Mahadev betting case: रणबीर कपूर नंतर आता या अभिनेत्रीला ईडीचा समन्स

महादेव बेटिंग अॅप प्रकरणी आणखी काही बॉलिवूड कलाकारांना ईडीने समन्स बजावले आहे. आता या प्रकरणात आणखी एका मोठ्या अभिनेत्रीचे नाव देखील पुढे आले आहे. ईडीनेही समन्स बजावत या कलाकारांना चौकशीसाठी बोलावले आहे. त्यामुळे बॉलिवूड पुन्हा एकदा चर्चेत आले आहे.

Mahadev betting case: रणबीर कपूर नंतर आता या अभिनेत्रीला ईडीचा समन्स
Follow us
| Updated on: Oct 06, 2023 | 4:14 PM

ED Action on Mahadev App : महादेव ऑनलाइन सट्टा अॅप प्रकरणातील अंमलबजावणी संचालनालयाचा (ED) तपास आता अभिनेत्री श्रद्धा कपूरपर्यंत पोहोचला आहे. तपास यंत्रणेने तिला समन्स बजावले असून तिला देखील रायपूर येथील ईडी कार्यालयात चौकशीसाठी बोलावण्यात आले आहे. याआधी ईडीने रणबीर कपूरलाही समन्स पाठवले आहे. रणबीरने चौकशीसाठी हजर राहण्यासाठी दोन आठवड्यांचा वेळ मागितला आहे.

महादेव अॅपच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर काळ्या पैशाचे व्यवहार झाल्याचा आरोप आहे. यामध्ये हवाला व्यापाऱ्यांचा सहभाग आहे. महादेव अॅपने केलेल्या मनी लाँड्रिंगची ईडी चौकशी करत आहे. कॉमेडियन कपिल शर्मा, अभिनेत्री हुमा कुरेशी आणि हिना खान यांनाही ईडीने वेगवेगळ्या तारखांना चौकशीसाठी बोलावले आहे. या प्रकरणी आरोपी म्हणून या स्टार्सचे नाव देण्यात आलेले नाही.   अॅपच्या प्रवर्तकांना ईडीकडून त्यांना पेमेंट करण्याच्या पद्धतीबद्दल चौकशी केली जाणार आहे.

महादेव अॅपच्या प्रचारासाठी कलाकारांना मिळाली रोख रक्कम

कलाकारांनी महादेव अॅपचे प्रमोशन केल्याची माहिती समोर आली आहे. यासाठी त्यांना रोख रक्कम देण्यात आली. महादेव अॅपच्या प्रचारासाठी रणबीर कपूरने अनेक जाहिराती केल्याचा दावा एजन्सीने केला आहे. यातून त्याला मोठी रक्कम मिळाली. गुन्ह्यातून मिळालेल्या पैशातून हा पैसा उभा करण्यात आला होता.

200 कोटींची कमाई

महादेव अॅप हे एक व्यापक सिंडिकेट असल्याचा आरोप ईडीने केला आहे. हे निनावी बँक खात्यांद्वारे मनी लॉन्ड्रिंग आणि बेकायदेशीर बेटिंग वेबसाइटसाठी ऑनलाइन प्लॅटफॉर्म प्रदान करते. नवीन ऑनलाइन गेमिंग नियमांनुसार, सट्टेबाजीवर बंदी घालण्यात आली आहे. महादेव अॅप कंपनीचे प्रवर्तक सौरभ चंद्राकर आणि रवी उप्पल हे भिलाई, छत्तीसगड येथील आहेत. ते त्यांचा काळा धंदा दुबईतून चालवतात. तपास यंत्रणेने असा दावा केला आहे की ते असे चार-पाच अॅप्स ऑपरेट करतात आणि दररोज सुमारे 200 कोटी रुपये कमावतात.

छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.