अर्जुननंतर मलायका अरोराच्या आयुष्यात नवं प्रेम? एका कॉन्सर्टमधल्या त्या ‘मिस्ट्री मॅन’सोबतच्या फोटोंमुळे चर्चा
अभिनेत्री मलायका पुन्हा एकदा प्रेमात पडली असून तिचे तिच्या मिस्ट्री मॅनसोबतचे काही फोटो व्हायरल झाले आहेत. त्यामुळे अर्जुन कपूरसोबतच्या ब्रेकअपनंतर तिच्या आयुष्यात नवं प्रेम आल्याच्या चर्चा सुरु आहे.
बॉलिवूडची लोकप्रिय अभिनेत्री मलायका अरोराच्या ब्रेकअपच्या चर्चा अद्यापही सुरु आहेत. पण आता मलायका नवीन गोष्टीमुळे चर्चेत आलेली पाहायला मिळत आहे. काही फोटोंमुळे ती पुन्हा एकदा प्रेमात पडली आहे का? असा प्रश्न विचारण्यात येत आहे.
कॉन्सर्टमध्ये मधल्या फोटोंमुळे मलायका पुन्हा प्रेमात असल्याच्या चर्चा
मलायकाने पंजाबी गायक एपी ढिल्लोनंच्या कॉन्सर्टमध्ये हजेरी लावली होती.यावेळी ती त्याच्या गाण्यांची मजा घेत डान्स करताना दिसली. इतकंच नाही तर एपी ढिल्लो मलायका अरोराला हात धरून स्टेजवर देखील घेऊन गेला. पण या सगळ्यांमध्ये एका गोष्टीनं सगळ्यांचं लक्ष वेधलं तो म्हणजे मलायकासोबत असलेला मिस्ट्री मॅन
मलायका अरोरानं तिचा स्टायलिस्ट राहुल विजयसोबत या कॉन्सर्टमध्ये हजेरी लावली होती. त्या दोघांचे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत. मलायकानं यावेळी राहुलसोबतचे हे फोटो वीथ यू या एपी ढिल्लोनच्या गाण्यासोबत शेअर केले.
तर स्वत: एपी ढिल्लोननं या त्याच्या कॉन्सर्टमधील मलायकासोबतचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. त्यात एपी ढिल्लोन हा स्वत: खाली जाऊन मलायकाचा हात धरून तिला स्टेजवर घेऊन येतो. हा व्हिडीओ शेअर करत त्यानं कॅप्शन दिलं आहे की ‘पहले प्यार दी पहली कहानी’ वीथ यू या त्याच्या गाण्यातील एक ओळ लिहिली आहे.
मलायका अरोरा आणि राहुल विजय रिलेशनशिपमध्ये?
यावेळी मलायका आणि एपी ढिल्लोच्या जोडीचीही चर्चा झाली पण सतत मलायका सोबत दिसत असणाऱ्या राहुल विजयची जरा जास्तच चर्चा होतेय. यालाही एक कारण आहे,ते म्हणजे ते दोघं सतत डिनर डेटवर जाताना दिसत आहेत. त्यामुळे मलायका अरोरा आणि राहुल विजय हे दोघं रिलेशनशिपमध्ये असल्याचं म्हटलं जात आहे. अर्जुन कपूरसोबत ब्रेकअप झाल्यानंतर मलायका आणि राहुल विजयसोबतच्या रिलेशनशिपच्या चर्चांना उधान आलं आहे.
दरम्यान, काही दिवसांपूर्वी अर्जुन कपूरनं एका कार्यक्रमात हजेरी लावली असाताना तो सिंगल आहे असा खुलासा केला होता. तर दुसरीकडे आता मलायका ही कोणासोबत आहे याची माहिती सगळ्यांना जाणून घ्यायची आहे. मलायका मात्र तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर नेहमी काहीना काही शेअर करत असते. नुकतीच तिची रिलेशनशिपबद्दलचा पोस्टही खूप व्हायरल झाली होती.
View this post on Instagram