मुलगा अरहान याच्या गर्लफ्रेंडला धमकावते मलायका अरोरा? म्हणाली, ‘ती घरी येते तेव्हा…’
Malaika Arora : मुलगा अरहान खान याच्या गर्लफ्रेंडसोबत कसं आहे मलायका अरोरा हिचं नातं? खुद्द अभिनेत्रीने केलाय मोठा खुलासा..., सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त मलायका आणि तिचा मुलगा अरहान याची चर्चा...
मुंबई | 30 डिसेंबर 2023 : अभिनेत्री मलायका अरोरा गेल्या काही दिवसांपासून तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आली आहे. नुकताच मलायका अरोरा हिचा पहिला पती आणि अभिनेका अरबाज खान याने लग्न केलं आहे. वयाच्या 57 व्या वर्षी अभिनेत्याने 41 वर्षीय मेकअप आर्टिस्ट शुरा खान हिच्यासोबत लग्न केलं आहे. अरबाज खान याच्या लग्नात मुलगा अरहान खान देखील चर्चेत असतो. वडिलांच्या दुसऱ्या लग्नात अरहान याने सावत्र आईसोबत डान्स देखील केला. पण लग्नानंतर अरहान आई मलायका हिच्या घरी परतला. सांगायचं झालं तर, मलायका कायम मुलगा अरहान खान याच्याबद्दल सांगत असते.
एका मुलाखतीत मलायका अरोरा हिने मुलगा अरहान खान याच्या गर्लफ्रेंडबद्दल सांगितलं होतं. मुलाखतीत मलायका हिला, ‘तू तुझ्या मुलाच्या गर्लफ्रेंडला धमकावतेस का?’ असा प्रश्न विचारला. यावर अभिनेत्रीने दिलेले उत्तर आजही चर्चेत आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त मलायका आणि अरहान याची चर्चा रंगली आहे.
मुलाच्या गर्लफ्रेंडबद्दल मलायका म्हणाली, ‘माझ्या आजू-बाजूचे लोकं देखील मला सतत हाच प्रश्न विचारतात. पण मी प्रचंड कूल आई आहे. लोकं मला म्हणतात, ती बिचारी मुलगी… पण मला असं बिलकूल वाटत नाही. अरहान याची गर्लफ्रेंड आमच्या घरी येते. आम्ही एकत्र वेळ व्यतीत करतो…’ असं देखील अभिनेत्री म्हणाली.
पुढे मलायका अरहान याच्या स्वभावाबद्दल म्हणाली, ‘अरहान देखील प्रचंड समजदार आहे. तो मला कधीच कोणती गोष्ट विचारत नाही. म्हणजे मुलगा म्हणून त्याला कोणत्याच गोष्टीसाठी विचित्र वाटत नाही. त्यांच्या आयुष्यात माझं काय स्थान आहे… मला माहिती आहे. मला माझ्या मुलावर गर्व आहे. हे सर्व काय आहे आणि असं का? असे प्रश्न त्याने आजपर्यंत मला कधीच विचारले नाहीत… त्याच्या मनात जे काही आहे, ते सर्व अरहान मला सांगतो…’ असं देखील मलायका म्हणाली.
अरबाज आणि मलायका यांचा मुलगा अरहान खान 21 वर्षांचा आहे. लग्नाच्या 18 वर्षांनंतर दोघांनी घटस्फोट घेतला असता तरी, मलायका – अरबाज मुलगा अरहान याच्यासाठी कायम एकत्र येतात. सोशल मीडियावर तिघांचे फोटो आणि व्हिडीओ देखील तुफान व्हायरल होत असतात.
अरबाज याच्यासोबत घटस्फोट झाल्यानंतर मलायका हिच्या आयुष्यात अभिनेता अर्जुन कपूर याची एन्ट्री झाली. गेल्या अनेक वर्षांपासून मलायका आणि अर्जुन एकमेकांना डेट करत आहेत. नुकताच मलायका हिने लग्न करणार असल्याचं वक्तव्य केलं आहे. ज्यामुळे 2024 मध्ये मलायका लग्न करेल अशी देखील चर्चा रंगली आहे.