाहिरातीसंदर्भात चौकशी करायची आहे.

सेलिब्रिटींना विचारण्यात येणार असे प्रश्न

रणबीर कपूर, श्रद्धा कपूर, हिना खान, हुमा कुरेशी यांसारख्या अनेक सेलिब्रिटींनी फेअरप्ले अॅपसाठी जाहिराती केल्या होत्या. या जाहिरातीसाठी त्यांनी कोणत्या कंपनीशी करार केला होता? त्यांची फी कोणत्या पद्धतीने दिली गेली? रोख की चेक? सौरभ चंद्राकर, रवी उप्पल किंवा ॲप संबंधित व्यक्तींसोबत ओळख कशी झाली? हे सर्व प्रश्न ईडी सेलिब्रिटींना विचारणार असल्याची चर्चा रंगली आहे.

Non Stop LIVE Update
बटेंगे तो कटेंगेच्या वक्तव्यावरून पंकजा मुंडेंचा यू-टर्न? म्हणाल्या...
बटेंगे तो कटेंगेच्या वक्तव्यावरून पंकजा मुंडेंचा यू-टर्न? म्हणाल्या....
'पंकजाताईंनी मोठ मन केल म्हणून मी...', सभेतून धनंजय मुंडे काय म्हणाले?
'पंकजाताईंनी मोठ मन केल म्हणून मी...', सभेतून धनंजय मुंडे काय म्हणाले?.
चित्रपटात काम केलं असत.., सदा सरवणकरांच्या मुलीचा अमित ठाकरेंना टोला
चित्रपटात काम केलं असत.., सदा सरवणकरांच्या मुलीचा अमित ठाकरेंना टोला.
'रामदास कदम सरपटणारा साप, निवडणुकीनंतर...',ठाकरे गटाच्या नेत्याची टीका
'रामदास कदम सरपटणारा साप, निवडणुकीनंतर...',ठाकरे गटाच्या नेत्याची टीका.
'राणे पिता-पुत्र हे गाडग्यासारखे..', ठाकरे गटाच्या बड्या नेत्याची टीका
'राणे पिता-पुत्र हे गाडग्यासारखे..', ठाकरे गटाच्या बड्या नेत्याची टीका.
भाजपच्या किती जागा येणार?,कोण होणार CM?; विनोद तावडेंनी थेट सांगितलं..
भाजपच्या किती जागा येणार?,कोण होणार CM?; विनोद तावडेंनी थेट सांगितलं...
डोंबिवलीत भाजपचं कार्यालय फोडल, कोणी केल्ला हल्ला? घटना CCTV मध्ये कैद
डोंबिवलीत भाजपचं कार्यालय फोडल, कोणी केल्ला हल्ला? घटना CCTV मध्ये कैद.
एकनाथ शिंदेंच्या आमदारानं पैसे वाटले? विधानसभेच्या तोंडावर अडचणी वाढल्
एकनाथ शिंदेंच्या आमदारानं पैसे वाटले? विधानसभेच्या तोंडावर अडचणी वाढल्.
पंकजा मुंडेंकडून भाऊ धनंजय मुंडेंना खास गिफ्ट, सभेतून काय केली घोषणा?
पंकजा मुंडेंकडून भाऊ धनंजय मुंडेंना खास गिफ्ट, सभेतून काय केली घोषणा?.
पवार कुटुंबातील कटुता भविष्यात दूर होणार? अजित पवारांचं मोठं वक्तव्य
पवार कुटुंबातील कटुता भविष्यात दूर होणार? अजित पवारांचं मोठं वक्तव्य.