Malaika Arora: मलायका अरोराचं बहीण अमृतासोबत जोरदार भांडण; रेस्टॉरंटमध्ये सर्वांसमोर दोघींची तू तू-मै मै!

मलायकाचं बहिणीसोबत भांडण; मध्यस्थी करणाऱ्या नेहा धुपियालाही सुनावलं, म्हणाली "तू लांबच रहा"

Malaika Arora: मलायका अरोराचं बहीण अमृतासोबत जोरदार भांडण; रेस्टॉरंटमध्ये सर्वांसमोर दोघींची तू तू-मै मै!
Malaika and Amrita AroraImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Dec 28, 2022 | 2:52 PM

मुंबई: डिस्ने प्लस हॉटस्टार या ओटीटी प्लॅटफॉर्मवरील ‘मूव्हींग इन विथ मलायका’ हा शो सध्या चांगलाच चर्चेत आहे. या शोमध्ये अभिनेत्री मलायका अरोरा तिच्या खासगी आयुष्याविषयी बरेच खुलासे करताना दिसतेय. या शोच्या जुन्या एपिसोडमध्ये मलायकाने स्टँडअप कॉमेडी केली होती. मात्र या स्टँडअप कॉमेडीमध्ये तिने केलेली मस्करी बहीण अमृता अरोराला आवडली नाही. त्यानंतर आता या दोघींमध्ये पुन्हा एकदा जोरदार भांडण झालं आहे. एका रेस्टॉरंटमध्ये या दोघींमध्ये हे भांडण झालंय.

‘मूव्हींग इन विथ मलायका’च्या नव्या एपिसोडमध्ये मलायका तिच्या बहिणीसोबत फिरायला जाते. मात्र यावेळी ती एका गोष्टीवरून बहीण अमृतावर जोरात ओरडते. मलायका आणि अमृता गोव्यातील एका रेस्टॉरंटमध्ये जेवायला जातात. तिथून बाहेर निघताना मलायका तिचा मोबाइल फोन सापडत नाही.

हे सुद्धा वाचा

फोन सापडत नसल्याचा आरोप ती बहिणीवर करते. माझा फोन कुठे आहे, तू काही केलंस का, हा काही प्रँक आहे का, असं म्हणत मलायका अमृतावर ओरडते. त्यावर अमृता म्हणते, हा काही प्रँक नाही. तू नेहमीच मला काहीही बोलतेस, संपूर्ण रेस्टॉरंटने पाहिलंय की काय घडलंय? त्यावेळी दोघींमध्ये बाचाबाची होते. अखेर अमृता तिथून निघून जाते.

स्टँडअप कॉमेडीमुळे मलायका आणि अमृता यांच्यात आधीपासूनच शीतयुद्ध सुरू असतं. अभिनेत्री नेहा धुपिया या दोघांमधील वाद मिटवण्याचा प्रयत्न करते. मात्र तिलाही मलायका ओरडते. तू तर लांबच राहा, असं ती म्हणते.

अरोरा बहिणींमधील हा वाद सध्या सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत आहे. मलायकाच्या या शोमध्ये तिचा मुलगा अरहान याने मावशी अमृताची बाजू घेतली होती. “मी अमूच्या (अमृता अरोरा) बाजूने आहे. कारण ती तुझी (मलायका) जागा घेण्यासाठी स्वत: खूप प्रयत्न करत असते. माझ्यासाठी ती दुसऱ्या आईसारखीच आहे. मात्र मला असं वाटतंय की ती आता पहिल्या स्थानावर येतेय”, असं तो म्हणाला होता.

ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?.
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...