Mahesh Manjrekar | ‘माझा मुलगा गे रिलेशनशीपमध्ये…’, समलैंगिक नात्यावर महेश मांजरेकर यांची स्पष्ट भूमिका

'माझ्या मुलाने मला त्याच्या समलैंगिक नात्याबद्दल सांगितलं तर..', 'गे'सोबत मुलाच्या रिलेशनशीपवर महेश मांजरेकर यांची स्पष्ट भूमिका...

Mahesh Manjrekar | 'माझा मुलगा गे रिलेशनशीपमध्ये...', समलैंगिक नात्यावर महेश मांजरेकर यांची स्पष्ट भूमिका
Follow us
| Updated on: Jul 07, 2023 | 1:12 PM

मुंबई | फक्त मराठी नाही तर बॉलिवूडमध्ये देखील आपल्या भूमिकेने चाहत्यांच्या मनावर राज्य करणारे दिग्दर्शक आणि अभिनेते महेश मांजरेकर कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असतात. महेश मांजरेकर लवकरच अभिनेते नसीरुद्दीन शाह यांच्यासोबत ‘पुराना फर्निचर’ सिनेमाच्या माध्यमातून चाहत्यांच्या भेटीस येणार आहेत. शिवया अभिनेता अक्षय कुमार याची मुख्य भूमिका असलेल्या ‘वेडात मराठे वीर दौडले सात’ सिनेमाच्या पोस्ट-प्रॉडक्शनची जबाबदारी देखील महेश मांजरेकर यांच्या खांद्यावर आहे. अनेक आगामी प्रोजेक्टमुळे चर्चेत आलेले महेश मांजरेकर आता मुलाच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहेत. नुकताच झालेल्या एका मुलाखतीत महेश मांजरेकर यांनी मोठं वक्तव्य केलं आहे.

नुकताच, महेश मांजरेकर निर्मित ‘एका काळेचे मणी’ ही कॉमेडी सीरिज रीलिज झाली आहे. सीरिजच्या निमित्ताने महेश मांजरेकर यांनी नातेसंबंधांबाबत मोठं वक्तव्य केलं. ज्यामुळे मांजरेकर तुफान चर्चेत आले आहेत. ‘माझा मुलगा जर गे रिलेशनशिपमध्ये असेल तर मी त्याचा स्वीकार करेल…’ अशी स्पष्ट भूमिका महेश मांजरेकर यांनी मांडली.

महेश मांजरेकर म्हणाले, ‘आपण मराठी प्रेक्षकांना कमी का लेखतो..’ असा प्रश्न देखील त्यांनी याठिकाणी उपस्थित केला. ‘मराठी प्रेक्षक देखील समजदार आणि पुढरलेल्या विचारांचे आहेत. समाजात नक्की काय सुरु आहे, याची त्यांना कल्पना आहे. याआधी देखील मराठी सिनेमांमध्ये अनेक नवीन प्रयोग झाले आहेत…’

‘आजच्या घडीला आपण प्रत्येक नातेसंबंधांचा स्वीकार आपण करायला हवा. जोपर्यंत लोक अशा नात्यांचा स्वीकार करत नाहीत तेपर्यंत अनेक अडचणी निर्माण होत राहतील. यामुळे आत्महत्येसारख्या घटना समोर येतात. माझा मुला जर मला म्हणाला मी गेसोबत रिलेशनशीपमध्ये आहे. तर मी त्याचा स्वीकार करेल. कारण ते त्याचं आयुष्य आहे.. ‘ (gay relationship)

पुढे महेश मांजरेकर म्हणाले, ‘त्याचं आयुष्य मी त्याला त्याच्या इच्छेनुसार जगू देईल.. फक्त मुलगाच नाही तर, उद्या माझी मुलगी जरी म्हणाली, मी समलैंगिक नात्यामध्ये आहे, तिचा देखील मी स्वीकार करेल..’ सध्या सर्वत्र महेश मांजरेकर आणि समलैंगिक नात्यावर त्यांनी मांडलेल्या स्पष्ट भूमिकेची चर्चा रंगली आहे.

याआधी देखील अनेक मुद्द्यांवर महेश मांजरेकर यांनी स्पष्ट भूमिका मांडली आहे. आता देखील समलैंगिक नात्यावर स्वतःचं मत मांडत महेश मांजरेकर यांनी सोशल मीडियाचे आभार मानले आहेत. ज्यामुळे सर्वत्र चर्चांना उधाण आलं आहे. (mahesh manjrekar son dancboll)

बीडच्या फरार आरोपींचं प्रसिद्ध पत्रक जारी, नेमकं काय म्हटलंय?
बीडच्या फरार आरोपींचं प्रसिद्ध पत्रक जारी, नेमकं काय म्हटलंय?.
राऊतांना मातोश्रीवर धुतलं, खोलीत डांबलं? बातम्या व्हायरल; राऊत भडकले
राऊतांना मातोश्रीवर धुतलं, खोलीत डांबलं? बातम्या व्हायरल; राऊत भडकले.
लाडकी बहीण योजनेबाबत मोठी अपडेट, 'या' पाच प्रकारच्या बहिणींना आता...
लाडकी बहीण योजनेबाबत मोठी अपडेट, 'या' पाच प्रकारच्या बहिणींना आता....
'मेजर ध्यानचंद खेलरत्न'ची घोषणा, मनु भाकर-डी गुकेशसह कोणाचा सन्मान?
'मेजर ध्यानचंद खेलरत्न'ची घोषणा, मनु भाकर-डी गुकेशसह कोणाचा सन्मान?.
'आमच्याकडे आता गर्दी, आमच्यासोबत या असं आम्ही साळवींना म्हटलो नाही'
'आमच्याकडे आता गर्दी, आमच्यासोबत या असं आम्ही साळवींना म्हटलो नाही'.
'दादांच्या ताफ्यात वाल्मिक कराडची गाडी..' बीडच्या खासदाराचा गौप्यस्फोट
'दादांच्या ताफ्यात वाल्मिक कराडची गाडी..' बीडच्या खासदाराचा गौप्यस्फोट.
अंत्यविधीची तयारी सुरू अन् 'तो' जिवंत झाला; सिनेमात शोभेल अशी घटना
अंत्यविधीची तयारी सुरू अन् 'तो' जिवंत झाला; सिनेमात शोभेल अशी घटना.
ठाकरे गटाचे राजन साळवी भाजपच्या वाटेवर? होणाऱ्या चर्चांवर म्हणाले...
ठाकरे गटाचे राजन साळवी भाजपच्या वाटेवर? होणाऱ्या चर्चांवर म्हणाले....
शिवाजीपार्कातील शिवराज्यभिषेक सोहळ्याच्या शिल्पाच्या भिंतीला भगदाड
शिवाजीपार्कातील शिवराज्यभिषेक सोहळ्याच्या शिल्पाच्या भिंतीला भगदाड.
गुलाबराव पाटलांच्या पत्नीच्या कारचा कट अन् पाळदी गावात 2 गटात राडा
गुलाबराव पाटलांच्या पत्नीच्या कारचा कट अन् पाळदी गावात 2 गटात राडा.