‘नेता म्हणून माझी निवड केली का?’, मतदानाचा हक्क बजावल्यानंतर असं का म्हणाला संजय दत्त?
Maharashtra Lok sabha election 2024 : मतदानाचा हक्क बजावल्यानंतर संजय दत्त याचं मोठं वक्तव्य, 'नेता म्हणून माझी निवड केली का?', असं का म्हणाला संजूबाबा? सध्या सर्वत्र अभिनेत्याच्या वक्तव्याची चर्चा...
Maharashtra Lok sabha election 2024 : देशात सध्या निवडणुकीचं वातावरण आहे. मुंबईत देखील मतदान होत असल्यामुळे अनेक सेलिब्रिटी त्यांचा मतदानाचा हक्क बजावताना दिसत आहे. बॉलीवूड सुपरस्टार संजय दत्त याने देखील मुंबईत लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यात मतदान केलं आहे. वांद्रे पश्चिम येथील पाली हिल परिसरात असलेल्या मतदान केंद्रावर संजय दत्त याने मदतानाचा हक्क बजावला आहे. शिवाय अभिनेत्याने सर्वांना घराबाहेर मतदान करण्याचं आवाहन केलं आहे.
मतदानाचा हक्क बजावल्यानंतर अभिनेता म्हणाला, ‘तुम्ही मतदान केलं पाहिजे… आपण फक्त एवढंच बोलू शकतो. पुढे अभिनेत्याला कोणत्या विषयांवर तुला बोलायचं आहे? असा प्रश्न विचारण्यात आला. यावर संजूबाबा विनोदी अंदाजात म्हणाला, ‘तुम्ही नेता म्हणून माझी निवड केली आहे का? नाही ना… त्यामुळे कोणतेही विषय नाही. आपण फक्त काम करायचं. चांगले सिनेमे बनवायचे आहेत…’ सकाळपासून अनेक सेलिब्रिटींनी मतदान करत दिसत आहेत.
सेलिब्रिटी चाहत्यांना देखील मतदानाचा हक्क बजावण्यासाठी सांगत आहेत. तर महानायक अमिताभ बच्चन यांनी देखील हटके अंदाजात मतदान करण्यास सांगितलं आहे. व्हिडीओ पोस्ट करत अमिताभ बच्चन यांनी ‘मुंबईत मदतानाचा दिवस आहे. तुमची जबाबदारी पार पाडा…’ असं कॅप्शन लिहिलं आहे.
T 5016 (ii) – Tomorrow is your day for Vote Mumbai /Maharashtra …. Exercise your right .. pic.twitter.com/GyG801deRk
— Amitabh Bachchan (@SrBachchan) May 19, 2024
अक्षय कुमार याने देखील केलं मतदान
अक्षय कुमार म्हणाला, ‘माझा भारत विकसित आणि मजबूत राहावा अशी माझी मनापासून इच्छा आहे. हीच एक गोष्ट लक्षात ठेवून मी मतदान केलं आहे. अशाच प्रमाणे पूर्ण भारताने मदतानाचा हक्क बजावला पाहिजे. तुम्हाला जो उमेदवार योग्य वाटत आहे, त्या उमेदवाराला मतदान करा.’ भारताचं नागरिकत्व मिळाल्यानंतर अक्षय कुमार याने पहिल्यांदा मतदान केलं आहे.
सांगायचं झाल तर, सध्या सर्वत्र निवडणुकीचं वातावरण आहे सोमवारी पाचव्या टप्प्यातील निवडणूक पार पडत आहे. देशभरात 49 जागांवर मतदान होणार आहे. महाराष्ट्रात मतदानाचा पाचवा आणि शेवटचा टप्पा आज असल्यामुळे दिग्गज नेत्यांची प्राण प्रतिष्ठा पणाला लागली आहे.