मलायका अरोराने केलीये चाहत्यांची फसवणूक? व्हायरल व्हिडीओ पाहून अनेक जण हैराण
Malaika Arora | कधी खासगी, तर कधी प्रोफेशनल आयुष्यामुळे चर्चेत असणारी मालायका आज वेगळ्याच कारणामुळे चर्चेत, व्हिडीओ व्हिडीओ पाहून अनेकांनी व्यक्त केला संताप... सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त मलायका अरोरा हिचीच चर्चा...
मुंबई | 26 फेब्रुवारी 2024 : अभिनेत्री मलायका अरोरा कधी खासगी, तर कधी तिच्या प्रोफेशनल आयुष्यामुळे चर्चेत असते. पण आता अभिनेत्री एक वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आली आहे. सोशल मीडियावर मलायका हिचा एक व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. व्हायरल व्हिडीओ पाहिल्यानंतर अभिनेत्रीने चाहत्यांची फसवणूक केली… असे आरोप अभिनेत्रीवर केले जात आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त मलायका अरोरा हिची चर्चा रंगलेली आहे. चाहते देखील अभिनेत्रीच्या व्हिडीओवर लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत आहेत. तर काहींनी व्हायरल व्हिडीओवर संताप व्यक्त केला आहे.
व्हिडीओमध्ये मलायका नॉ़नव्हेज खाताना दिसत आहे. व्हिडीओमध्ये मलायका हिच्यासोबत फराह खान, गुरु रंधावा, सई मांजरेकर आणि अर्शद वारसी दिसत आहे. व्हिडीओमध्ये सेलिब्रिटी जेवताना दिसत आहे. पण चाहत्यांनी मलायका हिला ट्रोल केलं आहे.
View this post on Instagram
व्हिडीओमध्ये मलायका नॉनव्हेज खात असल्याचं दिसत आहे. मलायका नॉनव्हेज खाते याची अडचण चाहत्यांना नाही. पण काही वर्षांपूर्वी अभिनेत्रीने स्वतःला शाकाहरी असल्याचं सांगितलं होतं. पण आता मलायका नॉनव्हेज खाताना दिसल्यामुळे अनेकांनी संताप व्यक्त करत, मलायकाने अनेकांची फसवणूक केली असं नेटकरी म्हणाले आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त मलायका हिची चर्चा रंगली आहे.
सांगायचं झालं तर, व्हायरल होत असलेला व्हिडीओ ‘झलक दिखला जा 11’ शोच्या सेट वरील आहे. शोमध्ये मलायका जजच्या भूमिकेत आहे. मलायका सोशल मीडियावर देखील कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी अभिनेत्री कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते.
मलायका तिच्या खासगी आयुष्यामुळे देखील कायम चर्चेत असते. अभिनेता अरबाज खान याच्यासोबत घटस्फोट झाल्यानंतर अभिनेत्रीच्या आयुष्यात अभिनेता अर्जुन कपूर याची एन्ट्री झाली. गेल्या अनेक वर्षांपासून मलायका आणि अर्जुन एकमेकांना डेट करत आहे. तर दुसरीकडे अरबाज याने शुरा खान हिच्यासोबत लग्न केलं आहे.