Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मलायका – अरबाज इतक्या वर्षांनंतर मुलासाठी आले एकत्र, अर्जुन कपूरची प्रतिक्रिया

Malaika Arora - Arbaaz Khan | घटस्फोटानंतर मलायका अरोरा हिच्या आयुष्यात अभिनेता अर्जुन कपूर याची एन्ट्री झाली तर, अरबाज याने नुकताच दुसरा संसार थाटला आहे... पण घटस्फोटाच्या अनेक वर्षांनंतर मलायका - अरबाज मुलगा अरहान याच्यासाठी आले एकत्र...

मलायका - अरबाज इतक्या वर्षांनंतर मुलासाठी आले एकत्र, अर्जुन कपूरची प्रतिक्रिया
Follow us
| Updated on: Mar 24, 2024 | 12:36 PM

अभिनेत्री मलायका अरोरा आणि अभिनेता अरबाज खान यांनी घटस्फोटानंतर स्वतःच्या आयुष्याला नव्याने सुरुवात केली. पण दोघांना कायम मुलगा अरहान याच्यासाठी एकत्र येताना पाहिलं. आता पुन्हा मलायका आणि अरबाज मुलासाठी एकत्र आले आहेत. यामागे मोठं कारण देखील आहे. अरहान खान याने पॉडकास्टच्या विश्वात पदार्पण केलं आहे. अरहान लवकरच ‘डम्ब बिरयानी’ पॉडकास्ट सीरिजच्या माध्यमातून चाहत्यांच्या भेटीस येणार आहे. सीरिजचं टीझर देखील प्रदर्शित करण्यात आलं आहे. टीझर फक्त प्रेक्षकांना नाहीतर, सेलिब्रिटींना देखील प्रचंड आवडला आहे. अभिनेता अर्जुन कपूर याने देखील टीझरवर स्वतःची प्रतिक्रिया दिली आहे.

‘डम्ब बिरयानी’ पॉडकास्ट सीरिजची सुरुवात अरहान खान याने खास मित्र आरुष वर्मा आणि देव रेयानी यांच्यासोबत केली आहे. टीझरमध्ये दाखवण्यात आलं काही की तिघे मित्र कोणत्यातरी विषयावर चर्चा करत आहेत. तर अरहान स्वतःच्या भविष्याबद्दल बोलताना दिसत आहे. सांगायचं झालं तर, मुलाच्या ‘डम्ब बिरयानी’ पॉडकास्ट सीरिजसाठी मलायका आणि अरबाज यांनी मिळून काम केलं आहे. सोहेल खान याने देखील अरहान याच्यासाठी मोठं पाऊल उचललं आहे.

हे सुद्धा वाचा

चाहत्यांना खरा आनंद झाला तो म्हणजे अभिनेता सलमान खान याची एन्ट्री झाली. ‘डम्ब बिरयानी’ पॉडकास्ट सीरिजमध्ये अभिनेता संजय कपूर याची पत्नी महीप कपूर देखील दिसत आहे. सध्या सर्वत्र अरहान खान याच्या ‘डम्ब बिरयानी’ पॉडकास्ट सीरिजची चर्चा रंगली आहे. सोशल मीडियावर देखील ‘डम्ब बिरयानी’ पॉडकास्ट सीरिजचे व्हिडीओ व्हायरल होत आहेत.

अरहान खान याला शुभेच्छा देत अभिनेत्री कतरिना कैफ म्हणाली, ‘अरहान ‘डम्ब बिरयानी’ पॉडकास्ट सीरिज प्रचंड मजेदार आहे. मी तुला पाहिलं होतं तेव्हा तू प्रचंड लहान होतास… मला तर वाटतं तू तसाच लहान राहा…’ तर अभिनेता अर्जुन कपूर याने देखील अरहान याला नव्या प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. ‘वेडेपणा… एक मोठा धमाका होणार आहे. मेरी तरह बिरयानी… आता सीरिजच्या प्रतीक्षेत आहे…’ सध्या सर्वत्र अरहान याच्या ‘डम्ब बिरयानी’ पॉडकास्ट सीरिजची चर्चा होत आहे.

अरहान खान याच्याबद्दल सांगायचं झालं तर, तो मलायका आणि अरबाज यांचा मुलगा आहे. अरहान याने अद्याप अभिनेता म्हणून करियरला सुरुवात केलेली नाही. पण त्याच्या चाहत्यांची संख्या फार मोठी आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त अरहान खान याची चर्चा रंगली आहे. मलायका आणि अरबाज देखील कायम मुलाबद्दल बोलताना दिसतात.