Video | ‘त्या’ व्हिडीओमुळे मलायका अरोरा ट्रोल, नेटकऱ्यांनी लावला क्लास, एक चूक पडली अभिनेत्रीला महागात
मलायका अरोरा हे कायमच चर्चेत असणारे एक नाव आहे. काही दिवसांपूर्वीच एक चर्चा तूफान रंगताना दिसली की, मलायका अरोरा आणि अर्जुन कपूर यांचे ब्रेकअप झाले आहे. अर्जुन कपूर याने शेअर केलेल्या पोस्टमुळे अनेकांना धक्का बसला. मात्र, यावर अजून अर्जुन किंवा मलायका यांनी भाष्य केले नाहीये.
मुंबई : मलायका अरोरा हे कायमच चर्चेत असणारे एक नाव आहे. मलायका अरोरा (Malaika Arora) आपल्या पर्सनल लाईफमुळे नेहमीच चर्चेत असते. अरबाज खान याच्यासोबत घटस्फोट घेतल्यापासून मलायका अरोरा ही बाॅलिवूड (Bollywood) अभिनेता अर्जुन कपूर याला डेट करत आहे. इतकेच नाही तर अनेकदा हे पार्ट्यांमध्येही स्पाॅट होतात. मलायका अरोरा हिची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग ही बघायला मिळते. मलायका अरोरा ही आपल्या चाहत्यांसाठी नेहमीच खास फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना देखील दिसते.
काही दिवसांपूर्वीच मलायका अरोरा हिने अर्जुन कपूर याचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला होता. मलायका अरोरा हिने अर्जुन कपूर याचा फोटो शेअर केल्यापासून ती नेटकऱ्यांच्या निशाण्यावर आली होती. त्याचे कारण म्हणजे अर्जुन कपूर याचा सेमी न्यूड फोटो तिने शेअर केला, जे लोकांना अजिबातच आवडले नव्हते.
काही दिवसांपूर्वी एक चर्चा तूफान रंगली होती, ती म्हणजे मलायका अरोरा ही लवकरच अर्जुन कपूर याच्या पहिल्या बाळाची आई होणार आहे. यानंतर अर्जुन कपूर याने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत संताप व्यक्त केला होता. ज्यानंतर कुठेतरी या चर्चांना मोठे ब्रेक लागले. अर्जुन कपूर आणि मलायका अरोरा हे एकमेकांचे फोटो नेहमीच शेअर करताना दिसतात.
अर्जुन कपूर आणि मलायका अरोरा यांच्या लग्नाची चाहते गेल्या कित्येक वर्षांपासून वाट पाहत आहेत. मात्र, कधीच मलायका अरोरा आणि अर्जुन कपूर हे त्यांच्या लग्नाबद्दल भाष्य करताना दिसत नाहीत. मलायका अरोरा ही कायमच पार्ट्या करताना दिसते. आता एका पार्टीमध्ये जातानाचा एक व्हिडीओ मलायका अरोरा हिचा व्हायरल होत आहे.
जेंव्हापासून मलायका अरोरा हिचा हा व्हिडीओ व्हायरल होत आहे, तेंव्हापासून ती नेटकऱ्यांच्या निशाण्यावर आलीये. या व्हिडीओमध्ये मलायका अरोरा हिला तिच्या कपड्यांमुळे व्यवस्थित चालता देखील येत नाहीये. मलायका अरोरा हिच्या व्हिडीओमध्ये दिसत आहे की, तिने धोती स्कर्ट घातले आहे.
या धोती स्कर्टमध्ये मलायका अरोरा हिला चालणे देखील अवघड झाले आहे, यामुळे आता मलायका अरोरा ही नेटकऱ्यांच्या निशाण्यावर आलीये. एकाने या व्हिडीओवर कमेंट करत म्हटले की, मलायका अरोरा हिला या कपड्यांमध्ये चालणे देखील कठीण झाल्याचे दिसत आहे मग ही पार्टीमध्ये डान्स कसा करणार आहे?