Mahesh Manjarekar : महेश मांजरेकरांचं कॉन्ट्रॅक्ट संपलं, आता बिग मराठीचं सूत्रसंचालन कोण करणार?

मागच्या तीन वर्षापासून मराठी बिग या रिअॅलिटी शोचं सूत्रसंचालन प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक महेश मांजरेकर करत आहेत. त्यांचं कॉन्ट्रॅक्ट आता ३ वर्षानंतर संपतं आहे. त्यामुळे बिग बॉस मराठीला नवा सूत्रसंचालक मिळणार की त्यांचं कॉन्ट्रॅक्ट पुन्हा वाढविण्यात येणार, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

Mahesh Manjarekar : महेश मांजरेकरांचं कॉन्ट्रॅक्ट संपलं, आता बिग मराठीचं सूत्रसंचालन कोण करणार?
महेश मांजरेकर
Follow us
| Updated on: Feb 03, 2022 | 10:53 AM

मुंबई : मागच्या तीन वर्षापासून मराठी बिग (Bigg Boss Marathi) या रिअॅलिटी शोचं सूत्रसंचालन अभिनेते आणि दिग्दर्शक महेश मांजरेकर (Mahesh Manjarekar) करत आहेत. त्यांचं कॉन्ट्रॅक्ट आता ३ वर्षानंतर संपतं आहे. त्यामुळे बिग बॉस मराठीला नवा सूत्रसंचालक मिळणार की त्यांचं कॉन्ट्रॅक्ट पुन्हा वाढविण्यात येणार, हे पाहणे औत्सुक्याचं ठरणार आहे. बॉलिवूड अभिनेता सलमान खान (Salman Khan) आणि महेश मांजरेकर यांनी हिंदी बिग बॉसचं (Bigg Boss) काही काळ सोबत सूत्रसंचालन केलं होतं. त्यावेळी महेश मांजरेकर यांची बिग बॉस होस्ट करण्याची स्टाईल सलमानपेक्षा कैक पटींनी भारी असल्याचं म्हणतMahesh Manjarekar : महेश मांजरेकरांचं कॉन्ट्रॅक्ट संपलं, आता बिग मराठीचं सूत्रसंचालन कोण करणार? प्रेक्षकांनी महेश मांजरेकरांना डोक्यावर घेतलं होतं. त्यानंतर त्यांनी बिग बॉस मराठीचं यशस्वीपणे ३ वर्ष सूत्रसंचालन केलं. आता चौथ्या पर्वाचं सूत्रसंचालन महेश मांजरेकर करणार की त्यांची जागा कोण घेणार, याकडे प्रेक्षकांचं लक्ष लागलं आहे.

गेल्या ३ वर्षांपूर्वी बिग बॉस मराठीचे सूत्रसंचालन करण्यासाठी महेश मांजेरकर यांच्याशी कॉन्ट्रॅक्ट साईन करण्यात आलं होतं. आता तिसरं पर्व पूर्ण झाल्यानंतर त्यांचा करार संपुष्टात आला आहे. आता हा करार संपल्यानंतर महेश मांजरेकर या शोच्या नव्या सीझनचे सूत्रसंचालन करणार की त्यांच्या जागी आणखी कोणी कलाकार हा शो होस्ट करणार, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. काही मीडिया रिपोर्ट्सनुसार, महेश मांजरेकर पुन्हा शो होस्ट करण्यास उत्सुक असल्याचं समजतं आहे.

बिस बॉस लवकरच पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला

गेल्या वर्षी कोरोना महामारीमुळे बिग बॉस मराठीचा तिसरा सीझन पुढे ढकलण्यात आला होता. साधारपणे मे महिन्यात बिस बॉस मराठीचं पर्व सुरु होतं. आताचा बिग बॉस मराठीचा सीझन ४ मेपासून सुरु होणार असल्याचं बोललं जातय. तशी तयारीही निर्मात्यांनीही सुरु केली आहे.

नुकतीच महेश मांजरेकरांनी कॅन्सवर मात केलीय

‘अंतिम’च्या शूटिंगदरम्यान महेश मांजरेकर यांना कॅन्सर झाल्याचं समोर आलं होतं. मात्र पराभव न पत्करण्याची सवयीने त्यांना आजारातही ‘अजिंक्य’ ठेवलं. एकीकडे ते केमोथेरपीचा उपचार घेत राहिले तर दुसरीकडे ‘अँटीम’चं दिग्दर्शनही सुरु ठेवलं. महेश मांजरेकरांनी ‘अजिंक्य’ सवयीमुळे काहीच महिन्यात कर्करोगालाही हरवलं.

संबंधित बातम्या

Sulagna panigrahi : ‘मर्डर 2’ फेम अभिनेत्री सुलग्ना पाणीग्रहीचा आज वाढदिवस, जाणून घ्या तिच्याशी संबंधित कधीही न ऐकलेल्या गोष्टी!

Shamita Shetty Party Photos : शमिताच्या वाढदिवसानिमित्त जंगी पार्टीचे आयोजन, पाहा खास फोटो!

चित्रपट आणि कवितांची राणी, फारुख शेख जिवलग यार, प्रकाश झा यांच्याबरोबर 17 वर्षांचा संसार, वाचा दिप्ती नवल यांच्या खास आठवणी

मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.