भारताचं नागरिकत्व मिळाल्यानंतर अक्षय कुमारने बजावला मतदानाचा हक्क, ‘उमेदवाराला मतदान करताना…’

Maharashtra Lok Sabha Election 2024 : मुंबईतील सहा जागांसह राज्यातील 13 जागांवर मतदान होत आहे. मतदानासाठी आता सेलिब्रिटी देखील घराबाहेर पडत आहेत. अभिनेता अक्षय कुमार याने देखील भारताचं नागरिकत्व मिळाल्यानंतर पहिल्यांदा मतदानाचा हक्क बजावला...

भारताचं नागरिकत्व मिळाल्यानंतर अक्षय कुमारने बजावला मतदानाचा हक्क, 'उमेदवाराला मतदान करताना...'
Follow us
| Updated on: May 20, 2024 | 8:05 AM

लोकसभा निवडणुकीसाठी पाचव्या टप्प्यातील मतदान आज होत आहे. देशभरात 49 जागांवर मतदान होणार आहे. महाराष्ट्रात मतदानाचा पाचवा आणि शेवटचा टप्पा आज असल्यामुळे दिग्गज नेत्यांची प्राण प्रतिष्ठा पणाला लागली आहे. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मुंबईतील सहा जागांसह राज्यातील 13 जागांवर मतदान होत आहे. त्यामुळे मतदानासाठी आता सेलिब्रिटी देखील घराबाहेर पडत आहेत. अभिनेता अक्षय कुमार आणि अभिनेत्री जान्हवी कपूर यांनी सकाळी सात वाजता मदतान केलं. शिवाय इतरांनी देखील मतदान करावं असं आवाहन सेलिब्रिटी करताना दिसत आहे.

मतदानाचा हक्क बजावल्यानंतर अक्षय कुमार म्हणाला, ‘माझा भारत विकसित आणि मजबूत राहावा अशी माझी मनापासून इच्छा आहे. हीच एक गोष्ट लक्षात ठेवून मी मतदान केलं आहे. अशाच प्रमाणे पूर्ण भारताने मदतानाचा हक्क बजावला पाहिजे. तुम्हाला जो उमेदवार योग्य वाटत आहे, त्या उमेदवाराला मतदान करा. यावेळी मोठ्याप्रमाणे लोकं मतदानासाठी घराबाहेर निघतील. मी सकाळी सात वाजता मतदान केलं आहे. मी मतदान केंद्रावर पोहोचलो तेव्हा जवळपास 500 लोकं होती.’

भारताचं नागरिकत्व मिळाल्यानंतर अक्षय कुमार याने पहिल्यांदा मतदान केलं आहे. यावर देखील अभिनेत्याने भावना व्यक्त केल्या आहेत. मला आनंद होत आहे… असं अक्षय कुमार म्हणाला. आज मुंबईत देखील मतदान होत असल्यामुळे अनेक मतदान केंद्रांवर सेलिब्रिटी दिसतील. आता अक्षय कुमार आणि अभिनेत्री जान्हवी कपूर यांना मतदान केंद्राबाहेर स्पॉट करण्यात आलं…

मुंबईत मतदान असल्यामुळे अनेक सेलिब्रिटी मतदाना हक्क बजावण्यासाठी बाहेर पडती. अभिनेता फरहान अख्तर, अनिल अंबानी यांनी देखील मतदानाचा हक्क बजावला आहे.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.