Taarak Mehta | ‘तारक मेहता’च्या सेटवर मोठा वाद; ‘जेठालाल’वर निर्मात्यांनी फेकली होती खुर्ची, अभिनेत्रीचा खुलासा

"जेठालालच्या नावावर ही मालिका चालते. मात्र निर्मात्यांनी नेहमीच कलाकारांना वाईट वागणूक दिली. त्यांची गुंडगिरी इतकी वाढली होती की सेटवर काम करणं कठीण झालं होतं. माझा हा दावा सिद्ध करण्यासाठी माझ्याकडे काही रेकॉर्डिंग्ससुद्धा आहेत", असाही खुलासा मोनिकाने केला.

Taarak Mehta | 'तारक मेहता'च्या सेटवर मोठा वाद; 'जेठालाल'वर निर्मात्यांनी फेकली होती खुर्ची, अभिनेत्रीचा खुलासा
Dilip JoshiImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Aug 09, 2023 | 9:25 AM

मुंबई | 9 ऑगस्ट 2023 : छोट्या पडद्यावरील लोकप्रिय शो ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतो. गेल्या काही दिवसांत या मालिकेतील कलाकारांनी निर्मात्यांवर गंभीर आरोप केले. तर या मालिकेत तारक मेहताची भूमिका साकारणारे अभिनेते शैलेश लोढा यांनी निर्माते असित मोदी यांच्याविरोधातील खटला जिंकत 1 कोटी रुपये मिळवले आहेत. आता या मालिकेसंदर्भातील आणखी एक धक्कादायक किस्सा समोर आला आहे. मालिकेच्या शूटिंगदरम्यान मोठा वाद झाला आणि या वादादरम्यान ‘जेठालाल’ची भूमिका साकारणारे अभिनेते दिलीप जोशी यांच्यासोबत गैरवर्तणूक करण्यात आल्याचं कळतंय.

‘बावरी’ने सांगितला धक्कादायक किस्सा

‘तारक मेहता..’ या मालिकेत ‘बावरी’ची भूमिका साकारलेली अभिनेत्री मोनिका भदौरियाने याआधीही निर्मात्यांवर गंभीर आरोप केले होते. आता नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत तिने आणखी एक धक्कादायक किस्सा सांगितला आहे. तिने सांगितलं की मालिकेचे मुख्य अभिनेते दिलीप जोशी यांना चुकीची वागणूक देण्यात आली होती. त्यांच्यावर खुर्ची फेकून त्यांना दुखापत करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता.

मोनिकाने सांगितलं की एकेदिवशी मालिकेच्या सेटवर मोठा वाद झाला होता. मात्र त्यादिवशी ती सेटवर हजर नव्हती. दुसऱ्या दिवशी जेव्हा ती सेटवर पोहोचली तेव्हा तिला समजलं की मालिकेचे ऑपरेशन हेड सोहैल रमाणी यांनी दिग्गज अभिनेत्याला चुकीची वागणूक दिली. हा दिग्गज अभिनेता दुसरा तिसरा कोणी नसून ‘जेठालाल’ची भूमिका साकारणारे दिलीप जोशीच होते. मोनिकाने पुढे सांगितलं की खुर्ची फेकून दिलीप यांना दुखापत करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. या घटनेनंतर सोहैल यांना मालिकेतून काढण्याऐवजी त्यांना फक्त दोन वर्षांसाठी बॅन करण्यात आलं होतं.

हे सुद्धा वाचा

सेटवर गुंडगिरी

या घटनेनंतर दिलीप जोशी यांनी सोहैल यांच्याशी बोलणं पूर्णपणे बंद केलं होतं. “जेठालालच्या नावावर ही मालिका चालते. मात्र निर्मात्यांनी नेहमीच कलाकारांना वाईट वागणूक दिली. त्यांची गुंडगिरी इतकी वाढली होती की सेटवर काम करणं कठीण झालं होतं. माझा हा दावा सिद्ध करण्यासाठी माझ्याकडे काही रेकॉर्डिंग्ससुद्धा आहेत”, असाही खुलासा मोनिकाने केला.

'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?.
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्...
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्....
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?.
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र.
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला.
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद.
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?.
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच.
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली.