‘डिलीव्हरीनंतर 2 महिन्यात…’, मुलाच्या जन्मानंतर मलायका अरोराने घतलेला मोठा निर्णय
Malaika Arora on pregnancy: मलायका अरोराचं प्रेग्नेंसीबद्दल मोठं वक्तव्य..., मुलाच्या जन्मानंतर अभिनेत्रीने घेतलेला 'तो' मोठा निर्णय; अभिनेत्री म्हणाली, 'डिलीव्हरीनंतर 2 महिन्यात...', मलायका कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे असते चर्चेत
Malaika Arora on pregnancy: अभिनेत्री मलायका अरोरा हिला आज कोणत्याच ओळखीची गरज नाही. अभिनेत्री तिच्या प्रोफेशनल आयुष्यापेक्षा जास्त खासगी आयुष्यामुळे चर्चेत असते. एवढंच नाही तर, अभिनेत्री मुलाखतींमध्ये तिच्या खासगी आयुष्याबद्दल मोठे खुलासे करत असते. नुकताच झालेल्या मुलाखतीत देखील मलायकाने स्वतःच्या प्रेग्नेंसीबद्दल मोठा खुलासा केली आहे. डिलीव्हरीच्या 2 महिन्यात मलायकाने कामाला सुरुवात केली. अभिनेत्री कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते.
मलायका म्हणाली, ‘प्रेग्नेंट असताना देखील मी काम करत होती. जवळपास सात ते आठ महिन्यांपर्यंत मी शुटिंग केलं. तेव्हा मी MTV साठी काम करत होती. तेव्हा मी व्हीजे होती. त्यामुळे मी प्रवास आणि शुटिंगमध्ये कायम व्यस्त असायची. मला माझ्या मुलासाठी आणि माझ्या करियरसाठी काम करायचं होतं…’
View this post on Instagram
‘डिलीव्हरीनंतर देखील मी 2 महिन्यात पुन्हा नव्याने कामाला सुरुवात केली.’ असं देखील अभिनेत्री म्हणाली. याआधी देखील मलायकाने तिच्या प्रेग्नेंसीबद्दल वक्तव्य केलं होतं. ‘मुलाच्या जन्मानंतर तुझं करियर संपेल… असं देखील मला अनेक जण म्हणाले होते.’
‘मी प्रेग्नेंसी दरम्यान काम केलं. जेव्हा अरहानचा जन्म झाला तेव्हा, मी त्याला वचन दिलं होतं मी त्याला चांगलं आयुष्य देईल आणि स्वतःला वचन दिलं कधीच स्वतः ओळख कमी होऊ देणार नाही.’ असं देखील मलायका म्हणाली होती. मलायकाला कायम मुलगा अरहान याच्यासोबत स्पॉट केलं जातं. सांगायचं झालं तर, मलायका आणि अरहान यांनी मिळून मुंबईत एक रेस्ट्रोरेंट सुरु केलं आहे. दोघांना अनेक ठिकाणी स्पॉट केलं जातं. शिवाय मलायका कायम मुलासोबत सोशल मीडियावर फोटो पोस्ट करत असते.
View this post on Instagram
अरहान खान हा मलायका अरोरा आणि अभिनेता अरबाज खान यांचा मुलगा आहे. तब्बल 19 वर्ष संसार केल्यानंतर मलायका आणि अरहान यांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. 2017 मध्ये मलायका आणि अरबाज यांनी घटस्फोटाची घोषणा केली. त्यानंतर अभिनेत्री 2019 मध्ये अभिनेता अर्जुन कपूर याच्यासोबत रिलेशनशिपमध्ये असल्याची कबुली दिली.
पण मलायका आणि अर्जुन यांचं नातं देखील फार काळ टिकलं नाही. दोघांचं देखील ब्रेकअप झालं आहे. तर अरबाज खान याने वयाच्या 56 व्या वर्षी मेकअप आर्टिस्ट शुरा खान हिच्यासोबत लग्न केलं आहे. लग्नानंतर दोघांचे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असतात.