Malaika Arora | वाढदिवस अर्जुन कपूरचा चर्चा मलायकाचीच; ‘छैय्या छैय्या’ गाण्यावर धरला ठेका, पहा व्हिडीओ
अर्जुन आणि मलायका गेल्या काही वर्षांपासून एकमेकांना डेट करत आहेत. 2019 मध्ये या दोघांनी आपलं रिलेशनशिप ‘ऑफिशिअल’ केलं होतं. तेव्हापासून सोशल मीडियावर दोघं एकमेकांसोबतचे फोटो पोस्ट करत खुलेपणाने प्रेम व्यक्त करताना दिसतात.
मुंबई : अभिनेता अर्जुन कपूरने नुकताच त्याचा 38 वा वाढदिवस साजरा केला. या वाढदिवसानिमित्त त्याने धमाल पार्टीचं आयोजन केलं होतं. यावेळी अर्जुनची गर्लफ्रेंड आणि अभिनेत्री मलायका अरोरासुद्धा पार्टीला उपस्थित होती. पार्टीनंतर सोशल मीडियावर मलायकाचीच चर्चा होत आहे. कारण तिचा एक व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. अर्जुनच्या वाढदिवसाच्या पार्टीत मलायका तिच्या लोकप्रिय ‘छैय्या छैय्या’ या गाण्यावर मनसोक्त थिरकली. तिच्या डान्सच्या याच व्हिडीओने नेटकऱ्यांचं लक्ष वेधलं आहे. या व्हिडीओवर नेटकऱ्यांकडून विविध प्रतिक्रिया येत आहेत.
अर्जुनच्या वाढदिवसाच्या पार्टीला मलायकाने रेड अँड व्हाइट बॉडीकॉन ड्रेस परिधान केला होता. व्हायरल व्हिडीओमध्ये ती ‘छैय्या छैय्या’ या गाण्यावर बेधुंद थिरकताना दिसत आहे. तिच्यासोबत आणखी एक व्यक्ती या व्हिडीओत पहायला मिळतेय. काहींना मलायकाचा हा अंदाज पसंत पडला. तर काहींनी तिच्या डान्सवरून टीका करण्यास सुरुवात केली. ‘ती तिच्या आयुष्यात खुश आहे तर लोकांना काय समस्या आहे? तिच्यावर टीका करणारे आपण कोण’, असा सवाल एका नेटकऱ्याने केला. तर ‘वयाच्या पन्नाशीपर्यंत ती याच गाण्यावर डान्स करणार’, असं दुसऱ्याने लिहिलं. काहींनी मलायकाचा हा डान्स वल्गर असल्याचीही टीका केली आहे.
पहा व्हिडीओ
View this post on Instagram
अर्जुन आणि मलायका गेल्या काही वर्षांपासून एकमेकांना डेट करत आहेत. 2019 मध्ये या दोघांनी आपलं रिलेशनशिप ‘ऑफिशिअल’ केलं होतं. तेव्हापासून सोशल मीडियावर दोघं एकमेकांसोबतचे फोटो पोस्ट करत खुलेपणाने प्रेम व्यक्त करताना दिसतात. मलायकाने 2017 मध्ये अरबाज खानला घटस्फोट दिला. या दोघांना 20 वर्षांचा अरहान हा मुलगा आहे. विभक्त झाल्यानंतरही मुलासाठी या दोघांना नेहमीच एकत्र आल्याचं पाहिलं गेलं.
अर्जुन कपूरसोबतच्या रिलेशनशिपमुळे मलायकाला अनेकदा ट्रोलिंगचा सामना करावा लागला. या दोघांच्या वयातील अंतरामुळे नेटकऱ्यांनी त्यांची खिल्ली उडवली तर कधी टीका केली. आपल्या शोमध्ये स्टँडअप कॉमेडी करताना मलायका ट्रोलर्सना उपरोधिक उत्तर दिलं होतं. “दुर्दैवाने मी फक्त वयाने मोठी नाही तर माझ्यापेक्षा छोट्या व्यक्तीला डेट करतेय. माझ्यात हिंमत आहे. मी त्याचं आयुष्य उद्ध्वस्त करतेय, बरोबर बोलली ना? मी सर्वांना सांगू इच्छिते की मी त्याचं आयुष्य उद्ध्वस्त करत नाहीये”, असं ती म्हणाली होती.