मलायका अरोरा हिच्या वडिलांचं निधन की हत्या, शरीरावर जखमा कसल्या? गेल्या 24 तासांत झालं तरी काय?

Malaika Arora Father Death: मलायका अरोराच्या वडिलांच्या मृत्यूची धक्कादायक बातमी ते पोस्टमॉर्टम रिपोर्टपर्यंत... गेल्या 24 तासांमध्ये नक्की काय - काय घडलं? सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त मलायका अरोरा हिच्या वडिलांच्या मृत्यूची चर्चा...

मलायका अरोरा हिच्या वडिलांचं निधन की हत्या, शरीरावर जखमा कसल्या?  गेल्या 24 तासांत झालं तरी काय?
Follow us
| Updated on: Sep 12, 2024 | 12:43 PM

Malaika Arora Father Death: बॉलिवूडमध्ये सध्या खळबळ माजली आहे कारण अभिनेत्री मलायका अरोरा हिचे वडील अनिल मेहता यांनी स्वतःचं आयुष्या संपवल्याची माहिती मिळत आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अनिल मेहता यांनी इमारतीच्या 6 व्या मजल्यावरून उडी मारुन स्वतःला संपवलं आहे. सध्या याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत. सांगायचं झालं तर, मलायका प्रसिद्ध आणि लोकप्रिय सेलिब्रिटी असल्यामुळे बॉलिवूडच्या अनेकांनी अभिनेत्रीच्या घरी हजेरी लावली आहे. तर गेल्या 24 तासांमध्ये काय काय घडलं… याबद्दल जाणून घेऊ…

बुधवारी सकाळी 9 वाजता अनिल कुलदीप मेहता यांनी स्वतःचं आयुष्य संपवलं. त्यांनी वांद्रे येथील आयेशा मनोर अपार्टमेंटमध्ये असलेल्या घराच्या छतावरून उडी मारून स्वतःला संपवलं. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले, त्यानंतर मलायकाचा पहिला पती अरबाज खानही घटनास्थळी दिसला. त्यानंतर अभिनेता अरबाज खान देखील मलायकाच्या आई-वडिलांच्या घरी पोहोचला.

घटना घडली तेव्हा मलायाक मुंबई नसून पुणे याठिकाणी होती. घटनेची माहिती मिळताच अभिनेत्री पुण्यातून मुंबईच्या दिशेने निघाली. मलायका तिच्या आई – वडिलांच्या घरात मास्क लावून पोहोचली. अभिनेत्रीचे व्हिडीओ देखील सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.

मुलींसोबत शेवटचं बोलणं…

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी रात्री वडिलांसोबत बोलणं झाल्याची माहिती मलायका आणि अमृता यांनी पोलिसांना दिली. मलायका हिचे आई-वडील दोघे एकाच इमारतीत आणि एकाच मजल्यावर राहात होते. मलायकाच्या आई जॉयस पॉलीकार्प यांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘अनिल 11 सप्टेंबर रोजी सकाळी बोलायला आले नाहीत… ते रोज यायचे… तेव्हाच मला काहीतरी गडबड आहे असं वाटलं…’ सध्या याप्रकरणी चौकशी सुरु आहे.

मलायकाच्या बहिणीला काय म्हणाले वडील?

अमृता अरोरा हिने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, अमृता म्हणाली, ‘त्यांची प्रकृती स्थिर नव्हती… I am sick and Tired असं ते सतत बोलत होते…’, सांगायचं झालं तर, वडिलांच्या निधनामुळे अमृता – मलायका यांनी नीट बोलता देखील येत नव्हतं… वडिलांच्या निधनामुळे मलायका आणि तिच्या कुटुंबियांना मोठा धक्का बसला आहे.

मलायका अरोराच्या वडिलांचे पोस्टमार्टम रिपोर्ट

अभिनेत्री मलायका अरोराचे वडील अनिल मेहता यांच्या मृतदेहाचे कूपर पोस्ट मॉर्टम सेंटरमध्ये पोस्टमॉर्टम करण्यात आले. प्राथमिक अहवालात मृत्यूचे कारण अनेक जखमा असल्याचे सांगण्यात आलं आहे. व्हिसेरा फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठवण्यात आला. बुधवारी रात्री आठच्या सुमारास शवविच्छेदन करण्यात आलं. गुरुवारी त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहेत.

संतोष देशमुख यांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेतो -शरद पवार
संतोष देशमुख यांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेतो -शरद पवार.
'परभणी प्रकरणात खरी वस्तूस्थिती जाणून...,' काय म्हणाले शरद पवार ?
'परभणी प्रकरणात खरी वस्तूस्थिती जाणून...,' काय म्हणाले शरद पवार ?.
मस्साजोग प्रकरणात अख्खं गाव...',पवार भेटीवर काय म्हणाले खासदार सोनावणे
मस्साजोग प्रकरणात अख्खं गाव...',पवार भेटीवर काय म्हणाले खासदार सोनावणे.
संजय राऊत रेकी प्रकरणानंतर मंत्री नितेश राणे म्हणाले की मच्छर...
संजय राऊत रेकी प्रकरणानंतर मंत्री नितेश राणे म्हणाले की मच्छर....
देवेंद्र फडणवीस यांच्या अवतीभोवतीची मंडळी कोण ? संजय राऊत यांचा सवाल
देवेंद्र फडणवीस यांच्या अवतीभोवतीची मंडळी कोण ? संजय राऊत यांचा सवाल.
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर.
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला.
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी.
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं.
'निवडणुकीनंतर माज आलाय, पुढे पुन्हा अशी घटना घडली तर...'
'निवडणुकीनंतर माज आलाय, पुढे पुन्हा अशी घटना घडली तर...'.