Malaika – Arjun | अर्जुन कपूर 10 वी पास; मलायका अरोरा हीच शिक्षण जाणून व्हाल थक्क

Malaika - Arjun | मलायका आणि अर्जुन आज कमावत आहेत कोट्यवधी रुपये, पण त्यांचं शिक्षण जाणून तुम्हीही व्हाल हैराण... सध्या सर्वत्र मलायका आणि अर्जुन यांच्या शिक्षणाची चर्चा...

Malaika - Arjun | अर्जुन कपूर 10 वी पास;  मलायका अरोरा हीच शिक्षण जाणून व्हाल थक्क
Follow us
| Updated on: Aug 29, 2023 | 8:00 PM

मुंबई | 29 ऑगस्ट 2023 : अभिनेता अर्जुन कपूर आणि अभिनेत्री मलायका अरोरा कायम त्यांच्या नात्यामुळे चर्चेत असतात… गेल्या काही दिवसांपासून दोघांच्या ब्रेकअपच्या चार्चांनी जोर धरला आहे. अभिनेता अरबाज खान याच्यासोबत घटस्फोट झाल्यानंतर मलायका हिच्या आयुष्यात अर्जुन कपूर याची एन्ट्री झाली. सुरुवातीला दोघांनी त्यांच्या नात्याबद्दल कोणाला काहीही काळू दिलं नाही. अखेर सर्वत्र नात्याच्या चर्चा रंगू लागल्यानंतर दोघांनी सर्वांसमोर नात्याची कबुली दिली. आशात दोघांच्या नात्याला अनेकांनी विरोध देखील केला. वयात अंतर असल्यामुळे मलायका आणि अर्जून यांना टिकेचा देखील सामना करावा लागला. पण मलायका आणि अर्जुन यांनी फक्त आणि फक्त स्वतःच्या भावनांना महत्त्व दिल. पण अनेक वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर देघांच्या ब्रेकअपच्या चर्चानी जोर धरला आहे.

मलायका आणि अर्जुन कायम त्यांच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत असले तरी देखील, बॉलिवूडमध्ये दोघांनी स्वतःची भक्कम ओळख तयार केली आहे. बॉलिवूडच्या अनेक प्रोजेक्टमध्ये काम करत मलायका आणि अर्जुन कोट्यवधी रुपये कमावतात. पण दोघांचं शिक्षण किती झालं आहे? हे जाणून तुम्हाला देखील मोठा धक्का बसेल… ब्रेकअपमुळे चर्चेत आलेल्या मलायका आणि अर्जुन यांच्या शिक्षणाबद्दल आज जाणून घेवू..

अर्जुन कपूर याने आर्य विद्या मंदिर शाळेतून शिक्षणाची सुरुवात केली. १० वी पास झाल्यानंतर अर्जुन ११ वी मात्र नापास झाला. त्यानंतर अर्जुन याने शिक्षण सोडलं. अर्जुन याने अभिनय क्षेत्राची निवड करत बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. आज अर्जुन बॉलिवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्यांपैकी एक आहे.

मलायका अरोरा आज मॉडेलिंग, जाहिराती आणि इतर मार्गांनी आज कोट्यवधी रुपये कमावते. पण मलायका हिचं शिक्षण जाणून तुम्ही देखील थक्क व्हाल. मलायका अरोरा हिच्या जन्म मुंबई येथील ठाणे याठिकाणी झाला. तिने स्वामी विवेकानंद स्कूल आणि हॉली क्रॉस शाळेतून शिक्षण पूर्ण केलं.

शालेय शिक्षण पूर्ण झाल्यानंतर मलायका हिने जय हिंद कॉलेज मध्ये प्रवेश घेतला. पण मॉडेलिंग आणि इतर कामांमध्ये व्यस्त असल्यामुळे तिला पदवीचं शिक्षण पूर्ण करता आलं नाही. मलायका आज बॉलिवूडमधील यशस्वी महिलांपैकी एक आहे.

मलायका हिच्याबद्दल सांगायचं झालं तर, अभिनेत्री कायम सोशल मीडियावर सक्रिय असते. सोशल मीडियावर मलायका हिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी मलायका कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते.

संतोष देशमुख प्रकरणात राष्ट्रवादीच्या महिला पदाधिकाऱ्याची CID चौकशी
संतोष देशमुख प्रकरणात राष्ट्रवादीच्या महिला पदाधिकाऱ्याची CID चौकशी.
'मुख्य आरोपीला वाचवण्यासाठी मोहरे...,' काय म्हणाले विजय वडेट्टीवार
'मुख्य आरोपीला वाचवण्यासाठी मोहरे...,' काय म्हणाले विजय वडेट्टीवार.
'...यानंतर लाडकी बहीण योजना बंद..,' ठाकरे गटाच्या नेत्याचं वक्तव्य
'...यानंतर लाडकी बहीण योजना बंद..,' ठाकरे गटाच्या नेत्याचं वक्तव्य.
' तर चॅट भाषणाआधीच व्हायरल केला असता...,' काय म्हणाले जितेंद्र आव्हाड
' तर चॅट भाषणाआधीच व्हायरल केला असता...,' काय म्हणाले जितेंद्र आव्हाड.
जिल्ह्यातील लोकांनी भूमिका घ्यायला हवी होती, संतोषच्या बंधूंची खंत
जिल्ह्यातील लोकांनी भूमिका घ्यायला हवी होती, संतोषच्या बंधूंची खंत.
तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल
तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल.
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती.
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे.
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस.
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार.