Durgamati | ‘दुर्गामती’ च्या निर्मात्यांना कोट्यावधीचा फटका बसण्याची शक्यता!

भूमी पेडणेकरचा हॉरर चित्रपट दुर्गामती आज अमेजॉन प्राइम वर प्रदर्शित झाला आहे. प्रत्येकजण या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत होते.

Durgamati | 'दुर्गामती' च्या निर्मात्यांना कोट्यावधीचा फटका बसण्याची शक्यता!
Follow us
| Updated on: Dec 11, 2020 | 3:45 PM

मुंबई : भूमी पेडणेकरचा हॉरर चित्रपट दुर्गामती आज अमेजॉन प्राइम वर प्रदर्शित झाला आहे. प्रत्येकजण या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत होते. चित्रपटाच्या निर्मात्यांच्या सहकार्याने अ‍ॅमेझॉन प्राइम व्हिडिओने बुधवारी मुंबईतील फिल्मसिटीमध्ये चित्रपटामधील एक देखावा अतिशय अनोख्या पद्धतीने दाखविला. फिल्मसिटी लेकच्या पाण्यात चित्रपटाच्या देखाव्याचे अनावरण केले होते. मात्र, आज हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर काही वेळातच ऑनलाईन लिक झाला आहे.( makers of ‘Durgamati’ are likely to be loss by crores)

भूमी पेडणेकरचा ‘दुर्गामती’ हा चित्रपट तामिळ रॉकर्स, टेलीग्रामवर प्रसिद्ध झाला आहे. यामुळे प्रेक्षकांना एचडी आणि विनामूल्य चित्रपट डाउनलोड करता येत आहे. जर चित्रपट अशाचप्रकारे ऑनलाइन लिक होणे सुरू केली तर त्याचा सर्वात मोठा परिणाम बॉलिवूड व्यवसायावर होणार आहे आणि निर्मात्यांनाही त्याचा मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. जी. अशोक दिग्दर्शित ‘दुर्गामती’ हा एक हारर चित्रपट आहे. यात एका निर्दोष शासकीय अधिकाऱ्याची कहाणी आहे. जो कट कारस्थानांचा बळी पडला होता. या चित्रपटाची निर्मिती विक्रम मल्होत्रा ​​यांनी केली आहे, अक्षय कुमारने भूषण कुमारच्या टी-सिरीज बॅनरसह ‘केप ऑफ गुड फिल्म्स’ च्या बॅनरखाली हा चित्रपट केला आहे. भूमी एकामागून एक चांगल्या चित्रपटांमध्ये काम करताना दिसत आहे. या चित्रपटात भूमी पेडणेकर आणि करण कपाडिया यांच्यासमवेत अर्शद वारसी, जीशु सेनगुप्ता आणि माही गिल आहेत.

भूमी पेडणेकरच्या ‘दुर्गामती’ या चित्रपटाचा ट्रेलर काही दिवसांपूर्वी रिलीज झाले होते. या चित्रपटात ती दणदणीत भूमिकेत दिसत होती. तिच्या या चित्रपटामध्ये माही गिलही एका विशेष भूमिकेत दिसत आहे. दुर्गामती चित्रपट अक्षय कुमार निर्मित आहे. पूर्वी या चित्रपटाचे नाव दुर्गावती असे होते परंतु ते बदलून दुर्गामती करण्यात आले. अक्षयला चित्रपट लक्ष्मी बॉम्बसारख्या कोणत्याही वादात पडायचे नसल्यामुळे अक्षयने अगोदरच चित्रपटाचे नाव बदलून घेतले आहे.

संबंधित बातम्या : 

KBC 12 | कमजोरीला बनवले शस्त्र, तुम्हाला माहितीय अरुणिमा सिन्हा यांचा थक्क करणारा प्रवास?

Indoo Ki Jawani | कियारा अडवाणीचा ‘इंदू की जवानी’ चित्रपट प्रदर्शित, कोरोना काळातही बॉक्स ऑफिसवर धमाल होणार?

( makers of ‘Durgamati’ are likely to be loss by crores)

Non Stop LIVE Update
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.
'मुंडे 12 वर्ष वनवासात, बऱ्याच गोष्टी इच्छेविरुद्ध...',अंधारेंचा टोला
'मुंडे 12 वर्ष वनवासात, बऱ्याच गोष्टी इच्छेविरुद्ध...',अंधारेंचा टोला.
अजितदादांची शरद पवारांकडून पुन्हा भरसभेत नक्कल अन्..., बघा व्हिडीओ
अजितदादांची शरद पवारांकडून पुन्हा भरसभेत नक्कल अन्..., बघा व्हिडीओ.
रामटेकमध्ये वाद पेटला; 'सुनील केदार मारूतीच्या बेंबीतील विंचू अन्..'
रामटेकमध्ये वाद पेटला; 'सुनील केदार मारूतीच्या बेंबीतील विंचू अन्..'.
2014 नंतर मला त्या बाबत कोणी विचारले नाही...राज ठाकरे यांनी सांगितले..
2014 नंतर मला त्या बाबत कोणी विचारले नाही...राज ठाकरे यांनी सांगितले...
मुख्यमंत्रिपदावरून विनोद तावडेंचं वक्तव्य, दिल्लीत कोणता चेहरा फिक्स?
मुख्यमंत्रिपदावरून विनोद तावडेंचं वक्तव्य, दिल्लीत कोणता चेहरा फिक्स?.
अमित ठाकरेंविरोधात सरवणकर भिडल्या, देशपांडेंवरही निशाणा, 'लाथ घालून..'
अमित ठाकरेंविरोधात सरवणकर भिडल्या, देशपांडेंवरही निशाणा, 'लाथ घालून..'.