VIDEO: आईची साडी नेसून मायराचा अफलातून डान्स; ‘गंगुबाई’ आलियासुद्धा पडेल फिकी!

'माझी तुझी रेशीमगाठ' (Majhi Tujhi Reshimgathi) या मालिकेत परीची भूमिका साकारणारी ही मायरा सोशल मीडियावर आधीपासूनच स्टार आहे. तिचे नवनवीन फोटो, व्हिडीओ पाहण्यासाठी चाहते उत्सुक असतात.

VIDEO: आईची साडी नेसून मायराचा अफलातून डान्स; 'गंगुबाई' आलियासुद्धा पडेल फिकी!
Myra Vaikul dance on dholidaImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Apr 04, 2022 | 4:30 PM

आपल्या क्यूटनेसने सर्वांचं लक्ष वेधणारी बालकलाकार मायरा वायकुळ (Myra Vaikul) माहित नाही, असं क्वचितच कोणीतरी असेल. ‘माझी तुझी रेशीमगाठ’ (Majhi Tujhi Reshimgathi) या मालिकेत परीची भूमिका साकारणारी ही मायरा सोशल मीडियावर आधीपासूनच स्टार आहे. तिचे नवनवीन फोटो, व्हिडीओ पाहण्यासाठी चाहते उत्सुक असतात. मायराला अभिनयासोबतच डान्सचीही खूप आवड आहे. नुकताच तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर डान्सचा एक व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. तुम्हाला पण लहानपणी आईची साडी नेसायला आवडायचं का?, असं कॅप्शन या व्हिडीओला दिलं आहे. या व्हिडीओत मायराने तिच्या आईची साडी नेसून ‘गंगुबाई काठियावाडी’ या चित्रपटातील ढोलिडा (Dholida Song) या गाण्यावर अफलातून डान्स केला आहे.

या व्हिडीओतील मायराच्या हावभावांसमोर बॉलिवूडची आलिया भट्टसुद्धा फिकी पडेल. या व्हिडीओला चार लाखांहून अधिक व्हूज तर 70 हजारांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत. ढोलिडा या गाण्यामधील आलियाचे स्टेप्स अगदी अचून तिने फॉलो केले आहेत. आईच्या साडीमध्ये मायरा खूपच क्यूट दिसत असल्याच्या कमेंट्स नेटकऱ्यांनी केल्या आहेत.

तुम्ही पाहिलात का परीचा हा डान्स?

माझी तुझी रेशीमगाठ या मालिकेत श्रेयस तळपदे, प्रार्थना बेहरे या दोन कलाकारांपेक्षाही क्युट मायरा तिच्या दमदार अभिनयाने भाव खाऊन जाते. मायराला टिकटॉक व्हिडीओजच्या माध्यमातून प्रचंड लोकप्रियता मिळाली. टिकटॉक स्टार म्हणून तिची ओळख होती. इन्स्टाग्रामवर तिचे चार लाखांहून अधिक फॉलोअर्स आहेत.

हेही वाचा:

मराठी ब्लॉकबस्टर चित्रपटांची नवी वाहिनी ‘प्रवाह पिक्चर’; दर आठवड्याला पाहायला मिळणार नव्या सिनेमाचा प्रीमियर

Grammy Awards 2022: भारतीय वंशाच्या फाल्गुनी शाह, रिकी केज यांनी पटकावला प्रतिष्ठित ‘ग्रॅमी’ पुरस्कार

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.