मांडीवरील ती जखम नेमकी कशाने? अखेर मलायका अरोरा हिने केला अत्यंत मोठा खुलासा
मलायका अरोरा हिची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग ही बघायला मिळते. मलायका अरोरा ही तिच्या पर्सनल लाईफमुळे देखील जोरदार चर्चेत असते. मलायका अरोरा ही अर्जुन कपूर याला डेट करत आहे.
मुंबई : मलायका अरोरा हे कायमच चर्चेत असणारे एक नाव आहे. मलायका अरोरा हिची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फाॅलोईंग ही बघायला मिळते. मलायका अरोरा हिचा एक व्हिडीओ तूफान व्हायरल होताना दिसला. त्या व्हिडीओमध्ये मलायका अरोरा हिच्या पायाला मार लागलेला दिसला. इतकेच नाही तर मलायका अरोरा हिचा पाय काळा निळा झाल्याचे बघायला मिळाले. ज्यानंतर ते पाहून लोक हैराण झाले. आता त्यावरच मलायका अरोरा हिने भाष्य केले.
मलायका अरोरा हिच्या पायाची जखम पाहून लोक हैराण झाले. आता नुकताच मलायका अरोरा हिने एक मुलाखत दिलीये. या मुलाखतीमध्ये मलायका अरोरा ही त्याच जखमेबद्दल बोलताना दिसली. मलायका अरोरा म्हणाली की, त्यामध्ये लपवण्यासारखे काहीच नाहीये. मुळात म्हणजे मला ती जखम लवकर बरी होण्यासाठी खुले कपडे घालायचे होते.
मी बॉम्बे टाइम्स फॅशन वीकमध्ये खूप जोरात पडले आणि त्यामुळे माझ्या पायाला दुखापत झाली. मला यादरम्यान ती जखम झाकून ठेवायची नव्हती नाही तर ती जखम अजून वाढली असती. लोक पडतात, आपण जेंव्हा पडतो त्यावेळी स्वत: ला सांभाळावे लागते आणि पुढे जावे लागते. काही जखमांचे निशान पडतात आणि काहींचे नाही.
मलायका अरोरा ही नेहमीच तिच्या पर्सनल लाईफमुळे चांगली चर्चेत असते. मलायका अरोरा ही अरबाज खान याला घटस्फोट दिल्यापासून अभिनेता अर्जुन कपूर याला डेट करत आहे. मलायका अरोरा आणि अर्जुन कपूर हे कायमच एकसोबत फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना देखील दिसतात. काही दिवसांपूर्वीच मलायका अरोरा हिचा वाढदिवस झाला.
अर्जुन कपूर याने मलायका अरोरा हिच्या वाढदिवसासाठी खास पार्टीचे आयोजन केले. इतकेच नाही तर या पार्टीमधील एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसला. यामध्ये मलायका अरोरा आणि अर्जुन कपूर हे धमाकेदार डान्स करताना देखील दिसले. मलायका हिच्या वाढदिवसानिमित्त अत्यंत खास पोस्ट देखील अर्जुन कपूर याने शेअर केली होती.