Bachchan Family : ‘संपूर्ण संपत्ती अभिषेकच्या नावावर करा…’, कोणी केली अमिताभ बच्चन यांच्याकडे अशी मागणी?

Bachchan Family : अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय यांच्या घटस्फोटाच्या चर्चा, संपत्ती मुलाच्या नावावर करा... 'या' व्यक्तीने केली अमिताभ बच्चन यांच्याकडे अशी मागणी? सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त बच्चन कुटुंबाची चर्चा...

Bachchan Family : 'संपूर्ण संपत्ती अभिषेकच्या नावावर करा...', कोणी केली अमिताभ बच्चन यांच्याकडे अशी मागणी?
Follow us
| Updated on: Dec 13, 2023 | 9:37 AM

मुंबई| 13 डिसेंबर 2023 : बच्चन कुटुंब कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळ चर्चेत असतं. पण गेल्या काही दिवसांपासून अभिनेता अभिषेक बच्चन आणि अभिनेत्री ऐश्वर्या राय यांच्या घटस्फोटाची चर्चा रंगली आहे. दरम्यान, महानायक अमिताभ बच्चन यांनी देखील जुहू येथील ‘प्रतीक्षा’ बंगला लेक श्वेता नंदा हिच्या नावावर केला आहे. म्हणून अभिषेक आणि ऐश्वर्या यांच्या घटस्फोटाच्या चर्चांना उधाण आलं आहे. पण एक काळ असा होता जेव्हा एका प्रसिद्ध अभिनेत्रीच्या आईने अमिताभ बच्चन यांची संपूर्ण संपत्ती मुलगा अभिषेक बच्चन याच्यावर नावावर करण्याची मागणी केली होती. सध्या ज्या सेलिब्रिटीच्या आईची चर्चा रंगत ती दुसरी तिसरी कोणी नसून अभिनेत्री करिश्मा कपूर हिची आई बबीता कपूर आहे.

सांगायचं झालं तर, ऐश्वर्या हिच्यासोबत लग्न करण्याआधी अभिषेक याचं अनेक अभिनेत्रींसोबत नाव जोडण्यात आलं. अभिनेत्री करिष्मा कपूर आणि अभिषेक यांच्या रिलेशनशिपच्या चर्चा फत्त बॉलिवूडमध्येच नाही तर, चाहत्यांमध्ये देखील रंगल्या होत्या. करिश्मा कपूर ही बच्चन कुटुंबाची होणारी सून आहे… अशी घोषणा देखील अभिनेत्री जया बच्चन यांनी माध्यमांसमोर केली होती.

बच्चन कुटुंबासोबत करिश्मा हिचे अनेक फोटो आणि व्हिडीओ देखील व्हायरल झाले होते. पण करिश्मा आणि अभिषेक यांचं नातं लग्नापर्यंत पोहोचलं नाही. त्यामागे कारण देखील फार मोठं आहे. बच्चन आणि कपूर कुटुंबामध्ये लग्नाची बोलणी सुरु असताना बबीता कपूर यांनी अमिताभ बच्चन यांची संपत्ती अभिषेक याच्या नावावर करण्याची मागणी केली होती.

हे सुद्धा वाचा

फक्त बबीता कपूर यांनीच नाही तर, जया बच्चन यांनी देखील एक अट ठेवल्याची माहिती अनेकदा समोर आली. लग्नानंतर करिश्माला हिला बॉलिवूडमध्ये काम करता येणार नाही… अशी अट जया बच्चन यांची होती. दोघींना एकमेकींची अट मान्य नव्हती. म्हणून अभिषेक आणि करिश्मा यांचं नातं लग्नापर्यंत पोहोचलं नाही.

अभिषेक बच्चन याच्यासोबत असलेलं नातं तुटल्यानंतर करिश्मा कपूर हिने श्रीमंत उद्योजक संजय कपूर याच्यासोबत लग्न केलं. पण दोघांचं नातं फार काळ टिकलं नाही. लग्नाच्या काही वर्षांनंतर संजय आणि करिश्मा यांचा घटस्फोट झाला. आता करिश्मा सिंगल मदर म्हणून दोन मुलांचा सांभाळ करत आहे.

तर अभिषेक याने अभिनेत्री ऐश्वर्या राय हिच्यासोबत लग्न केलं. 2007 मध्ये कुटुंबियांच्या उपस्थित अभिषेक आणि ऐश्वर्या यांनी लग्न केलं. लग्नानंतर`2011 मध्ये ऐश्वर्या हिने आराध्या बच्चन हिला जन्म दिला. पण गेल्या काही दिवसांपासून दोघांच्या घटस्फोटाच्या चर्चांनी जोर धरला आहे. रंगत असलेल्या चर्चांवर अभिषेक – ऐश्वर्या यांनी अधिकृत माहिती दिलेली नाही.

33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ
33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ.
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ.
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात.
चारवेळा आमदार अन् आता थेट मंत्री, जयकुमार गोरेंकडून मंत्रिपदाची शपथ
चारवेळा आमदार अन् आता थेट मंत्री, जयकुमार गोरेंकडून मंत्रिपदाची शपथ.
भाजपच्या पंकजा मुंडेंची मंत्रिपदासाठी वर्णी, कोणतं खातं मिळणार?
भाजपच्या पंकजा मुंडेंची मंत्रिपदासाठी वर्णी, कोणतं खातं मिळणार?.
सलग 7 वेळा आमदार असलेल्या भाजपच्या गणेश नाईकांनी घेतली मंत्रिपदाची शपथ
सलग 7 वेळा आमदार असलेल्या भाजपच्या गणेश नाईकांनी घेतली मंत्रिपदाची शपथ.
नागपूरात शपथविधी, व्यासपीठावरील खूर्च्यांमध्ये 'ती' खूर्ची कोणासाठी?
नागपूरात शपथविधी, व्यासपीठावरील खूर्च्यांमध्ये 'ती' खूर्ची कोणासाठी?.
मराठवाड्यात 6 आमदार होणार मंत्री, 6 पैकी 3 नव्या चेहऱ्यांना संधी
मराठवाड्यात 6 आमदार होणार मंत्री, 6 पैकी 3 नव्या चेहऱ्यांना संधी.
तानाजी सावंतांचा पत्ता कट? आज महायुतीचा शपथविधी अन 3 बडे नेते वेटिंगवर
तानाजी सावंतांचा पत्ता कट? आज महायुतीचा शपथविधी अन 3 बडे नेते वेटिंगवर.
बावनकुळेंनंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष म्हणून 'या' मंत्र्यांचं नाव समोर
बावनकुळेंनंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष म्हणून 'या' मंत्र्यांचं नाव समोर.