अर्जुनने ‘सिंगल’ असल्याचं म्हणताच मलायकाची पोस्ट; नेटकऱ्यांमध्ये चर्चा

अभिनेता अर्जुन कपूरने 'सिंगल' असल्याचं जाहीर केल्यानंतर मलायका अरोराने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. मलायकाच्या या पोस्टने नेटकऱ्यांचं लक्ष वेधलंय. गेल्या काही महिन्यांपासून अर्जुन-मलायकाच्या ब्रेकअपच्या चर्चा होत्या.

अर्जुनने 'सिंगल' असल्याचं म्हणताच मलायकाची पोस्ट; नेटकऱ्यांमध्ये चर्चा
अर्जुन कपूर, मलायका अरोरा
Follow us
| Updated on: Nov 05, 2024 | 12:35 PM

‘सिंघम अगेन’ या चित्रपटाच्या प्रमोशननिमित्त आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात अभिनेता अर्जुन कपूरने त्याच्या ब्रेकअपवर शिक्कामोर्तब केला. गेल्या काही दिवसांपासून अर्जुन आणि मलायका अरोरा यांच्या घटस्फोटाच्या चर्चा होत्या. त्या चर्चांना आता पूर्णविराम मिळाल आहे. दिवाळीदरम्यान आयोजित एका कार्यक्रमात अर्जुन जेव्हा मंचावर बोलायला उभा राहिला, तेव्हा प्रेक्षकांमधून मलायकाच्या नावाचा उल्लेख झाला. हे ऐकून अर्जुनने स्पष्ट केलं की, “मी आता सिंगल आहे.” अर्जुनच्या या जाहीर कबुलीनंतर आता मलायकाने सोशल मीडियावर लिहिलेल्या पोस्टने नेटकऱ्यांचं लक्ष वेधलं आहे. मलायकाने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये ही पोस्ट शेअर केली आहे.

”नो’व्हेंबर.. तुमची ऊर्जा कमी करणाऱ्या लोकांना, ठिकाणांना आणि गोष्टींना नाही म्हणण्याची वेळ आली आहे,’ अशा आशयाची ही पोस्ट आहे. अर्जुन आणि मलायका ही बॉलिवूड इंडस्ट्रीतील सर्वांत चर्चेत असलेल्या जोड्यांपैकी एक आहे. गेल्या सहा वर्षांपासून हे दोघं एकमेकांना डेट करत होते. मात्र गेल्या काही महिन्यांपासून त्यांच्या ब्रेकअपच्या चर्चा रंगल्या आहेत. ब्रेकअपच्या चर्चांच्या पार्श्वभूमीवर अनेकदा अर्जुन आणि मलायका हे सोशल मीडियावर अप्रत्यक्षपणे पोस्ट लिहित होते. मात्र दिवाळीत पहिल्यांदाच अर्जुनने त्याच्या रिलेशनशिप स्टेटसचा खुलासा केला. अर्जुन मुंबईतील एका दिवाळी पार्टीत पोहोचला होता. राज ठाकरे यांनी आयोजित केलेल्या या दिवाळी पार्टीत तो ‘सिंघम अगेन’मधील अजय देवगण, टायगर श्रॉफ, दिग्दर्शक रोहित शेट्टी यांसारख्या कलाकारांसोबत पोहोचला होता. यावेळी गर्दीतून चाहत्यांनी जेव्हा मलायकाचं नाव घेतलं, तेव्हा अर्जुनने ‘मी सिंगल आहे’ असं स्पष्ट केलं होतं.

मलायका अरोराची पोस्ट-

हे सुद्धा वाचा

अरबाज खानला घटस्फोट दिल्यानंतर 2018 पासून मलायका अर्जुनला डेट करू लागली. या दोघांना अनेकदा एकमेकांसोबत पाहिलं गेलं. वयातील अंतरावरून दोघांना अनेकदा ट्रोलिंगचाही सामना करावा लागला होता. मात्र या ट्रोलिंगलाही न जुमानता त्यांनी एकमेकांवर प्रेमाचा वर्षाव केला. ब्रेकअपच्या चर्चांदरम्यानही अर्जुनने मलायकाच्या आयुष्यातील अत्यंत कठीण परिस्थितीत तिची साथ दिली. सप्टेंबर महिन्यात मलायकाच्या वडिलांनी आत्महत्या केली होती. त्यावेळी मलायकाचं सांत्वन करण्यासाठी अर्जुन पोहोचला होता.

'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?.
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्...
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्....
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?.
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र.
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला.
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद.
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?.
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच.
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली.