घटस्फोटानंतर अखेर प्रेग्नंसीबद्दल केला मलायका अरोरा हिने मोठा खुलासा, 21 वर्षाच्या लेकाला म्हणाली, मी कधीच..
Malaika Arora Divorce : मलायका अरोरा ही कायमच चर्चेत असते. मलायका अरोरा सोशल मीडियावर सक्रिय असून आपल्या चाहत्यांसाठी खास फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना देखील दिसते. मलायका अरोरा हिने नुकताच तिच्या पर्सनल लाईफबद्दल अत्यंत मोठा खुसाला केलाय. विशेष म्हणजे अरहान खान याच्यासमोरच मलायकाने हा खुलासा केला.
मलायका अरोरा हे नाव कायमच चर्चेत असणारे एक नाव आहे. मलायका अरोरा हिची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग ही बघायला मिळते. मलायका अरोरा तिच्या पर्सनल लाईफमुळे जास्त चर्चेत असते. यावेळी लेक अरहान खान याच्या शोमध्ये नुकताच मलायका अरोरा ही पोहचली. यावेळी काही मोठे खुलासे करण्यात आले. पहिल्यांदाच आपल्या काही पर्सनल गोष्टीवर इतके जाहिरपणे बोलताना मलायका अरोरा दिसली. आता मलायका अरोरा आणि अरहान खान यांच्या या विधानाची जोरदार चर्चा ही रंगताना दिसत आहे.
शोमध्ये अरहान खान याने आई मलायका अरोरा हिला विचारले की, मी प्लान्ड (पूर्ण नियोजित प्रेग्नंसी) मुलगा होतो का? यावर मलायका अरोरा थेट म्हणाली की, असे अजिबात नव्हते आमचे काही नियोजन नव्हते किंवा माझे असे काहीच नव्हते की, मला या महिन्यात प्रेग्नंट व्हायचे किंवा या वयात मला बाळाला जन्म द्यायचा किंवा याच दिवशी बाळाला जन्म द्यायचे वगैरे मी काहीच ठरवले नव्हते.
या एकदम सिंपल गोष्टी आहेत, बस जेंव्हा व्हायचे तेंव्हा होणार. यावर अरहान खान थेट म्हणाला की, बस एक दिवस मी किक करायला लागलो. यावर मलायका अरोरा म्हणते होय असेच झाले. अरहान खान आता 21 वर्षांचा असून मलायका आणि अरबाज खानचे लग्न 1998 मध्ये झाले. लग्नानंतर कमी कालावधीमध्ये अरहान खान याला मलायकाने जन्म दिला.
मलायका अरोरा आणि अरबाज खान यांचा घटस्फोट 2017 मध्ये झाला. मात्र, घटस्फोट झाल्यानंतरही मुलासाठी अनेकदा एकसोबत मलायका आणि अरबाज खान येतात. हेच नाही तर काही दिवसांपूर्वीच अरबाज खान याने दुसरे लग्न शूरा खान हिच्यासोबत केले. शूरा खान आणि वडील अरबाज खानच्या लग्नात धमाल करताना अरहान खान दिसला, ज्याचे काही फोटोही व्हायरल झाले.
अरबाज खान याच्यासोबत घटस्फोट झाल्यापासून मलायका अरोरा ही अभिनेता अर्जुन कपूर याला डेट करताना दिसत आहे. अनेकदा अर्जुन कपूर आणि मलायका अरोरा हे एकसोबत स्पाॅट देखील होतात. लवकरच अर्जुन कपूर आणि मलायका अरोरा हे लग्न करणार असल्याची देखील जोरदार चर्चा ही रंगताना दिसली. नेहमीच सोशल मीडियावर अर्जुन कपूरचे फोटो शेअर करताना मलायका अरोरा दिसते.