हैदराबाद- प्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेता महेश बाबूचे वडील आणि तेलुगू चित्रपटसृष्टीतील दिग्गज कलाकार कृष्णा घट्टमनेनी यांनी मंगळवारी या जगाचा निरोप घेतला. कृष्णा यांना कार्डिॲक अरेस्टमुळे सोमवारी हैदराबादमधील रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र त्यांची प्रकृती चिंताजनक होती. कृष्णा यांच्या निधनाने दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे. तर महेश बाबूच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. या वर्षभरात महेशने कुटुंबातील तीन सदस्यांना गमावलं. वडिलांच्या निधनानंतर पूर्णपणे खचलेल्या महेश बाबूचा व्हिडीओ समोर आला आहे. हा व्हिडीओ पाहून त्याचे चाहतेसुद्धा भावूक झाले आहेत.
अंत्यविधीला आलेल्या पाहुण्यांना भेटत असताना महेश बाबू यांना अश्रू अनावर झाल्याचं या व्हिडीओत पहायला मिळतंय. कृष्णा यांच्या अंत्यविधीला महेश बाबूला रडू कोसळलं. या वर्षाच्या सुरुवातीला महेशच्या मोठ्या भावाचं निधन झालं. त्यानंतर सप्टेंबरमध्ये आईने या जगाचा निरोप घेतला आणि आता वडीलसुद्धा गेले.
Song MB kosame rasinatu undi ??such a back to back heart wrenching situations in his life ? #MaheshBabu #RIPSuperStarKrishnaGaru pic.twitter.com/UHZcKwKvLW
— Rãm Tèétøtaller?⚡ (@Bharadwaj7093) November 15, 2022
Hard Times for #Prabhas Anna & #MaheshBabu Anna?
Stay Strong @urstrulyMahesh Anna…#RIPLEGEND#RIPSuperStarKrishnaGaru pic.twitter.com/qxsrA7uP1w
— Ark 06 (@KewinArk) November 15, 2022
जवळच्या व्यक्तींना गमावण्याचं दु:ख महेश बाबूच्या चेहऱ्यावर स्पष्ट पहायला मिळत आहे. या व्हिडीओवर कमेंट करत अनेक चाहत्यांनी सहवेदना व्यक्त केल्या.
कृष्णा यांनी जवळपास 350 चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या आहेत. ते त्या काळातील अत्यंत लोकप्रिय आणि यशस्वी अभिनेते होते. अभिनयासोबतच त्यांनी दिग्दर्शन आणि निर्मिती क्षेत्रातही काम केलं. 2009 त्यांना पद्मभुषण पुरस्कार प्रदान करण्यात आला होता.