Malaika Arora | ‘हे चुकीचं, कॅमेरा पाहून उचलतात फायदा’; मलायकासोबत घडलेली घटना पाहून नेटकरी भडकले

या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत. 'हा तर छळ आहे', असं एकाने म्हटलंय. तर 'हे खूप चुकीचं आहे. कॅमेरा पाहून हे लोक अती करतात आणि नंतर सेलिब्रिटींना दोष दिला जातो,' असं दुसऱ्या युजरने लिहिलंय.

Malaika Arora | 'हे चुकीचं, कॅमेरा पाहून उचलतात फायदा'; मलायकासोबत घडलेली घटना पाहून नेटकरी भडकले
Malaika AroraImage Credit source: Youtube
Follow us
| Updated on: May 19, 2023 | 10:52 AM

मुंबई : गेल्या काही वर्षांपासून पापाराझींचं कल्चर मोठ्या प्रमाणात वाढलं आहे. टेलिव्हिजन किंवा बॉलिवूड सेलिब्रिटी एखाद्या रेस्टॉरंटबाहेर, एअरपोर्टवर किंवा जिमला जाताना जरी दिसले तरी पापाराझींचे कॅमेरे त्यांचा सर्वत्र पाठलाग करताना दिसतात. पापाराझींनी क्लिक केलेले सेलिब्रिटींचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतात. त्यानंतर या व्हायरल व्हिडीओंवर नेटकऱ्यांकडून विविध प्रतिक्रिया येऊ लागतात. त्यातील सेलिब्रिटींच्या वागणुकीवर कधी टीका केली जाते, तर कधी त्यांच्या ड्रेसिंग सेन्सवरून ट्रोल केलं जातं. अभिनेत्री मलायका अरोराचा असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चर्चेत आला आहे. मलायका नुकतीच एका रेस्टॉरंटमध्ये डिनरसाठी गेली होती. मात्र तिथून बाहेर येताना तिच्यासोबत जे घडलं, त्यावरून नेटकरी चांगलेच भडकले आहेत.

एका पापाराझी अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. यामध्ये मलायका एका रेस्टॉरंटमधून बाहेर येताना दिसतेय. ती बाहेर येताच दोन मुली तिच्या पुढे मदतीची मागणी करतात. यावेळी मलायकाच्या चेहऱ्यावर असहजपणा स्पष्ट दिसून येतो. त्या मुली तिच्या जवळ जाऊन सतत मदतीची मागणी करतात. अखेर सुरक्षारक्षक त्यांना मागे केल्यानंतर मलायका तिच्या कारमध्ये बसते. कारमध्ये बसल्यानंतरही दार बंद करण्याआधी एक मुलगी मलायकाजवळ उभी राहते आणि तिच्याकडे पैशांची मागणी करते.

हे सुद्धा वाचा

पहा व्हिडीओ

सुरक्षारक्षकांच्या प्रयत्नानंतरही त्या मुलगी कारचा दरवाजा बंद करू देत नाहीत. अखेर कसंबसं मलायका गाडीचा दरवाजा बंद करते. त्यानंतरही काचेतून त्या मुली तिच्याशी बोलताना दिसत आहेत. या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत. ‘हा तर छळ आहे’, असं एकाने म्हटलंय. तर ‘हे खूप चुकीचं आहे. कॅमेरा पाहून हे लोक अती करतात आणि नंतर सेलिब्रिटींना दोष दिला जातो,’ असं दुसऱ्या युजरने लिहिलंय. काहींनी मलायकालाही फटकारलं आहे. ‘इतकं श्रीमंत आणि सेलिब्रिटी असूनही काय उपयोग? जर ती या गरीब मुलांची मदत करू शकत नाही’, अशी टीका नेटकऱ्यांनी केली.

याआधी अभिनेत्री करीना कपूरसोबत अशीच एक घटना घडली होती. सैफ आणि करीना त्यांच्या कारमधून बाहेर पडतात. यावेळी सैफ पुढे रेस्टॉरंटमध्ये निघून जातो. मात्र करीना जेव्हा चालू लागते, तेव्हा अचानक एक चाहती तिच्याजवळ येऊन तिला स्पर्श करण्याची इच्छा व्यक्त करते. “एकदा फक्त हात लावू दे”, असं ती वारंवार करीनाला म्हणते. तितक्यात सुरक्षारक्षक पुढे येऊन त्या महिलेला बाजूला करतो. करीना तेव्हासुद्धा स्मितहास्य करत पुढे निघून जाते.

ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?.
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...