Malaika Arora | मलायका अरोरा हिने शेअर केला अर्जुन कपूर याचा ‘हा’ अत्यंत खास फोटो, म्हणाली…
मलायका अरोरा ही कायमच चर्चेत असते. मलायका आपल्या चाहत्यांसाठी सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना दिसते. काही दिवसांपूर्वीच अत्यंत खास फोटो हे मलायका हिने शेअर केले होते. मलायका तिच्या पर्सनल लाईफमुळेही चर्चेचा विषय असते.
मुंबई : मलायका अरोरा ही तिच्या पर्सनल लाईफमुळे नेहमीच चर्चेत असते. मलायका अरोरा (Malaika Arora) आणि अर्जुन कपूर हे गेल्या काही वर्षांपासून एकमेकांना डेट करत आहेत. अर्जुन कपूर याने काही दिवसांपूर्वीच विदेशातील मलायका अरोरा हिचे फोटो (Photo) शेअर केले होते. मलायका अरोरा हिने काही दिवसांपूर्वी एका मुलाखतीमध्ये म्हटले होते की, अर्जुन कपूर याला किचनमध्ये साधा चहा देखील तयार करता येत नाही. मी स्वत: च्या हाताने त्याला जेवण तयार करून खाऊ घालते. मलायका अरोरा हिने अरबाज खान (Arbaaz Khan) याच्यासोबत घटस्फोट घेतल्यापासून ती अर्जुन कपूर याला डेट करत आहे. मलायका अरोरा आणि अरबाज खान यांचा 2017 मध्ये घटस्फोट झाला आहे.
अर्जुन कपूर असो किंवा मलायका अरोरा हे दोघे कायमच एकमेकांचे फोटो हे सोशल मीडियावर शेअर करताना दिसतात. काही दिवसांपूर्वी एक चर्चा प्रचंड रंगली होती की, अर्जुन कपूर याच्या पहिल्या बाळाची आई ही लवकरच मलायका अरोरा ही होणार आहे. मात्र, या चर्चांनंतर अर्जुन कपूर हा प्रचंड संतापला होता.
नुकताच अर्जुन कपूर याचा एक स्पेशल फोटो मलायका अरोरा हिने सोशल मीडियावर शेअर केला आहे. हा फोटो शेअर करताना मलायका हिने खास कॅप्शन देखील दिले आहे. हा फोटो शेअर करताना मलायका अरोरा हिने लिहिले की, मेरा बहुत आलसी बॉय…असे म्हटले. या फोटोमध्ये अर्जुन कपूर हा आळस देताना दिसतोय.
अर्जुन कपूर याचा हा फोटो मलायका अरोरा हिने इंस्टा स्टोरीवर शेअर केला आहे. आता अर्जुन कपूर याचा हा फोटो तूफान व्हायरल होताना दिसत आहे. अर्जुन कपूर याच्या या फोटोवर अनेकजण कमेंट देताना दिसत आहेत. काही दिवसांपूर्वीच दिलेल्या एका मुलाखतीमध्ये मलायका अरोरा ही चक्क म्हणाली होती की, मी दुसऱ्यांदा लग्न करण्याचा विचार करत आहे.
मी खरोखरच लग्नाबद्दल विचार करत असल्याचे मलायका हिने म्हटले होते. मी नेहमीच प्रेमावर विश्वास करते. पुढे मलायका म्हणाली होती की, हा पण मी नक्कीच हे सांगू शकत नाही की, मी दुसऱ्यांदा नेमके कधी लग्न करणार हे. कारण मला बऱ्याच गोष्टीचे सरप्राईज करण्यास नक्कीच आवडते. अगोदरच काही गोष्टी सांगितल्या तर मजा राहत नाही. मलायका आणि अर्जुन यांच्या लग्नाची चाहते आतुरतेने वाट पाहताना दिसत आहेत.