Malaika Arora | ‘हिचं आधार कार्ड शोधा…’, जुन्या व्हिडीओतून समोर आलं मलायकाचं खरं वय; तुम्हालाही बसेल धक्का
गूगल दाखवतं मलायका अरोरा हिचं खोटं वय? नक्की किती वर्षांची आहे अभिनेत्री... जुन्या व्हिडीओच्या माध्यमातून मलायकाचं खंर वय आलं समोर... सध्या सर्वत्र अभिनेत्रीचं वय चर्चेत
मुंबई | अभिनेत्री मलायका अरोरा आणि अभिनेता अर्जुन कपूर कायम त्यांच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत असतात. अनेक महत्त्वाच्या ठिकाणी मलायका आणि अर्जुन एकत्र दिसतात. अर्जुन देखील मलायकावर असलेलं प्रेम व्यक्त करत अभिनेत्रीसोबत फोटो पोस्ट करत असतो. पण आता मलायका अभिनेता अर्जुन कपूर याच्यासोबत असलेल्या नात्यामुळे नाही तर, पहिला पती आणि अभिनेता अरबाज खान याच्यासोबत असलेल्या एका व्हिडीओमुळे चर्चेत आली आहे. सध्या अरबाज आणि मलायकाचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. महत्त्वाचं म्हणजे, व्हायरल होत असलेल्या व्हिडीओच्या माध्यमातून अभिनेत्रीचं खरं वय समोर आलं आहे. ज्यामुळे सर्वत्र मलायका अरोरा हिची फिटनेस आणि वयाची चर्चा रंगत आहे.
सध्या सोशल मीडियावर सर्वत्र फक्त आणि फक्त मलायका अरोरा हिचा जुना व्हिडीओ व्हायरल होत आहे. व्हिडीओमध्ये साजिद खान, मलायका आणि अरबाज खान यांची मुलाखत घेताना दिसत आहे. ज्यामध्ये साजिद अभिनेत्रीला विचारतो, ‘तू अरबाज याच्यापेक्षा २ वर्षांनी मोठी आहे, तर तुला कसं वाटतं…’ यावर मलायका म्हणते, ‘मला चांगलं वाटतं…’
दरम्यान, व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर, चाहते आश्चर्यचकित झाले आहेत. कारण विकिपीडियावर अरबाज खान याचं वय 55 वर्षे दाखवलं आहे, तर प्रश्न असा आहे की जर मलायका अरबाजपेक्षा दोन वर्षांनी मोठी असेल तर त्यानुसार अभिनेत्रीचं वय 57 वर्षे असायला हवं. तर दुसरीकडे विकिपीडियावर मलायकाचं वय ४९ वर्षे आहे. अशात चाहत्यांना अभिनेत्रीच्या वयाबद्दल मोठा प्रश्न पडला आहे.
सध्या व्हायरल होत असलेल्या व्हिडीओवर नेटकरी कमेंट आणि लाईक्सचा वर्षाव करत आहेत. एक नेटकरी व्हिडीओवर कमेंट करत म्हणाला, ’57 व्या वर्षी देखील सुंदर दिसत आहे. स्वतःला इतकं तंदुरुस्त आणि मजबूत ठेवल्यामुळे 30 वर्षांचा माणूस तिच्यावर प्रेम करतो…’ मलायका कायम तिच्या फिटनेस आणि सौंदर्यामुळे चर्चेत असते.
मलायका आणि अरबाज यांच्याबद्दल सांगायचं झालं तर, दोघांचा २०१७ मध्ये घटस्फोट झाला. पण मुलासाठी अनेकदा मलायका आणि अरबाज एकत्र येतात. घटस्फोटानंतर मलायकाने अर्जुनचा हात धरला. जेव्हा अर्जुन आणि मलायका यांनी त्यांच्या नात्याची कबुली सर्वांसमोर दिली तेव्हा अनेकांनी टीका केली. पण अर्जुन आणि मलायका कोणत्याही गोष्टीला अधिक महत्त्व न देता फक्त आणि फक्त त्यांच्या भावनांना महत्त्व दिलं. आता दोघे अनेकांना कपल गोल्स देतात. (malaika arora and arjun kapoor)