Aishwarya Rai हिच्या लेकीसारखीच दिसते ‘या’ अभिनेत्रीची मुलगी; तिला पाहून चाहते म्हणाले, ‘आराध्या पेक्षा…’

| Updated on: May 13, 2023 | 1:21 PM

'या' अभिनेत्रीच्या लेकीसोबत होतेय ऐश्वर्या राय हिची मुलगी आराध्या बच्चनची तुलना... दोघींचा फोटो पाहिल्यानंतर तुम्हीही व्हाल हैराण... सर्वत्र स्टारकिड्सच्या मुलींची चर्चा...

Aishwarya Rai हिच्या लेकीसारखीच दिसते या अभिनेत्रीची मुलगी; तिला पाहून चाहते म्हणाले, आराध्या पेक्षा...
Follow us on

मुंबई : बॉलिवूडमध्ये गेल्या काही दिवसांपासून स्टारकिड्सची चर्चा तुफान रंगलेली असते. अनेक ठिकाणी सेलिब्रिटींना त्यांच्या मुलांसोबत स्पॉट केलं जातं. शिवाय सोशल मीडियावर सेलिब्रिटी आणि त्यांच्या मुलांचे फोटो आणि व्हिडीओ तुफान व्हायरल होत असतात. सध्या अभिनेत्री ऐश्वर्या राय हिची मुलगी आराध्या बच्चनची तुफान चर्चा रंगत आहे. शिवाय आराध्याचे अनेक फोटो आणि व्हिडीओ देखील सोशल मीडियावर तुफान चर्चेत आहेत. अनेक कार्यक्रमांमध्ये ऐश्वर्या मुलगी आराध्या हिच्यासोबत उपस्थित राहते. दोघींना एकत्र पाहिल्यांतर माय-लेकीची एक झलक पाहण्यासाठी चाहते उत्सुक असतात. पण आता बॉलिवूडच्या एका प्रसिद्ध अभिनेत्रीच्या लेकीसोबत होतेय ऐश्वर्या राय हिची मुलगी आराध्या बच्चनची तुलना होत आहे.

ज्या अभिनेत्रीच्या मुलीसोबत आराध्या हिची तुलना होत आहे, ती अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून अभिनेत्री महिमा चौधरी आहे. सध्या महिमा चौधरी हिची मुलगी आर्याना चौधरी सोशल मीडियावर आणि चाहत्यांमध्ये चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वी महिमा चौधरी हिला मुलगी अर्याना चौधरी हिच्यासोबत स्पॉट करण्यात आलं. तेव्हा अर्याना हिच्या हेअर स्टाईलने अनेकांचं लक्ष वेधलं.

आर्याना आणि आराध्या यांची हेअर स्टाईल जवळपास सारखीच आहे. सेलिब्रिटी फोटोग्राफर विरल भयानी याने महिमा चौधरी आणि आर्याना चौधरी यांचा एका व्हिडीओ इन्स्टाग्राम पोस्ट केला आहे. व्हिडीओमध्ये दोघी प्रचंड सुंदर दिसत आहे. अभिनेत्रीने सूट घतला आहे तर, महिमा हिच्या लेकीने पांढऱ्या रंगाचा ड्रेस घातला आहे. सध्या सर्वत्र महिमा चौधरी हिचा लेकी सोबत असलेला व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे.

 

 

व्हिडीओ पाहून आर्यानाचा लूक आराध्यापेक्षा चांगला असल्याचं नेटकऱ्यांनी कमेंटमध्ये सांगितलं आहे. शिवाय दोघींच्या लूकचं कौतुक देखील केलं आहे. महिमा चौधरी आणि तिची मुलगी आर्यनाचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. दोघींचा व्हिडीओ चाहत्यांना देखील फार आवडला आहे.

महिमा चौधरी हिच्याबद्दल सांगायचं झालं तर, अभिनेत्री गेल्या अनेक दिवसांपासून मोठ्या पडद्यापासून दूर होती. आता आभिनेत्री पुन्हा बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. महिमा अनेक वर्षांनंतर ‘द सिग्नेचर’ आणि ‘इमरजेन्सी’ सिनेमातून चाहत्यांच्या भेटीस येणार आहे.