Jawan | महेश भट्ट यांच्याकडून किंग खानचे काैतुक, थेट म्हटले, शाहरुख खान असा एक तारा
शाहरुख खान याचा जवान हा चित्रपट मोठा धमाका करताना दिसतोय. शाहरुख खान याच्या चित्रपटाने अनेक रेकाॅर्ड तोडले आहेत. शाहरुख खान याच्या चाहत्यांमध्ये मोठा उत्साह हा बघायला मिळतोय. शाहरुख खान याचे एका मागून एक असे चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत.
मुंबई : बाॅलिवूड अभिनेता शाहरुख खान (Shah Rukh Khan) याच्या जवान चित्रपटाची क्रेझ फक्त चाहत्यांमध्ये नाही तर कलाकारांमध्येही बघायला मिळत आहे. बाॅलिवूडचे अनेक स्टार थेट शाहरुख खान याचा जवान हा चित्रपट बघण्यासाठी थिएटरमध्ये पोहचल्याचे चित्र आहे. विशेष म्हणजे शाहरुख खान हा देखील जवान (Jawan) चित्रपटाचे तूफान असे प्रमोशन करताना दिसला. सोशल मीडियाच्या माध्यमातून सतत शाहरुख खान हा या चित्रपटाचे प्रमोशन करत होता. शाहरुख खान याचा जवान हा चित्रपट बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित चित्रपट ठरला आहे.
शाहरुख खान याने तब्बल चार वर्षांनंतर पठाण चित्रपटाच्या माध्यमातून पुनरागमन हे केले. विशेष म्हणजे त्याचा काही दिवसांपूर्वीच रिलीज झालेला पठाण हा चित्रपट हिट ठरला. आता पठाणनंतर जवान हा चित्रपट बाॅक्स आॅफिसवर जलवा करताना दिसतोय. अनेक कलाकारांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत शाहरुख खान याचे जवान चित्रपटासाठी काैतुक केले.
आता नुकताच महेश भट्ट यांनीही शाहरुख खान याचे काैतुक केले. महेश भट्ट यांनी शाहरुख खान याच्यासाठी एक अत्यंत खास पोस्ट सोशल मीडियावर शेअर केलीये. महेश भट्ट यांची ही पोस्ट तूफान व्हायरल होताना दिसत आहे. महेश भट्ट यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले की, तारे चमकत नाहीत, कारण त्यांना पहायचे असते. जे चमकतात कारण ते तारे आहेत.
एक सुपरस्टार तो आहे जो आपल्या प्रकाशाचा वापर करून जग प्रकाशित करतो आणि इतरांसाठी प्रेरणा बनतो. शाहरुख खान हा त्याच्यापैकीच आहे. आता महेश भट्ट यांची ही पोस्ट तूफान व्हायरल होताना दिसतंय. महेश भट्ट यांच्या अगोदर अनेक कलाकारांनी शाहरुख खान याच्यासाठी अशाच प्रकारच्या पोस्ट या सोशल मीडियावर शेअर केल्याचे बघायला मिळत आहे.
शाहरुख खान याचा जवान हा चित्रपट बघण्यासाठी काही दिवसांपूर्वीच मलायका अरोरा ही थेट थिएटरमध्ये पोहचली. मलायका अरोरा हिने सोशल मीडियावर थिएटरमधील एक फोटो शेअर करत शाहरुख खान याला एकमात्र किंग देखील म्हटले. यासोबतच मलायका अरोरा हिने जवान चित्रपटाच्या संपूर्ण टिमचे देखील काैतुक केले.
फक्त मलायका अरोरा हिच नाही तर अर्जुन कपूर हा देखील थिएटरमध्ये जवान हा चित्रपट बघण्यासाठी पोहचला. अर्जुन कपूर याने सोशल मीडियावर जवान चित्रपटातील एक व्हिडीओ शेअर केला. गेल्या काही दिवसांपासून शाहरुख खान याचे चित्रपट तूफान अशी कमाई करताना दिसत आहेत. आता जवान या चित्रपटानंतर लगेचच शाहरुख खान याचा डंकी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येतोय.