‘घटस्फोटानंतर मला पूर्ण…’, मलायका अरोरा हिचं मोठं वक्तव्य, ‘बेड आणि स्पेस शेअर करणं म्हणजे…’

Malaika Arora : घटस्फोटानंतर मलायका अरोरा हिचा मोठा खुलासा, अनेक महिलांना सल्ला देत म्हणाली, 'पुन्हा बेड आणि स्पेस शेअर करणं म्हणजे...', सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त मलायका हिच्या वक्तव्याची चर्चा...

'घटस्फोटानंतर मला पूर्ण...', मलायका अरोरा हिचं मोठं वक्तव्य, 'बेड आणि स्पेस शेअर करणं म्हणजे...'
Follow us
| Updated on: Feb 24, 2024 | 3:45 PM

मुंबई | 24 फेब्रुवारी 2024 : अभिनेत्री मलायका अरोरा हिने एका चॅट शोमध्ये घटस्फोट आणि आयुष्यात पुन्हा झालेल्या प्रेमावर मोठं वक्तव्य केलं आहे. पहिला पती अरबाज खान याच्याबद्दल अभिनेत्री म्हणाली, ‘अरबाज माझा चांगला मित्र आहे असं मी म्हणणार नाही. पण आमच्या नात्यात आपुलकी आणि आदर आहे. आम्ही एकमेकांसोबत हेल्दी रिलेशनशिप शेअर करतो. मला असं वाटतं आमच्यासाठी आमचा मुलगा अधिक महत्त्वाचा आहे.’

घटस्फोटानंतर दुसऱ्या व्यक्तीला डेट करण्यावर देखील मलायका हिने मोठं वक्तव्य केलं. ‘घटस्फोटानंतर पुन्हा नात्यावर विश्वास ठेवणं कठीण असतं. महिलांच्या मनात एक भीती असते. पण मी एक गोष्ट सांगते, पुन्हा नव्या व्यक्तीसोबत नात्याला सुरुवात करणं ही गोष्ट अशक्त नाही. मला असं वाटतं महिलांनी पुन्हा नव्याने जगायला शिकायला हवं…’

पुढे मलायका म्हणाली, ‘प्रत्येकाला त्याच्या आत्मविश्वासाने पुन्हा आयुष्याची सुरुवात करायला हवी. घडलेल्या घडनेतून बाहेर येणं कठीण असतं. पण सर्वकाही मागे सोडून आयुष्य जगता आलं पाहिजे. अशात परिस्थितीत घटस्फोटानंतर पहिल्यांदा फ्रिडम मिळाल्यासारखं वाटतं…’

हे सुद्धा वाचा

‘घटस्फोटानंतर मला पहिल्यांदा मला पूर्ण बेड मिळाला. जी माझ्यासाठी अत्यंत नवीन गोष्ट होती. तुमच्या आयुष्यात बेड आणि स्पेस शेअर करण्यासाठी कोणी नाही… ही सुद्धा आनंददायी गोष्ट आहे.’ असं देखील अभिनेत्री म्हणाली. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त मलायका अरोरा हिची चर्चा रंगली आहे.

मलायका सध्या अभिनेता अर्जुन कपूर याच्यासोबत रिलेशनशिपमध्ये आहे. जेव्हा अर्जुन आणि मलायका यांनी प्रेमाची कबुली दिली तेव्हा अनेकांनी दोघांना ट्रोल केलं. पण दोघांनी देखील होणाऱ्या विरोधाला अधिक महत्त्व न देता फक्त स्वतःच्या भावनांना महत्त्व दिलं.

अरबाज खान याने देखील घटस्फोटाच्या 6 वर्षांनंतर 41 वर्षीय शुरा खान हिच्यासोबत लग्न केलं. अरबाज खान याच्या लग्नाचे फोटो आणि व्हिडीओ देखील सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले. अरबाज याच्या लग्नात मुलगा अरहान खान देखील उपस्थित होता.

मलायका कायम तिच्या खासगी आणि प्रोफेशनल आयुष्यामुळे चर्चेत असते. सोशल मीडियावर देखील अभिनेत्री कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर मलायका हिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. दरम्यान, अरबाज खान याने दुसरं लग्न केल्यानंतर मलायका चर्चेत आली होती.

खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.