मलायका अरोरा – अर्जुन कपूर यांचं 2 महिन्यांपूर्वीचं झालय ब्रेकअप? फक्त नातं टिकवण्यासाठी…
Malaika Arora : 2 महिन्यांपूर्वीचं झालय मलायका अरोरा - अर्जुन कपूर यांचं ब्रेकअप? फक्त नातं टिकवण्यासाठी घेतलाय 'असा' निर्णय... गेल्या अनेक वर्षांपासून मलायका - अर्जुन करत आहेत एकमेकांना डेट... आता का रंगत आहेत दोघांच्या ब्रेकअपच्या चर्चा...
मुंबई | 5 जानेवारी 2024 : अभिनेत्री मलायका अरोरा गेल्या काही महिन्यापासून तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहे. नुकताच, मलायका हिचा पहिला पती आणि अभिनेता याने वयाच्या 57 व्या वर्षी दुसरं लग्न करत संसार थाटला आहे. तर दुसरीकडे, मलायका आणि अभिनेता अर्जुन कपूर यांच्या ब्रेकअपच्या चर्चांना उधाण आलं आहे. गेल्या अनेक दिवसांपासून दोघांना एकत्र स्पॉट करण्यात आलेलं नाही. एवढंच नाही तर, ख्रिसमस देखील मलायका हिने एकटीने तिच्या मैत्रिणींसोबत साजरा केला. शिवाय, सोशल मीडियावर देखील दोघांनी एकमेकांसाठी गेल्या काही दिवसांपासून कोणतीही पोस्ट केलेली नाही.. याच कारणांमुळे मलायका आणि अर्जुन यांच्या ब्रेकअपच्या चर्चांनी जोर धरला आहे.
सांगायचं झालं तर, मलायका आणि अर्जुन कायम त्यांच्या नात्याबद्दल बोलताना दिसतात. दोघांच्या लग्नाची चर्चा देखील चाहत्यांमध्ये रंगलेली आहे. दरम्यान, मलायका – अर्जुन यांच्या लग्नाची चर्चा रंगलेली असताना, दोघांच्या ब्रेकअपच्या चर्चा रंगत असल्यामुळे चाहत्यांना देखील मोठा धक्का बसला आहे. रिपोर्टनुसार, दोन महिन्यांपूर्वीच मलायका आणि अर्जुन यांचं ब्रेकअप झालं आहे.
सध्या सर्वत्र मलायका आणि अर्जुन यांच्या ब्रेकअपची चर्चा रंगली आहे. पण सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मलायका आणि अर्जुन दोघे नातं टिकवण्यासाठी प्रयत्न करत आहेत. अनेक वर्ष एकत्र राहिल्यानंतर एकमेकांना विसरणं फार कठीण होईल म्हणून दोघांनी त्यांच्या नात्याला आणखी वेळ देण्याचा निर्णय घेतल्याची देखील चर्चा रंगत आहे. पण यावर मलायका आणि अर्जुन यांनी अधिकृत वक्तव्य केलेलं नाही.
मलायका अरोरा आणि अरबाज खान
मलायका अरोरा आणि अरबाज खान यांनी 1998 मध्ये लग्न केलं होतं. दोघांच्या लग्नाच्या चर्चा देखील सर्वत्र तुफान रंगल्या होत्या. पण लग्नाच्या 18 वर्षांनंतर अरबाज – मलायका यांच्या घटस्फोटाने चाहत्यांना धक्का बसला. दोघांना एक 21 वर्षांचा मुलगा देखील आहे.
अरबाज खान याच्यासोबत घटस्फोट झाल्यानंतर अभिनेत्रीच्या आयुष्यात अर्जुन कपूर याची एन्ट्री झाली. सुरुवातील दोघांनी त्याचं नातं गुपित ठेवलं. अखेर 2019 मध्ये मलायका – अर्जुन यांनी त्यांच्या नात्याची कबुली दिली. दरम्यान, अर्जुन आणि मलायका यांना ट्रोल देखील करण्यात आलं. पण दोघांनी कोणताही विचार न करता फक्त त्यांच्या भावनांना महत्त्व दिलं. पण आता दोघांच्या ब्रेकअपच्या चर्चांनी जोर धरला आहे.