Mahesh Babu: “बॉलिवूडला मी परवडणार नाही”; हिंदीत काम करण्याविषयी महेश बाबूचं रोखठोक उत्तर

अभिनेता महेश बाबूचा (Mahesh Babu) चाहतावर्ग केवळ दक्षिणेतच नाही तर संपूर्ण भारतात आहे. महेश बाबू हा साउथ फिल्म इंडस्ट्रीतील (South Film Industry) सर्वाधिक मानधन घेणाऱ्या आणि लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक आहे.

Mahesh Babu: बॉलिवूडला मी परवडणार नाही; हिंदीत काम करण्याविषयी महेश बाबूचं रोखठोक उत्तर
महेश बाबू, अभिनेताImage Credit source: Facebook
Follow us
| Updated on: May 10, 2022 | 4:35 PM

अभिनेता महेश बाबूचा (Mahesh Babu) चाहतावर्ग केवळ दक्षिणेतच नाही तर संपूर्ण भारतात आहे. महेश बाबू हा साउथ फिल्म इंडस्ट्रीतील (South Film Industry) सर्वाधिक मानधन घेणाऱ्या आणि लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक आहे. नुकतीच त्याने आदिवी सेषच्या ‘मेजर’ या चित्रपटाच्या ट्रेलर लाँचला हजेरी लावली. या कार्यक्रमात माध्यमांशी बोलताना त्याने बॉलिवूडमध्ये (Bollywood) पदार्पण करण्याच्या प्रश्नावर रोखठोक उत्तर दिलं. “हिंदी फिल्म इंडस्ट्रीला मी परवडू शकणार नाही, त्यामुळे हिंदी चित्रपटांवर मी माझा वेळ का वाया घालवू”, असं तो म्हणाला. महेश बाबू लवकरच ‘सरकारू वारी पाटा’ या आगामी तेलुगू चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. परशुराम पेट्ला दिग्दर्शित हा चित्रपट 12 मे रोजी प्रदर्शित होणार आहे.

ट्रेलर लाँचच्या या कार्यक्रमात महेश बाबूने ओटीटीवर पदार्पण करण्याचाही विचार नसल्याचं स्पष्ट केलं. “मला हिंदी चित्रपटांचे अनेक ऑफर्स येतात, पण मला वाटत नाही की त्यांना मी परवडू शकेन. ज्या इंडस्ट्रीला मी परवडू शकत नाही, अशा ठिकाणी काम करून मी माझा वेळ वाया घालवू इच्छित नाही. मला इथे (दक्षिणेत) प्रचंड स्टारडम आणि आदर मिळतोय. त्यामुळे ही इंडस्ट्री सोडून दुसरीकडे काम करण्याचा मी विचारच करू शकत नाही. चित्रपटांमध्ये काम करून मोठा कलाकार बनायचं माझं स्वप्न होतं. हेच स्वप्न मी आता जगतोय आणि याहून अधिक खूश मी होऊ शकत नाही”, अशा शब्दांत महेश बाबू व्यक्त झाला.

हे सुद्धा वाचा

इन्स्टा पोस्ट

2020 मध्ये महेश बाबूचा ‘सरिलेरु नीकेव्वरू’ हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. आता ‘सरकारू वारी पेट्ला’ या चित्रपटानंतर तो एस. एस. राजामौली यांच्यासोबत काम करणार आहे. महेशला याआधीही अनेकदा बॉलिवूड पदार्पणाबाबत प्रश्न विचारण्यात आला होता. मात्र तेव्हासुद्धा त्याने हिंदीत काम करण्याची इच्छा नसल्याचं म्हटलं होतं.

बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?.
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन.
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?.
अजित दादांनी आपल्याच मंत्र्यांचे टोचले कान, '... अन्यथा वेगळा निर्णय'
अजित दादांनी आपल्याच मंत्र्यांचे टोचले कान, '... अन्यथा वेगळा निर्णय'.
प्रचंड बहुमतानंतर बहुप्रतिक्षेत मंत्रिमंडळाचा विस्तार, कोणाची वर्णी?
प्रचंड बहुमतानंतर बहुप्रतिक्षेत मंत्रिमंडळाचा विस्तार, कोणाची वर्णी?.
33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ
33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ.
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ.
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात.