मलायका अरोरा हिच्या लेकाने केले 21 व्या वर्षात पर्दापण, अभिनेत्रीने खास व्हिडीओ शेअर करत
मलायका अरोरा ही कायमच चर्चेत असते. मलायका अरोरा हिची सोशल मीडियावर जबरदस्त फॅन फाॅलोइंग ही बघायला मिळते. मलायका अरोरा ही कायमच तिच्या पर्सनल लाईफमुळे चर्चेत असते. मलायका अरोरा अर्जुन कपूर याचा डेट करत आहे.
मुंबई : मलायका अरोरा हे कायमच चर्चेत असणारे एक नाव आहे. मलायका अरोरा हिची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग ही बघायला मिळते. मलायका अरोरा आणि अरबाज खान यांचा लेक अरहान आज 21 वर्षांचा झालाय. यानिमित्ताने मलायका अरोरा हिने सोशल मीडियावर एक अत्यंत खास पोस्ट शेअर केलीये. विशेष म्हणजे या पोस्टसोबतच मलायका अरोरा हिने एक व्हिडीओ देखील शेअर केलाय. या व्हिडीओमध्ये अरहान खान याची लहानपणाची झलक दाखवण्यात आली.
मलायका अरोरा हिने व्हिडीओ शेअर करत लिहिले की, माझा मुलगा आज 21 वर्षाचा झाला आहे आणि तुझ्यासाठी माझी इच्छा सोपी नक्कीच आहे. तू नेहमीच हसत राहा…मजा कर खेळ आणि प्रामाणिक रहा. आवडत्या लोकांसाठी आणि गोष्टींसाठी वेळ काढ. चांगली झोप घे आणि चांगली स्वप्ने पाहा. तुझ्या चेहऱ्यावर सदैव हसू राहू दे. वाढदिवसाच्या शुभेच्छा…
शेवटी मलायका हिने लिहिले की, तुझी आई तुझ्यावर सर्वात जास्त प्रेम करते. मलायका अरोरा हिची ही पोस्ट सोशल मीडियावर तूफान व्हायरल होताना दिसत आहे. मलायका अरोरा हिच्या या पोस्टवर कमेंट करून अनेकांनी त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. मलायका हिने शेअर केलेल्या व्हिडीओवरून हे स्पष्ट होते की, ती आपल्या मुलावर किती जास्त प्रेम करते.
View this post on Instagram
मलायका अरोरा आणि अरबाज खान हे कायमच अरहान याला सोडण्यासाठी विमानतळावर जातात. याचे काही फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले. अरहान खान हा विदेशात शिक्षण घेतोय. अरहान खान लवकरच भारतामध्ये परतणार असून आपल्या वडिलांच्या चित्रपटामध्ये काम करताना तो लवकरच दिसणार आहे.
मलायका अरोरा आणि अरबाज खान यांचा घटस्फोट झाल्यापासून तो मलायका अरोरा हिच्याकडे राहतो. मलायका अरोरा हिने काही दिवसांपूर्वीच दिलेल्या एका मुलाखतीमध्ये स्पष्ट केले की, अरबाज खान याच्यासोबत घटस्फोट घेणे नक्कीच तिच्यासाठी सोपे काम नव्हते. कारण या सर्व गोष्टींचा परिणाम हा तिचा मुलगा अरहान खान याच्यावर होणार होता. मात्र, माझ्या मुलाने खूप काही समजून घेतल्याचे तिने म्हटले होते.