अर्जुन कपूरने दिली सिंगल असल्याची कबुली, मलायका क्रिप्टीक पोस्ट करत म्हणाली…

Malaika Arora - Arjun Kapoor: अनेक वर्ष डेट केल्यानंतर मलायका - अर्जुन यांचं ब्रेकअप, अभिनेत्याने सर्वांसमोर दिली सिंगल असल्याची कबुली, मलायकाने देखील व्यक्त केल्या मनातील भावना, सध्या दोघांच्या खासगी आयुष्याच्या चर्चांना उधाण...

अर्जुन कपूरने दिली सिंगल असल्याची कबुली, मलायका क्रिप्टीक पोस्ट करत म्हणाली...
Follow us
| Updated on: Oct 31, 2024 | 9:45 AM

अभिनेत्री मलायका अरोरा तिच्या खासगी आयुष्यामुळे अनेकदा चर्चेत येते. गेल्या काही दिवसांपासून मलायका अभिनेता अर्जुन कपूर याच्यासोबत असलेल्या नात्यामुळे चर्चेत आहे. नेहमी एकमेकांसोबत दिसणारे अर्जुन आणि मलायका एका कार्यक्रमात समोर येऊनही एकमेकांना टाळताना दिसतात. एवढंच नाही तर, नुकताच झालेल्या एका कार्यक्रमात अर्जुन यांने आता सिंगल असल्याची कबुली दिली. ज्यामुळे मलायका आणि अर्जुन यांचं ब्रेकअप झालं… यावर शिक्कामोर्तब झाला आहे.

अर्जुन कपूर याने सिंगल असल्याची कबुली दिल्यानंतर मलायका अरोरा हिने देखील सोशल मीडियावर क्रिप्टिक पोस्ट करत भावना व्यक्त केल्या आहेत. अभिनेत्रीने इन्स्टाग्राम स्टोरीवर एक कोट शेअर केला आहे. ‘जर कोणी एका सेकंदासाठी जरी कोणाच्या हृदयाला स्पर्श करतो तर संपूर्ण आयुष्य त्याच्या आत्म्याला स्पर्श करतो…’ असा कोट अभिनेत्रीने शेअर केला आहे.

याआधी देखील मलायका हिने खासगी आयुष्यावर वक्तव्य केलं होतं. आयुष्यातील कठीण प्रसंगात मानसिक शांती आणि संयम राखण्या माझे कुटुंबीय, मित्रमैत्रिणी आणि कामसुद्धा महत्त्वाची भूमिका बजावतात. मी खंबीर राहावी यासाठी माझ्या आजूबाजूची लोकं मला खूप मदत करतात. माझ्या मैत्रिणींशिवाय मी काहीच नाही. ते माझी काळजी घेतात, मला पाठिंबा देतात, प्रेरणा देतात. ते माझ्यासाठी सर्वस्व आहेत”, अशा शब्दांत मलायका व्यक्त झाली.

माझ्या वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्यात मी घेतलेल्या प्रत्येक निर्णयाने मला घडवलं आहे…. असं देखील मलायका म्हणाली होती. सांगायचं झालं तर, मलायका तिच्या प्रोफेशनल आयुष्यामुळे कमी खासगी आयुष्यामुळे अधिक चर्चेत असते. सोशल मीडियावर देखील अभिनेत्रीच्या खासगी आयुष्याच्या चर्चा रंगलेल्या असतात.

मलायका अरोरा हिचं खासगी आयुष्य

अभिनेता अरबाज खान याला घटस्फोट दिल्यानंतर मलायकाने नव्या आयुष्याला सुरुवात केली. 2017 मध्ये अरबाज आणि मलायका यांनी घटस्फोटाची घोषणा केली. घटस्फोटानंतर मलायका आणि अर्जुन हे 2018 मध्ये एकमेकांना डेट करू लागले. त्यानंतर 2019 मध्ये त्यांनी सोशल मीडियावर त्यांच्या नात्याची जाहीर कबुली दिली होती. गेल्या काही दिवसांपासून या दोघांच्या नात्यात दुरावा निर्माण झाल्याची जोरदार चर्चा आहे.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.