महेश बाबूच्या मुलीच्या नावाने मोठी फसवणूक; पोलिसांकडे तक्रार दाखल

आपल्या आईवडिलांच्या पावलांवर पाऊल ठेवत सितारासुद्धा चित्रपटसृष्टीत काम करतेय. आतापर्यंत तिने वडिलांसोबत दोन चित्रपटांमध्ये काम केलंय. याशिवाय सोशल मीडियावर ती डान्सचे विविध व्हिडीओ पोस्ट करते. इन्स्टाग्रामवर तिचा मोठा चाहतावर्ग आहे.

महेश बाबूच्या मुलीच्या नावाने मोठी फसवणूक; पोलिसांकडे तक्रार दाखल
Mahesh Babu's Daughter SitaraImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Feb 11, 2024 | 2:15 PM

मुंबई : 11 फेब्रुवारी 2024 | साऊथ सुपरस्टार महेश बाबूची मुलगी सितारा घट्टमनेनी एका ऑनलाइन फसवणुकीची शिकार झाली आहे. एका अज्ञात व्यक्तीने बेकायदेशीरपणे सिताराचा बनावट अकाऊंट बनवला. आता याप्रकरणी महेश बाबूचा प्रॉडक्शन हाऊस जीएबी एंटरटेन्मेंटने त्यांच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक पोस्ट लिहिली आहे. माधापूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्याची माहितीसुद्धा त्यांनी दिली आहे. हे कृत्य कोणी केलंय, याचा तपास पोलीस करत आहेत. एका अज्ञात व्यक्तीने सिताराच्या नावाने अकाऊंट बनवून फॉलोअर्सना ट्रेडिंग आणि गुंतवणूकची लिंक पाठवली आहे.

महेश बाबूची मुलगी सितारा ही सोशल मीडियावर प्रसिद्ध आहे. तिचे फोटो आणि व्हिडीओ ती चाहत्यांसोबत शेअर करत असते. ‘@sitargadtamaneni हे तिचं एकमेव अकाऊंट आहे. व्हेरिफाइड हँडलशिवाय कोणत्याही दुसऱ्या हँडलवर विश्वास करू नका’, असं महेश बाबूच्या टीमकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.

हे सुद्धा वाचा
View this post on Instagram

A post shared by GMB Entertainment (@gmbents)

सिताराने 2022 मध्ये प्रदर्शित झालेल्या महेश बाबूच्या ‘सरकारू वारी पाटा’ या चित्रपटातून अभिनयक्षेत्रात पदार्पण केलं. या चित्रपटातील एका गाण्यात ती वडिलांसोबत दिलखुलासपणे नाचताना दिसली होती. त्यानंतर महेश बाबूच्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘गुंटूर कारम’मध्येही तिने भूमिका साकारली आहे.

स्टारकिड म्हटलं की नेटकरी अनेकदा नाक मुरडताना दिसतात. कारण बॉलिवूड इंडस्ट्रीतील काही स्टारकिड्सचं वागणं, इतरांच्या तुलनेत त्यांना मिळणाऱ्या संधी हे अनेकांना पटत नाही. म्हणूनच इंडस्ट्रीतील घराणेशाहीचा वाद खूप मोठा आहे. मात्र महेश बाबू आणि नम्रता शिरोडकर यांची मुलगी सितारा घट्टमनेनी हीच प्रतिमा वेगळी आहे. काही दिवसांपूर्वी ती टाइम्स स्क्वेअरवर झळकल्याने सोशल मीडियावर चर्चेत आली होती.

सिताराला तिचा पहिला पगार म्हणून तब्बल एक कोटी रुपये मिळाले होते. हे एक कोटी रुपये तिने चांगल्या कार्यासाठी दान केले होते. सितारा सध्या एका प्रतिष्ठित ज्वेलरी ब्रँडचा चेहरा बनली आहे. तिच्या नावाचं हेच खास कलेक्शन टाइम्स स्क्वेअरवर दाखवण्यात आलं होतं.

आपल्या आईवडिलांच्या पावलांवर पाऊल ठेवत सितारासुद्धा चित्रपटसृष्टीत काम करणार असल्याचं म्हटलं जात आहे. तर दुसरीकडे महेश बाबू आणि नम्रता यांचा मुलगा गौतमसुद्धा भविष्यात चित्रपटसृष्टीत पदार्पण करू शकतो. मात्र सध्या तो त्याच्या उच्च शिक्षणात व्यग्र असल्याचं नम्रताने या मुलाखतीत स्पष्ट केलं.

अमित ठाकरे विधानसेभेच्या रिंगणात? 'या'पैकी एका जागेवर निवडणूक लढवणार?
अमित ठाकरे विधानसेभेच्या रिंगणात? 'या'पैकी एका जागेवर निवडणूक लढवणार?.
राहुल गांधींची जीभ छाटणाऱ्याला 11 लाख..., शिंदेंच्या आमदाराचं वक्तव्य
राहुल गांधींची जीभ छाटणाऱ्याला 11 लाख..., शिंदेंच्या आमदाराचं वक्तव्य.
'या' जिल्ह्यात 12 ज्योतिर्लिंगाच दर्शन. बाप्पासाठी साकारला भारी देखावा
'या' जिल्ह्यात 12 ज्योतिर्लिंगाच दर्शन. बाप्पासाठी साकारला भारी देखावा.
Lalbaugcha Raja Aarti 2024 : ही शान कोणाची..पहा लालबागच्या राजाची आरती
Lalbaugcha Raja Aarti 2024 : ही शान कोणाची..पहा लालबागच्या राजाची आरती.
शिंदे आपल्या परिवारासह लालबागच्या राजा चरणी लीन, काय साकडं घातलं?
शिंदे आपल्या परिवारासह लालबागच्या राजा चरणी लीन, काय साकडं घातलं?.
मविआच्या रेड्यांना चाबकाने फोडून काढणार, कुणी केला घणाघात?
मविआच्या रेड्यांना चाबकाने फोडून काढणार, कुणी केला घणाघात?.
'रोहित पवार महाराष्ट्रात आग लावत सुटलेत...', सदाभाऊ खोतांचा हल्लाबोल
'रोहित पवार महाराष्ट्रात आग लावत सुटलेत...', सदाभाऊ खोतांचा हल्लाबोल.
अजित पवार पुन्हा घरवापसी करणार? बच्चू कडू काय म्हणाले? काय केला दावा?
अजित पवार पुन्हा घरवापसी करणार? बच्चू कडू काय म्हणाले? काय केला दावा?.
'शरद पवारांनी हरिनामाचा जप करावा, म्हणजे...', भाजप नेत्याची खोचक टीका
'शरद पवारांनी हरिनामाचा जप करावा, म्हणजे...', भाजप नेत्याची खोचक टीका.
जरांगे आज मध्यरात्रीपासून उपोषणाला; मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण मिळणार?
जरांगे आज मध्यरात्रीपासून उपोषणाला; मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण मिळणार?.