Mahesh Babu: बॉलिवूडला मी परवडणार नाही म्हणणाऱ्या महेश बाबूने घेतली बिल गेट्सची भेट; पहा फोटो

महेश बाबूने या भेटीचा फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. बिल गेट्स अत्यंत नम्र आणि प्रेरणादायी असल्याचं त्याने म्हटलंय. मे महिन्यापासून महेश बाबू त्याच्या कुटुंबीयांसोबत विविध ठिकाणी फिरायला जात आहे.

Mahesh Babu: बॉलिवूडला मी परवडणार नाही म्हणणाऱ्या महेश बाबूने घेतली बिल गेट्सची भेट; पहा फोटो
Mahesh Babu and Namrata Shirodkar meet Bill GatesImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Jun 29, 2022 | 12:23 PM

तेलुगू चित्रपटसृष्टीतील सुपरस्टार महेश बाबू (Mahesh Babu) सध्या पत्नी नम्रता शिरोडकरसोबत (Namrata Shirodkar) न्यूयॉर्कमध्ये सुट्ट्यांचा आनंद घेत आहे. नुकतंच या दोघांनी मायक्रोसॉफ्टचे सहसंस्थापक बिल गेट्स (Bill Gates) यांची भेटली. महेश बाबूने या भेटीचा फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. बिल गेट्स अत्यंत नम्र आणि प्रेरणादायी असल्याचं त्याने म्हटलंय. मे महिन्यापासून महेश बाबू त्याच्या कुटुंबीयांसोबत विविध ठिकाणी फिरायला जात आहे. मुलगी सितारा आणि मुलगा गौतम यांच्यासोबत ते आधी युरोपला फिरत होते. नंतर अमेरिकेला गेले. आता न्यूयॉर्कमधील एका रेस्तराँमध्ये महेश आणि नम्रताची भेट बिल गेट्स यांच्याशी झाली. यावेळी दोघांनी त्यांच्यासोबतच्या फोटोची संधी सोडली नाही.

‘बिल गेट्स यांना भेटून आनंद झाला. या जगाने पाहिलेल्या महान दूरदर्शी व्यक्तींपैकी ते एक आहेत आणि तरीही ते सर्वात नम्र आहे. खरोखर एक प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व,’ असं महेशने लिहिलं. याआधी महेशने सोशल मीडियावर नम्रतासोबतचेही काही रोमँटिक फोटो पोस्ट केले.

हे सुद्धा वाचा

पहा फोटो-

काही दिवसांपूर्वी महेश बाबू त्याच्या बॉलिवूड पदार्पणाविषयीच्या वक्तव्यामुळे चर्चेत आला होता. “बॉलिवूडला मी परवडू शकणार नाही”, असं त्याने म्हटलं होतं आणि त्याचं हे विधान चांगलंच चर्चेत आलं होतं. बॉलिवूडला कमी लेखल्याबद्दल त्याच्यावर टीकासुद्धा झाली होती. “हिंदी फिल्म इंडस्ट्रीला मी परवडू शकणार नाही, त्यामुळे हिंदी चित्रपटांवर मी माझा वेळ का वाया घालवू”, असं तो म्हणाला होता. महेशचा ‘सरकारू वारी पाटा’ हा चित्रपट काही दिवसांपूर्वीच प्रदर्शित जाला. या चित्रपटाने जगभरात 200 कोटींहून अधिकचा गल्ला जमवला आहे. यामध्ये त्याने किर्ती सुरेशसोबत भूमिका साकारली होती. किर्ती आणि महेशने पहिल्यांदाच एकत्र काम केलं.

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.