Malaika Arora: अरबाजच्या कुटुंबीयांविषयी मलायका झाली व्यक्त; “त्यांच्यासाठी मी कधीच…”

अरबाजच्या कुटुंबात मलायकाचं स्थान कुठे? स्वत:च शोमध्ये काल खुलासा

Malaika Arora: अरबाजच्या कुटुंबीयांविषयी मलायका झाली व्यक्त; त्यांच्यासाठी मी कधीच...
अरबाजच्या कुटुंबात मलायकाचं स्थान कुठे? स्वत:च शोमध्ये काल खुलासाImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Dec 16, 2022 | 3:31 PM

मुंबई: अभिनेत्री मलायका अरोराचा ‘मूव्हींग इन विथ मलायका’ हा शो चांगलाच चर्चेत आहे. नुकत्याच पार पडलेल्या एका एपिसोडमध्ये निर्माता-दिग्दर्शक करण जोहरने हजेरी लावली होती. यावेळी करणशी बोलताना मलायका ही अरबाज खानच्या कुटुंबातील तिच्या स्थानाविषयी व्यक्त झाली. मलायका आणि अरबाजने 2017 मध्ये घटस्फोट घेतला. त्यानंतर तिचं त्याच्या कुटुंबीयांशी नातं कसं आहे, याविषयी ती मनमोकळेपणाने व्यक्त झाली.

या एपिसोडमध्ये मलायकाने तिच्या अपघाताच्या कटू आठवणी सांगितल्या. इतकंच नव्हे तर शुद्धीवर आल्यानंतर तिच्या डोळ्यांसमोर असलेली पहिली व्यक्ती अरबाज खान होता, असंही तिने सांगितलं. त्यावर करण जोहरनेही अरबाजच्या कुटुंबीयांचा उल्लेख केला. “मला आठवतंय की तुझ्या अपघातानंतर संपूर्ण कुटुंब तुला भेटायला आलं होतं. ते तुझ्यासोबत तिथे होते. काही नाती ही कायम सोबत असतात”, असं करण म्हणाला.

मलायका म्हणाली, “त्यांच्या यादीत मी कधीच पहिल्या क्रमांकावर मी नसेन, पण अरहान आहे, म्हणून ते माझी काळजी करतात आणि हीच योग्य गोष्ट आहे.”

हे सुद्धा वाचा

2 एप्रिल 2022 रोजी मलायकाचा खोपोलीत अपघात झाला होता. ती शूटिंगनंतर पुण्याहून मुंबईला येत होती तेव्हा हा अपघात झाला होता. या अपघातात मलायकाच्या डोक्याला मार लागला होता.

अपघाताच्या कटू आठवणी

“काही तास मला समोरचं काहीच दिसत नव्हतं. मला खरंच वाटलं की माझा जीव गेलाय आणि मी आता माझ्या मुलाला कधीच भेटू शकणार नाही. मला रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. उपचारानंतर जेव्हा मी पहिल्यांदा मी डोळे उघडले तेव्हा मला अरबाज दिसला. मला नीट दिसतंय का, हे तो मला विचारत होता. मी शुद्धीवर आहे का हे तपासून पाहण्यासाठी तो हात दाखवून ही किती बोटं आहेत असं विचारत होता. काही सेकंदांसाठी मला वाटलं होतं की मी पुन्हा भूतकाळात गेले,” असा अनुभव मलायकाने सांगितला होता.

खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.