भाग्यश्रीच्या पतीवर साडेचार तासांची शस्त्रक्रिया; चाहत्यांनी व्यक्त केली चिंता

'मैंने प्यार किया' फेम भाग्यश्रीचा पती रुग्णालयात; पोस्ट केला व्हिडीओ

भाग्यश्रीच्या पतीवर साडेचार तासांची शस्त्रक्रिया; चाहत्यांनी व्यक्त केली चिंता
अभिनेत्री भाग्यश्री आणि तिचा पती हिमालय दासानीImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Nov 04, 2022 | 7:40 PM

मुंबई- ‘मैने प्यार किया’ या चित्रपटातून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री भाग्यश्री हिच्या पतीवर नुकतीच शस्त्रक्रिया पार पडली. भाग्यश्रीने सोशल मीडियावर फोटो पोस्ट करत चाहत्यांना याविषयीची माहिती दिली. भाग्यश्रीचे पती हिमालय दासानी यांच्या उजव्या खांद्यावर मुंबईतील रुग्णालयात शस्त्रक्रिया झाली. तब्बल साडेचार तास ही सर्जरी सुरु होती. शस्त्रक्रिया यशस्वी झाली असून हिमालय पूर्णपणे बरे होण्याची वाट पाहत असल्याचं तिने या पोस्टमध्ये सांगितलं. त्याचप्रमाणे डॉक्टरांचेही आभार मानले.

सर्जरीच्या आधी आणि नंतरचा व्हिडीओ क्लिपसुद्धा भाग्यश्रीने इन्स्टाग्रामवर पोस्ट केला. या कठीण काळात भाग्यश्री हिमालय यांच्या बाजूला खंबीरपणे उभी होती. ‘उजव्या खांद्यावरील या मोठ्या शस्त्रक्रियेला जवळपास साडेचार तास लागले’, असं तिने लिहिलं.

हे सुद्धा वाचा

‘योग्य वेळी योग्य डॉक्टरांकडे जाणं खूप महत्त्वाचं असतं. ते एका दिवसात बरे होतील असं आम्हाला सांगण्यात आलं होतं. हे शक्य होईल असा आम्हाला विश्वास नव्हता. मात्र वैद्यकीय सेवा आणि डॉक्टरांचे आभार, ज्यांच्यामुळे ही सर्जरी यशस्वी ठरली’, असं भाग्यश्री म्हणाली.

तिच्या या पोस्टवर कमेंट करत अनेकांनी हिमालय यांच्या प्रकृतीविषयी काळजी व्यक्त केली. ‘लवकर बरा हो हिमी.. आणि घरी लवकर ये. आपण पार्टी करूयात’, अशी कमेंट अर्चना पुरण सिंहने लिहिली. हिमालय आणि भाग्यश्रीने 1990 मध्ये लग्न केलं. या दोघांना अभिमन्यू दासानी हा मुलगा आणि अवंतिका दासानी ही मुलगी आहे. हे दोघंही अभिनयक्षेत्रात कार्यरत आहेत.

धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर.
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला.
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी.
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं.
'निवडणुकीनंतर माज आलाय, पुढे पुन्हा अशी घटना घडली तर...'
'निवडणुकीनंतर माज आलाय, पुढे पुन्हा अशी घटना घडली तर...'.
सकाळी 9.30ला ते दोघे आले, फोटो काढून गेले, राऊतांच्या बंगल्याची रेकी
सकाळी 9.30ला ते दोघे आले, फोटो काढून गेले, राऊतांच्या बंगल्याची रेकी.
D फॉर डॉन अन् तो मंत्रिमंडळात? जितेंद्र आव्हाडांनी दिली हिंट
D फॉर डॉन अन् तो मंत्रिमंडळात? जितेंद्र आव्हाडांनी दिली हिंट.
'हुशार्‍या मारू नका, अडीच वर्षांनंतर..'; सत्तारांचा विरोधकांना इशारा
'हुशार्‍या मारू नका, अडीच वर्षांनंतर..'; सत्तारांचा विरोधकांना इशारा.
शरद पवारांचे 'हे' दोन नेते दादांच्या भेटीला, राजकारणात भूकंप होणार?
शरद पवारांचे 'हे' दोन नेते दादांच्या भेटीला, राजकारणात भूकंप होणार?.
कल्याणात मराठी कुटुंबाला मारहाण,मनसे दिला इशारा,'येत्या २४ तासात जर..'
कल्याणात मराठी कुटुंबाला मारहाण,मनसे दिला इशारा,'येत्या २४ तासात जर..'.