महेश बाबूच्या भावाचे पत्नीवर गंभीर आरोप; म्हणाला, “तिनेच दिली जीवे मारण्याची सुपारी”

रम्या ही नरेशची तिसरी पत्नी आहे. जवळपास दहा वर्षांपूर्वी या दोघांनी लग्न केलं होतं आणि त्यांना एक मुलगासुद्धा आहे. जुलैमध्ये रम्याने नरेशवर आरोप केले होते की त्याने पवित्राशी लग्न केलंय. एका हॉटेलच्या रुममध्ये या दोघांना तिने रंगेहाथ पकडलं होतं.

महेश बाबूच्या भावाचे पत्नीवर गंभीर आरोप; म्हणाला,  तिनेच दिली जीवे मारण्याची सुपारी
महेश बाबूच्या भावाचा पत्नीवर जीवे मारण्याची सुपारी दिल्याचा आरोप; अभिनेत्रीसोबतच्या किसिंग व्हिडीओनंतर वाढला वाद Image Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Jan 29, 2023 | 4:01 PM

हैदराबाद: साऊथ सुपरस्टार महेश बाबूचा सावत्र भाऊ आणि तेलुगू अभिनेता विजय कृष्ण नरेश ऊर्फ नरेश रघुपती सध्या त्याच्या चौथ्या लग्नामुळे चर्चेत आहे. नवीन वर्षाच्या सुरुवातीला नरेशने गर्लफ्रेंड आणि साऊथ अभिनेत्री पवित्रा लोकेश हिच्याशी लग्न करण्याचं जाहीर केलं होतं. आता नरेशने त्याची तिसरी पत्नी रम्या रघुपतीवर गंभीर आरोप केले आहेत. रम्याने मला जीवे मारण्यासाठी सुपारी दिली आहे, असा आरोप त्यांनी केला. शनिवारी हैदराबादमध्ये त्यांनी याविषयी पत्रकार परिषद घेतली आणि पोलिसांना सुरक्षा पुरविण्याची विनंती केली. नरेशने पवित्राशी लग्न केल्याचं जाहीर केल्यापासून या दोघांमध्ये वाद सुरू आहे.

रम्या ही नरेशची तिसरी पत्नी आहे. जवळपास दहा वर्षांपूर्वी या दोघांनी लग्न केलं होतं आणि त्यांना एक मुलगासुद्धा आहे. जुलैमध्ये रम्याने नरेशवर आरोप केले होते की त्याने पवित्राशी लग्न केलंय. एका हॉटेलच्या रुममध्ये या दोघांना तिने रंगेहाथ पकडलं होतं. नरेशने सुरुवातीला पवित्राला डेट करत असल्याचं वृत्त नाकारलं होतं. मात्र नंतर त्याने अचानक सोशल मीडियावर तिच्यासोबतचा लिपलॉक करतानाचा व्हिडीओ पोस्ट करत लग्न करत असल्याचं जाहीर केलं. दुसरीकडे रम्या आणि नरेश यांचा घटस्फोट अद्याप झालेला नाही.

हे सुद्धा वाचा

शनिवारी नरेशने हैदराबादमध्ये पत्रकार परिषद घेतली. रम्याचे इतर अफेअर्स असल्यामुळेच तिला सोडण्याचा निर्णय घेतला असं त्याने या पत्रकार परिषदेत सांगितलं. गेल्या काही काळापासून हे दोघं एकत्र राहत नाहीत. “आपल्या राजकीय पार्श्वभूमीचा फायदा घेत रम्या मला जीवे मारण्याची धमकी देत आहे. इतकंच नव्हे तर मला मारण्यासाठी तिने कॉन्ट्रॅक्ट किलर्सना 10 कोटींची सुपारी दिल्याचंही मला समजलंय,” असा आरोप त्याने पत्नीवर केला.

रम्याविरोधात कोर्टात दाद मागणार असून मला पोलिसांनी सुरक्षा पुरवावी, अशी मागणी नरेशने या पत्रकार परिषदेत केली. या आरोपांवर रम्याने अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. नरेशने याआधी दोन वेळा लग्न केलं होतं. तर पवित्राने 2007 मध्ये सुचेंद्र प्रसादशी लग्न केलं होतं. मात्र हे दोघं आता विभक्त झाले आहेत.

एका जुन्या मुलाखतीत रम्याने नरेशच्या अफेअर्सविषयी मौन सोडलं होतं. “मी जेव्हा त्याला विचारायची, तेव्हा तो माझे पाय पकडून माफी मागायचा. माझ्या सासूलाही याबद्दल माहिती होती आणि त्यांनी नरेशला इशारा दिला होता. त्याला प्रॉपर्टीतून बेदखल करण्याचा इशारा त्यांनी दिला होता”, असं ती म्हणाली होती.

नरेश बाबू हा तेलुगू चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता आहे. बालकलाकार म्हणून त्याने करिअरची सुरुवात केली होती. मात्र नरेश नेहमीच त्याच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत राहिला.

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.