Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

दिवसभर पाहता येणार ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’; खळखळून हसत करा वर्षाचा शेवट

महाराष्ट्राची हास्यजत्रा हा कार्यक्रम गेल्या चार वर्षांपासून प्रेक्षकांचं अविरत मनोरंजन करतोय. आता 2023 या वर्षाचा शेवटसुद्धा हास्याने करण्यासाठी मराठी टेलिव्हिजन विश्वात पहिल्यांदाच हा क्रार्यक्रम 24 तास दाखवण्यात येणार आहे. 31 डिसेंबर रोजी दिवसभर हे कलाकार प्रेक्षकांना खळखळून हसवणार आहेत.

दिवसभर पाहता येणार 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'; खळखळून हसत करा वर्षाचा शेवट
Maharashtrachi Hasya Jatra Image Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Dec 30, 2023 | 12:29 PM

मुंबई : 30 डिसेंबर 2023 | संपूर्ण महाराष्ट्राला खळखळून हसवणारी हास्यमालिका म्हणजेच ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’. घराघरात हास्याची कारंजी फुलवणारी ही जत्रा ‘सहकुटुंब हसू या’ म्हणत प्रत्येक कुटुंबाला बांधून ठेवण्याचं काम अविरत करत आली आहे. या वर्षात ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमाने प्रेक्षकांचं भरपूर मनोरंजन केलं. आता वर्षाअखेरीस अधिकाअधिक मनोरंजन करता यावं यासाठी 31 डिसेंबर रोजी संपूर्ण दिवस प्रेक्षकांना आवडलेली या वर्षभरातली प्रहसने दिवसभर दाखवली जाणार आहेत. रात्री 9 वाजता हास्याची नॉनस्टॉप पार्टी ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’द्वारे सोनी मराठीवर पहायला मिळणार आहे.

या वर्षभरातील तणावपूर्ण जीवनशैलीतून काही घटका निर्मळ आनंद घेता यावा म्हणून ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ वर्षाअखेरीस संपूर्ण दिवस प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या मालिकेच्या चाहत्यांसाठी ही गोष्ट आनंद द्विगुणित करणारी आणि औत्सुक्याची असणार आहे. या जत्रेतली मंडळी प्रेक्षकांचे नवीन वर्ष हसरे करण्यासाठी आता सज्ज झाली आहेत. 31 डिसेंबर रोजी संपूर्ण दिवस ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ आणि रात्री 9 वाजता हास्याची नॉनस्टॉप पार्टी ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ सोनी मराठी वाहिनीवर प्रसारित होणार आहे.

हे सुद्धा वाचा

मराठी टेलिव्हिजनच्या इतिहासात पहिल्यांदात एखादा कॉमेडी शो हा 24 तास नॉनस्टॉप दाखवण्यात येणार आहे. या खास दिवशी 500 पेक्षा जास्त एपिसोड्स दाखवण्यात येणार आहेत. सकाळी 7 वाजल्यापासून हा शो सुरू होणार आहे. तो रात्री 9 पर्यंत प्रेक्षकांचं मनोरंजन करणार आहे. गौरव मोरे, ओमकार भोजने, समीर चौघुले यांसारखे कलाकार आपल्या जबरदस्त कॉमेडी टायमिंगने प्रेक्षकांना खळखळून हसवणार आहेत.

पहलगाममधील मृत कौस्तुभ गनबोटेच्या काकींना अश्रु अनावर
पहलगाममधील मृत कौस्तुभ गनबोटेच्या काकींना अश्रु अनावर.
भारतीय जवानांकडून 2 दहशतवाद्यांचा खात्मा; मोठा शस्त्रसाठा जप्त
भारतीय जवानांकडून 2 दहशतवाद्यांचा खात्मा; मोठा शस्त्रसाठा जप्त.
हल्ल्यानंतर काय आहे पहलगामची परिस्थिती?
हल्ल्यानंतर काय आहे पहलगामची परिस्थिती?.
पहलगाम घटनेनंतर काही तासातच बारामुल्लातही दहशतवादी कारवाया
पहलगाम घटनेनंतर काही तासातच बारामुल्लातही दहशतवादी कारवाया.
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्याचा पहिला फोटो
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्याचा पहिला फोटो.
डोंबिवलीवर शोककळा; संजय लेले यांचं कुटुंब काश्मीरकडे रवाना
डोंबिवलीवर शोककळा; संजय लेले यांचं कुटुंब काश्मीरकडे रवाना.
नागपूरचे तिलक रूपचंदानी पहलगाममध्ये फसले; हल्ल्यात पत्नी जखमी
नागपूरचे तिलक रूपचंदानी पहलगाममध्ये फसले; हल्ल्यात पत्नी जखमी.
कश्मीरच्या पहलगाम येथे सर्वात मोठा अतिरेकी हल्ला,२७ पर्यटक ठार
कश्मीरच्या पहलगाम येथे सर्वात मोठा अतिरेकी हल्ला,२७ पर्यटक ठार.
शेलार ठाकरेंना 'लँड माफिया' म्हणताच पेडणेकरांकडून 'झोलर'ची आठवण...
शेलार ठाकरेंना 'लँड माफिया' म्हणताच पेडणेकरांकडून 'झोलर'ची आठवण....
युगेंद्रला साथ द्या, नातवासाठी शरद पवारांची साद म्हणाले, इथून पुढेही..
युगेंद्रला साथ द्या, नातवासाठी शरद पवारांची साद म्हणाले, इथून पुढेही...