‘आम्ही सध्या हनीमूनपूर्वीच्या गोष्टी…’, अर्जुन कपूर याच्यासोबत असलेल्या नात्यावर स्पष्टच म्हणाली Malaika Arora

प्रेमाची नक्की काय असतं? मलायकाने स्पष्टच सांगितलं... गेल्या अनेक वर्षांपासून एकमेकांना डेट करत असलेले अर्जुन - मलायका कधी अडकणार विवाहबंधनात? लग्नापूर्वी हनीमूनबद्दल अभिनेत्री म्हणाली...

'आम्ही सध्या हनीमूनपूर्वीच्या गोष्टी...', अर्जुन कपूर याच्यासोबत असलेल्या नात्यावर स्पष्टच म्हणाली Malaika Arora
Follow us
| Updated on: Mar 19, 2023 | 9:55 AM

मुंबई : अभिनेत्री मलायका अरोरा आणि अभिनेता अर्जुन कपूर कायम त्यांच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत असतात. अनेक महत्त्वाच्या ठिकाणी मलायका आणि अर्जुन एकत्र दिसतात. अर्जुन देखील मलायकावर असलेलं प्रेम व्यक्त करत अभिनेत्रीसोबत फोटो पोस्ट करत असतो. अभिनेता अरबाज खान याच्यासोबत घटस्फोट झाल्यानंतर मलायका आणि अर्जुन यांच्या नात्याच्या चर्चा रंगू लागल्या. महत्त्वाचं म्हणजे अर्जुन आणि मलायका यांनी त्यांच्या नात्याची कबुली सर्वांसमोर दिली आहे. एवढंच नाही अनेक महत्त्वाच्या ठिकाणी मलायका – अर्जुन त्यांच्या नात्याबद्दल अनेक गोष्टी चाहत्यांसोबत शेअर करतात शिवाय, चाहत्यांना कपल गोल्स देखील देत असतात. नुकताच एका मुलाखतीत मलायकाला तिच्या खासगी आयुष्याबद्दल अनेक प्रश्न विचारण्यात आलं.

आपल्या पेक्षा कमी वयाच्या व्यक्तीला डेट करण्याचा अनुभव कसा आहे? यावर अभिनेत्री म्हणाली, ‘फार छान आहे… जेव्हा माझा घटस्फोट झाला, तेव्हा मला सांगितलं जायचं हा टॅग तुझ्यासोबत कायम राहिल. घटस्फोटानंतर माझ्या आयुष्यात प्रेम आल्यामुळे मी आनंदी आहे. मी माझ्यापेक्षा कमी वयाच्या व्यक्तीवर प्रेम केलं म्हणून अनेक जण मला म्हणाले तू तुझी प्रतिमा गमावली आहे…’

हे सुद्धा वाचा

पुढे अभिनेत्री म्हणाली, ‘मला फक्त एवढं सांगायचं आहे की, प्रेमाला कोणतंही बंधन नसतं, वय नसतं… जर तुम्ही प्रेम करत आहात, तर तुम्ही फक्त प्रेम करत आहात. मग तो मोठा व्यक्ती असो किंवा मग छोटा… ज्या मार्गावर आपण आहोत त्या गोष्टी  तेव्हा आपण गोष्टी स्पष्ट करु शकत नाही. मला समजून घेणारा जोडीदार मला भेटला म्हणून मी आभारी आहे… तो तरुण आणि त्याच्यामुळे मी देखील तरुण राहते… मला असं वाटतं मी उंच भरारी घेत आहे…’

अर्जुनसोबत असलेल्या नात्याचा खुलासा केल्यानंतर मलायकाला लग्नाबद्दल विचारण्यात आलं. ‘प्रत्येक गोष्टीचा शेवटी लग्नावर येवून का थांबतो… लग्न एक अशी गोष्ट आहे ज्याचा संवाद दोघांमध्ये होतो. लग्नाबद्दल काही असेल तर मी तुम्हाला नक्की सांगेल… सध्या आम्ही हनीमूनपूर्वीच्या गोष्टी अनुभवत आहोत..’ मलाकायने सांगितल्यानुसार अभिनेत्रीने अद्याप लग्नाचा विचार केलेला नाही.

मलायका आणि अरबाज यांच्याबद्दल सांगायचं झालं तर, दोघांचा २०१७ मध्ये घटस्फोट झाला. पण मुलासाठी अनेकदा मलायका आणि अरबाज एकत्र येतात. घटस्फोटानंतर मलायकाने अर्जुनचा हात धरला. जेव्हा अर्जुन आणि मलायका यांनी त्यांच्या नात्याची कबुली सर्वांसमोर दिली तेव्हा अनेकांनी टीका केली. पण अर्जुन आणि मलायका कोणत्याही गोष्टीला अधिक महत्त्व न देता फक्त आणि फक्त त्यांच्या भावनांना महत्त्व दिलं. आता दोघे अनेकांना कपल गोल्स देतात.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.