Video: महेश बाबूचे वडील कृष्णा यांना अंतिम निरोप देताना मोहन बाबू यांना कोसळलं रडू

साऊथ सुपरस्टार कृष्णा यांच्या निधनाने खचले मोहन बाबू; पार्थिव पाहताच अश्रू अनावर

Video: महेश बाबूचे वडील कृष्णा यांना अंतिम निरोप देताना मोहन बाबू यांना कोसळलं रडू
KrishnaImage Credit source: Twitter
Follow us
| Updated on: Nov 16, 2022 | 8:05 AM

हैदराबाद: साऊथ सुपरस्टार महेश बाबूचे वडील आणि दिग्गज तेलुगू अभिनेते कृष्णा यांचं मंगळवारी पहाटे निधन झालं. कृष्णा यांच्या निधनाने तेलुगू चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे. अनेकांनी सोशल मीडियावर पोस्ट लिहित शोक व्यक्त केला. प्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेते मोहन बाबू हे कृष्णा यांचे जवळचे मित्र होते. कृष्णा यांच्या निधनाच्या वृत्ताने मोहन बाबू पूर्णपणे खचले. आपल्या मित्राला अंतिम निरोप देण्यासाठी पोहोचलेल्या मोहन बाबू यांना त्यांचं पार्थिव पाहताच रडू कोसळलं.

मोहन बाबू यांचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत कृष्णा यांच्या आठवणीत मोहन बाबू यांना अश्रू अनावर झाल्याचं स्पष्ट पहायला मिळतंय. यावेळी त्यांनी महेश बाबू आणि त्याच्या कुटुंबीयांना आधार देण्याचा प्रयत्न केला.

हे सुद्धा वाचा

कृष्णा यांच्या अंत्यविधीला तेलुगू चित्रपटसृष्टीतील दिग्गज कलाकारांनी हजेरी लावली होती. अभिनेता प्रभाससुद्धा कृष्णा यांना अंतिम निरोप देण्यासाठी पोहोचला होता. याशिवाय चिरंजीवी, व्यंकटेश डग्गुबत्ती यांच्याही डोळ्यांत पाणी पहायला मिळालं.

अभिनेता रामचरणने कृष्णा यांच्यासाठी सोशल मीडियावर भावूक पोस्ट लिहिली आहे. ‘ते दिग्गज कलाकार होते आणि त्यांचा प्रवास कायम आमच्या लक्षात राहील’, अशा शब्दांत त्याने भावना व्यक्त केल्या.

कृष्णा यांनी त्यांच्या करिअरमध्ये जवळपास 350 चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या आहेत. त्या काळातील ते अत्यंत लोकप्रिय आणि यशस्वी अभिनेते होते. अभिनयासोबतच त्यांनी दिग्दर्शन आणि निर्मिती क्षेत्रातही काम केलं. 2009 त्यांना पद्मभुषण पुरस्कार प्रदान करण्यात आला होता.

काही दिवसांपूर्वीच महेश बाबूची आई इंदिरा देवी यांचं निधन झालं होतं. इंदिरा देवी या कृष्णा यांच्या पहिल्या पत्नी होत्या. कृष्णा यांची दुसरी पत्नी विजया निर्मला यांनी 2019 मध्ये जगाचा निरोप घेतला. तेव्हापासून कृष्णा हे इंडस्ट्रीपासून दूर आहेत. कोणत्याच कार्यक्रमांमध्ये त्यांनी हजेरी लावली नाही. याच वर्षी जानेवारी महिन्यात कृष्णा यांचा मोठा मुलगा रमेश बाबू यांनी आपले प्राण गमावले. दीर्घ आजारानंतर 8 जानेवारी रोजी त्यांचं निधन झालं.

हवा तर पोलीस बंदोबस्त देऊ,कोणालाही पाठीशी घालणार नाही - अजित पवार
हवा तर पोलीस बंदोबस्त देऊ,कोणालाही पाठीशी घालणार नाही - अजित पवार.
संतोष देशमुख यांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेतो -शरद पवार
संतोष देशमुख यांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेतो -शरद पवार.
'परभणी प्रकरणात खरी वस्तूस्थिती जाणून...,' काय म्हणाले शरद पवार ?
'परभणी प्रकरणात खरी वस्तूस्थिती जाणून...,' काय म्हणाले शरद पवार ?.
मस्साजोग प्रकरणात अख्खं गाव...',पवार भेटीवर काय म्हणाले खासदार सोनावणे
मस्साजोग प्रकरणात अख्खं गाव...',पवार भेटीवर काय म्हणाले खासदार सोनावणे.
संजय राऊत रेकी प्रकरणानंतर मंत्री नितेश राणे म्हणाले की मच्छर...
संजय राऊत रेकी प्रकरणानंतर मंत्री नितेश राणे म्हणाले की मच्छर....
देवेंद्र फडणवीस यांच्या अवतीभोवतीची मंडळी कोण ? संजय राऊत यांचा सवाल
देवेंद्र फडणवीस यांच्या अवतीभोवतीची मंडळी कोण ? संजय राऊत यांचा सवाल.
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर.
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला.
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी.
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं.