Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Bigg Boss Marathi 4: ‘बिग बॉस मराठी 4’ची अखेर प्रतीक्षा संपली; महेश मांजरेकरच करणार सूत्रसंचालन

'बिग बॉस मराठीचा सिझन नवा, घर नवे, खेळाडूदेखील नवे... पण होस्ट मात्र तोच, महेश वामन मांजरेकर! लवकरच येणार नव्या कोऱ्या पर्वासोबत तुमच्या भेटीला' असा प्रोमो प्रेक्षकांच्या भेटीला आला.

Bigg Boss Marathi 4: 'बिग बॉस मराठी 4'ची अखेर प्रतीक्षा संपली; महेश मांजरेकरच करणार सूत्रसंचालन
Bigg Boss Marathi 4: 'बिग बॉस मराठी 4'ची अखेर प्रतीक्षा संपलीImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Aug 14, 2022 | 1:28 PM

बिग बॉस मराठीचं चौथ पर्व (Bigg Boss Marathi 4) प्रेक्षकांच्या भेटीस येणार हे कळताच सगळ्यांनाच उत्सुकता होती हे जाणून घेण्याची की बिग बॉस मराठीच्या घरामध्ये कोण कोण असणार आणि मुख्य म्हणजे त्याचा सूत्रसंचालक कोण असणार? त्या प्रश्नाचं उत्तर आता प्रेक्षकांना मिळालं आहे. केवळ मराठीच नाही तर हिंदीमध्येही आपल्या कौशल्यपूर्ण दिग्दर्शनाने आणि अभिनयाने वेगळी छाप सोडणारे, मराठी माणसांना कायम आपलेसे वाटणारे महेश मांजरेकर (Mahesh Manjrekar) या कार्यक्रमाच्या सूत्रसंचालकाच्या भूमिकेत दिसणार आहेत. एका विशेष प्रोमोमधून (BBM 4 Promo) महेश मांजरेकरच या पर्वाचं सूत्रसंचालन करणार असल्याचं वाहिनीने जाहीर केलं.

‘बिग बॉस मराठीचा सिझन नवा, घर नवे, खेळाडूदेखील नवे… पण होस्ट मात्र तोच, महेश वामन मांजरेकर! लवकरच येणार नव्या कोऱ्या पर्वासोबत तुमच्या भेटीला’ असा प्रोमो प्रेक्षकांच्या भेटीला आला. बिग बॉस मराठीच्या तीनही पर्वांच्या अभूतपूर्व यशानंतर कलर्स मराठी आता चौथा सिझन प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येत आहे. मागील पर्वामध्ये सूत्रसंचालनाच्या अनोख्या स्टाईलने महेश मांजरेकर यांनी प्रेक्षक आणि सदस्यांची मनं जिंकली. नुकत्याच समोर आलेल्या प्रोमोमध्ये ते सांगताना दिसले, “बिग बॉस मराठीच्या नवीन सीझनमध्ये मी घेणार आहे वेगळी शाळा!” आता नक्की काय घडणार, कशी घेणार महेश मांजरेकर स्पर्धकांची शाळा, हे बघणं उत्सुकतेचं ठरणार आहे.

हे सुद्धा वाचा

पहा प्रोमो-

बिग बॉस आदेश देत आहेत, हे वाक्य जेव्हा कानावर पडतं तेव्हा त्या घरातील सदस्यांसोबतच प्रेक्षकांचंही लक्ष त्या आवाजाच्या दिशेनं वळतं आणि आता काय घडणार याची उत्सुकता लागते. हे सर्व आता पुन्हा एकदा घडणार आहे. या आवाजासोबतच घरातील सदस्यांशी बाहेरून संवाद साधणारी एकमेव व्यक्ती म्हणजे या कार्यक्रमाचा सूत्रसंचालक. या सदस्यांना कधी प्रेमाने समजावणं तर कधी आपला धाकही निर्माण करण्याचं काम सूत्रसंचालक शनिवार आणि रविवारच्या भागात करत असतो. ही भूमिका महेश मांजरेकर पार पाडणार आहेत. या घरात किती सदस्य असतील, कोण कोण असतील, त्यांच्यामध्ये काय काय घडेल या प्रश्नांची उत्तरं लवकरच प्रेक्षकांना मिळणार आहेत.

कर्जमाफी देता येत नाही तर...; संजय राऊतांचा अजित पवारांना टोला
कर्जमाफी देता येत नाही तर...; संजय राऊतांचा अजित पवारांना टोला.
स्वत:च्याच कारमध्ये मृतावस्थेत आढळला पोलीस कर्मचारी
स्वत:च्याच कारमध्ये मृतावस्थेत आढळला पोलीस कर्मचारी.
ठाणे का टायगर, आखो मे अंगार.. ; शिंदेंच्या समर्थनार्थ शहाजीबापूंचं गाण
ठाणे का टायगर, आखो मे अंगार.. ; शिंदेंच्या समर्थनार्थ शहाजीबापूंचं गाण.
मनसे मेळावा; शिवतीर्थावर राज ठाकरेंची तोफ धडाडणार
मनसे मेळावा; शिवतीर्थावर राज ठाकरेंची तोफ धडाडणार.
संघ बाह्य आणि आंतरिक दृष्टीसाठी काम करतो; पंतप्रधान मोदींचे गौरवोद्गार
संघ बाह्य आणि आंतरिक दृष्टीसाठी काम करतो; पंतप्रधान मोदींचे गौरवोद्गार.
'आपल्या सर्वांना...', पंतप्रधान मोदींची मराठीतून भाषणाला सुरुवात
'आपल्या सर्वांना...', पंतप्रधान मोदींची मराठीतून भाषणाला सुरुवात.
शुद्ध सात्विक प्रेम हीच संघाची प्रेरणा - मोहन भागवत
शुद्ध सात्विक प्रेम हीच संघाची प्रेरणा - मोहन भागवत.
दिक्षाभूमीला वंदन करून अभिप्राय वहीत पंतप्रधानांनी दिला विशेष संदेश
दिक्षाभूमीला वंदन करून अभिप्राय वहीत पंतप्रधानांनी दिला विशेष संदेश.
पंतप्रधान मोदींचा नागपूर दौरा; आरएसएसच्या मुख्यालयाला दिली भेट
पंतप्रधान मोदींचा नागपूर दौरा; आरएसएसच्या मुख्यालयाला दिली भेट.
हरीभाऊ बागडेंच्या हेलिकॉप्टरला अपघात; व्हिडिओ व्हारायल
हरीभाऊ बागडेंच्या हेलिकॉप्टरला अपघात; व्हिडिओ व्हारायल.