मलायकाच्या वडिलांनी स्वतःचं आयुष्य संपवताच करीना कपूरने घेतला मोठा निर्णय
Malaika Arora Father Death: मलायका अरोरा हिच्या वडिलांचं निधन झाल्यानंतर करीना कपूर हिने घेतला मोठा निर्णय..., अभिनेत्रीच्या वडिलांनी स्वतःचं आयुष्य संपवल्यामुळे संपूर्ण बॉलिवूडमध्ये खळबळ माजली आहे. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ देखील व्हायरल होत आहेत.
Malaika Arora Father Death: बॉलिवूडची प्रसिद्ध आणि लोकप्रिय अभिनेत्री मलायका अरोरा हिच्या वडिलांचं निधन झालं आहे. मलायकाचे वडील अनिल मेहता यांनी इमारतीच्या सहाव्या मजल्यावरून उडी मारत स्वतःचं आयुष्य संपवलं आहे. घटना घडली तेव्हा मलायाक मुंबई नसून पुणे याठिकाणी होती. घटनेची माहिती मिळताच अभिनेत्री पुण्यातून मुंबईच्या दिशेने निघाली. अशात मलायकाची जवळची मैत्रीण आणि अभिनेत्री करीना कपूर देखील कोणताच विचार न करता थेट मलायकाच्या आई – वडिलांच्या घरी पोहोचली.
करीना आणि तिची बहीण करिश्मा कपूर कठीण काळात मलायका हिच्या सोबतच आहेत. मलायकाच्या आयुष्यात आलेला दुःखाचा डोंगर पाहाता करीना कपूर हिने देखील मोठा निर्णय घेतला आहे. करीनाने हिने येणाऱ्या दिवसांमधील सर्व कार्यक्रम रद्द केले आहेत.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, करीनाने या कठीण काळात तिचे कार्यक्रम पुढे नेण्याचा निर्णय घेतला आहे करीना गुरुवारी (12 सप्टेंबर) एका कार्यक्रमात सहभागी होणार होती पण करिनाच्या टीमने हा कार्यक्रम पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला. याचं कारण मलायका आणि अमृता यांच्यावर पडलेला दु:खाचा डोंगर.
सांगायचं झालं तर, करीना कपूर, करिश्मा कपूर, मलायका आणि अमृता अरोरा या चांगल्या आणि जवळच्या आहेत. चौघींना अनेकदा एकत्र पार्टी करताना स्पॉट करण्यात आलं आहे. सोशल मीडियावर देखील चौघींचे अनेक फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत असतात. कठीण काळात देखील करीना – करिश्मा यांनी मलायका – अमृता यांची साथ सोडली नाही.
मलायका अरोराच्या वडिलांचे पोस्टमार्टम रिपोर्ट
अभिनेत्री मलायका अरोराचे वडील अनिल मेहता यांच्या मृतदेहाचे कूपर पोस्ट मॉर्टम सेंटरमध्ये पोस्टमॉर्टम करण्यात आले. प्राथमिक अहवालात मृत्यूचे कारण अनेक जखमा असल्याचे सांगण्यात आलं आहे. व्हिसेरा फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठवण्यात आला. बुधवारी रात्री आठच्या सुमारास शवविच्छेदन करण्यात आलं. गुरुवारी त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार याप्रकरणी पोलीस अधिक चौकशी करत आहेत. अभिनेत्रीच्या वडिलांना इतक्या टोकाचं पाऊल का उचललं? या मागचं कारण अद्याप समोर आलेलं नाही.