Mahesh Babu | कोणत्याच स्टारकिडला जमलं नाही ते महेश बाबूच्या लेकीनं केलं; पहिला पगार मिळताच..

आपल्या आईवडिलांच्या पावलांवर पाऊल ठेवत सितारासुद्धा चित्रपटसृष्टीत काम करणार असल्याचं म्हटलं जात आहे. तर दुसरीकडे महेश बाबू आणि नम्रता यांचा मुलगा गौतमसुद्धा भविष्यात चित्रपटसृष्टीत पदार्पण करू शकतो. मात्र सध्या तो त्याच्या उच्च शिक्षणात व्यग्र असल्याचं नम्रताने या मुलाखतीत स्पष्ट केलं.

Mahesh Babu | कोणत्याच स्टारकिडला जमलं नाही ते महेश बाबूच्या लेकीनं केलं; पहिला पगार मिळताच..
mahesh babu with daughterImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Jul 16, 2023 | 10:25 PM

हैदराबाद | 16 जुलै 2023 : स्टारकिड म्हटलं की नेटकरी अनेकदा नाक मुरडताना दिसतात. कारण बॉलिवूड इंडस्ट्रीतील काही स्टारकिड्सचं वागणं, इतरांच्या तुलनेत त्यांना मिळणाऱ्या संधी हे अनेकांना पटत नाही. म्हणूनच इंडस्ट्रीतील घराणेशाहीचा वाद खूप मोठा आहे. मात्र सध्या इंडस्ट्रीत अशी एक स्टारकिड आहे जी इतरांपेक्षा खूप वेगळी ठरतेय. या स्टारकिडचं नाव आहे सितारा घट्टमनेनी. तेलुगू सुपरस्टार महेश बाबू आणि नम्रता शिरोडकर यांची ही मुलगी आहे. काही दिवसांपूर्वीच ती टाइम्स स्क्वेअरवर झळकल्याने सोशल मीडियावर चर्चेत आली होती. आता सिताराने तिच्या आयुष्यातील पहिली कमाई दान केल्याची माहिती समोर येते आहे.

एका ज्वेलरी ब्रँडसाठी ‘प्रिन्सेस’ नावाच्या लघुपटाचा प्रीव्ह्यू लाँच करण्यासोबतच सिताराने नुकतंच आई नम्रतासोबत हैदराबादमधील एका फाइव्ह स्टार हॉटेलमध्ये तिच्या नावाच्या कलेक्शनसाठी लूक बुक लाँच केला आहे. यावेळी तिने पत्रकारांशी संवाद साधला. तिला चित्रपट पहायला आवडतात आणि त्यात अभिनय करण्याचा खूप रस आहे असं तिने सांगितलं. अभिनयाचा हा आत्मविश्वास आईकडून मिळाल्याचं ती म्हणाली. न्यूयॉर्कमधील टाइम्स स्क्वेअरमध्ये तिच्या नावाचं ज्वेलरी कलेक्शन लाँच होताना पाहून वडील खूप आनंदी झाल्याचंही तिने यावेळी सांगितलं. आपल्या लाडक्या लेकीच्या जाहिरातीचा व्हिडीओ जेव्हा महेश बाबूने पाहिलं, तेव्हा तो भावूक झाला होता.

हे सुद्धा वाचा

आपल्या आईवडिलांच्या पावलांवर पाऊल ठेवत सितारासुद्धा चित्रपटसृष्टीत काम करणार असल्याचं म्हटलं जात आहे. तर दुसरीकडे महेश बाबू आणि नम्रता यांचा मुलगा गौतमसुद्धा भविष्यात चित्रपटसृष्टीत पदार्पण करू शकतो. मात्र सध्या तो त्याच्या उच्च शिक्षणात व्यग्र असल्याचं नम्रताने या मुलाखतीत स्पष्ट केलं.

महेश बाबूची मुलगी सितारा 11 वर्षांची असून तिला पहिला पगार म्हणून तब्बल एक कोटी रुपये मिळाले. हे एक कोटी रुपये तिने चांगल्या कार्यासाठी दान केले आहेत. सितारा सध्या एका प्रतिष्ठित ज्वेलरी ब्रँडचा चेहरा बनली आहे. तिच्या नावाचं हेच खास कलेक्शन टाइम्स स्क्वेअरवर दाखवण्यात आलं होतं.

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.