मुलासोबत फोटो पोस्ट करत मलायका म्हणाली…, अभिनेत्रीची भावूक पोस्ट चर्चेत

अभिनेत्री मलायका अरोरा आणि अभिनेता अरबाज खान यांचा घटस्फोट झाला आहे. पण घटस्फोटानंतर देखील दोघे पुन्हा एकदा एकत्र आले आहेत... मलयाका हिने सोशल मीडियावर मुलासोबत खास फोटो केला आहे. सध्या सर्वत्र फक्त मलायका आणि तिच्या मुलाच्या फोटोची चर्चा रंगली आहे....

मुलासोबत फोटो पोस्ट करत मलायका म्हणाली..., अभिनेत्रीची भावूक पोस्ट चर्चेत
Follow us
| Updated on: Mar 31, 2024 | 12:24 PM

अभिनेत्री मलायका अरोरा आणि अभिनेता अरबाज खान यांचा घटस्फोट झाला आहे. पण घटस्फोटानंतर देखील दोघे अनेक ठिकाणी एकत्र दिसतात. घटस्फोटानंतर देखील मलायका आणि अर्जुन फक्त एका व्यक्तीसाठी एकत्र येतात. ती व्यक्ती दिसरी तिसरी कोणी नाहीतर, त्यांना मुलगा अरहान खान आहे. अरहान याने पॉडकास्टच्या विश्वात पदार्पण केलं आहे. अरहान लवकरच ‘डम्ब बिरयानी’ पॉडकास्ट सीरिजच्या माध्यमातून चाहत्यांच्या भेटीस येणार आहे. शो लॉन्च होण्यापूर्वी शुक्रवारी एका मोठ्या पार्टीचं आयोजन करण्यात आलं होतं.

पार्टीसाठी अरोरा आणि खान कुटुंबाने हजेरी लावली. एवढंच नाहीतर, मुलासाठी अरबाज आणि मलायका पुन्हा एकत्र आले. यावेळी अरबाज याच्यासोबत पत्नी शुरा खान देखील होती. पार्टीमध्ये मलायका, बहीण अमृता अरोरा, सीमा सजदेह यांच्यासोबत अरहान याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

पार्टी संपल्यानंतर मलायका हिने सोशल मीडियावर मुलासोबत खास फोटो पोस्ट केला आहे. इन्स्टाग्राम स्टोरीवर फोटो मुलासोबत फोटो पोस्ट करत अभिनेत्री म्हणाली, ‘मला तुझ्यावर गर्व वाटत आहे…’ सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त मलायका हिच्या पोस्टची चर्चा रंगली आहे.

सांगायचं झालं तर, सात दिवसांपूर्वी अरहान याच्या ‘डम्ब बिरयानी’ चा ट्रेलर प्रदर्शित झाला. ट्रेलरला चाहत्यांकडून प्रचंड प्रेम मिळालं. ‘डम्ब बिरयानी’ पॉडकास्ट सीरिजसाठी मलायका आणि अरबाज यांनी मिळून काम केलं आहे. सोहेल खान याने देखील अरहान याच्यासाठी मोठं पाऊल उचललं आहे.

नव्या प्रसावासाठी अरहान याला दिल्या अनेक सेलिब्रिटींनी शुभेच्छा

अरहान खान याला शुभेच्छा देत अभिनेत्री कतरिना कैफ म्हणाली, ‘अरहान ‘डम्ब बिरयानी’ पॉडकास्ट सीरिज प्रचंड मजेदार आहे. मी तुला पाहिलं होतं तेव्हा तू प्रचंड लहान होतास… मला तर वाटतं तू तसाच लहान राहा…’ तर अभिनेता अर्जुन कपूर याने देखील अरहान याला नव्या प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. ‘वेडेपणा… एक मोठा धमाका होणार आहे. मेरी तरह बिरयानी… आता सीरिजच्या प्रतीक्षेत आहे…’ सध्या सर्वत्र अरहान याच्या ‘डम्ब बिरयानी’ पॉडकास्ट सीरिजची चर्चा होत आहे.

'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला.
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद.
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?.
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच.
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली.
खातेवाटपानंतर पालकमंत्रिपदासाठी रस्सीखेच, कोणत्या जिल्ह्यात स्पर्धा?
खातेवाटपानंतर पालकमंत्रिपदासाठी रस्सीखेच, कोणत्या जिल्ह्यात स्पर्धा?.
महायुतीचं खातेवाटप जाहीर, फडणवीस-दादा अन् शिंदेंच्या वाटेला कोणत खातं?
महायुतीचं खातेवाटप जाहीर, फडणवीस-दादा अन् शिंदेंच्या वाटेला कोणत खातं?.
250 कोटींचा पीकविमा घोटाळ्याचा पॅटर्न, धस अण्णा यांचे मुंडेंवर निशाणा
250 कोटींचा पीकविमा घोटाळ्याचा पॅटर्न, धस अण्णा यांचे मुंडेंवर निशाणा.
'माझ्या मुलाचा मर्डर..', सोमनाथ सूर्यवंशीच्या आईच्या पवारांसमोरच संताप
'माझ्या मुलाचा मर्डर..', सोमनाथ सूर्यवंशीच्या आईच्या पवारांसमोरच संताप.