Malaika Arora | ‘तिला कशी वागणूक देताय…’, मलायका अरोरा हिच्या लक्षवेधी पोस्टमुळे ब्रेकअपच्या चर्चांना उधाण

Malaika Arora | बॉयफ्रेंडकडून मिळत असलेल्या वागणुकीबद्दल मलायका हिची लक्षवेधी पोस्ट! ब्रेकअपच्या चर्चांना उधाण... सध्या सर्वत्र मलायका - अर्जुन यांच्या नात्याची चर्चा...

Malaika Arora | 'तिला कशी वागणूक देताय...', मलायका अरोरा हिच्या लक्षवेधी पोस्टमुळे ब्रेकअपच्या चर्चांना उधाण
Follow us
| Updated on: Sep 05, 2023 | 2:47 PM

मुंबई : 5 सप्टेंबर 2023 | अभिनेत्री मलायका अरोरा सध्या तिच्या प्रोफेशनल आयुष्यामुळे नाही तर, खासगी आयुष्यामुळे तुफान चर्चेत आली आहे. अभिनेता अरबाज खान याला घटस्फोट दिल्यानंतर, मलायका हिच्या आयुष्यात अभिनेता अर्जुन कपूर याची एन्ट्री झाली. अनेक वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर आता मलायका आणि अर्जुन यांच्या ब्रेकअपच्या चर्चांनी जोर धरला आहे. सध्या सर्वत्र फक्त फक्त अर्जुन कपूर आणि मलायका अरोरा यांच्या नात्याची चर्चा रंगत आहे. दोघांचं नातं वादाच्या भोवऱ्यात असताना, मलायका हिच्या पोस्टने सर्वांचं लक्ष वेधलं आहे. आता अभिनेत्रीने पोस्टमध्ये महिलांना कशाप्रकारे वागणूक द्यायला हवी याबद्दल मोठा खुलासा केला आहे. ज्यामुळे सर्वत्र चर्चांना उधाण आलं आहे.

मलायका अरोरा सोशल मीडियावर पोस्ट करत म्हणाली, ‘तिची वागणूक जर तुम्हाला आवडत नसेल तर, तुम्ही तिला कशी वागणूक दिली आहे…हे एकदा तुम्ही पाहिलं पाहिजे..’ एवढंच नाही तर, अभिनेत्रीने एक गुड मॉर्निंग कोट देखील सोशल मीडियावर शेअर केला. ‘भविष्याचा विचार आणि काळजी करण्यापेक्षा, सध्या काय घडत आहे याकडे लक्ष दिलं पाहिजे…’ सध्या सर्वत्र मलायका हिच्या पोस्टची चर्चा रंगत आहे.

जेव्हा मलायका अरोरा आणि अर्जुन कपूरच्या ब्रेकअपच्या चर्चा रंगू लागल्या तेव्हा लोकांच्या लक्षात आलं की, अभिनेत्री अर्जुन कपूरच्या कोणत्याही पोस्टवर कमेंट करत नाही. एक काळ असा होता की, जेव्हा मलायका अरोरा आणि अर्जुन कपूर कायम चाहत्यांना कपल गोल्स देत होते.

मलायका आणि अर्जुन यांच्या ब्रेकअपच्या चर्चा रंगू लागल्यानंतर अभिनेत्याचं नाव कुशा कपिला हिच्यासोबत रंगू लागलं. दोघांना दिग्दर्शक करण जोहर याच्या घरी देखील एकत्र स्पॉट करण्यात आलं. करण जोहरच्या घरी झालेल्या पार्टीतील दोघांचा ग्रुप फोटो व्हायरल झाल्यानंतर दोघांच्या नात्याची चर्चा रंगू लागली. पण कुशाने सर्व चर्चा फक्त अफवा असल्याचं सांगितलं आहे.

कपूर कुटुंबाला मलायका हिने केलं अनफॉलो

रिपोर्टनुसार, मलायका हिने कपूर कुटुंबाला इन्स्टाग्रामवरुन अनफॉलो केलं आहे. मलायका हिने बोनी कपूर, अनिल कपूर, अंशुला कपूर, जाह्नवी कपूर आणि खुशी कपूर अनफॉलो केलं आहे. सध्या सर्वत्र मलायका आणि अर्जुन यांच्या ब्रेकअपच्याच चर्चा रंगत आहेत.

'बहुमत मिळाल्यानं गांगरून गेलेत', मनसे नेत्याची महायुतीवर सडकून टीका
'बहुमत मिळाल्यानं गांगरून गेलेत', मनसे नेत्याची महायुतीवर सडकून टीका.
...म्हणून भूजबळांना महायुतीच्या मंत्रिमंडळातून डावललं, कारणं आली समोर
...म्हणून भूजबळांना महायुतीच्या मंत्रिमंडळातून डावललं, कारणं आली समोर.
बोट अपघात 13 मृत्यू, मृतांच्या नातेवाईकांना सरकारकडून किती लाखांची मदत
बोट अपघात 13 मृत्यू, मृतांच्या नातेवाईकांना सरकारकडून किती लाखांची मदत.
'महिलांना 2100 रू. कधी देणार? लाडक्या बहिणी वाट बघताय, आता...'
'महिलांना 2100 रू. कधी देणार? लाडक्या बहिणी वाट बघताय, आता...'.
एलिफंटाला जाणारी बोट उलटली, समुद्रात काय झालं? अपघात नेमका कसा झाला?
एलिफंटाला जाणारी बोट उलटली, समुद्रात काय झालं? अपघात नेमका कसा झाला?.
आंबेडकरांबाबतच्या वक्तव्यावरून शाहांची कोंडी, अडकले वादाच्या भोवऱ्यात
आंबेडकरांबाबतच्या वक्तव्यावरून शाहांची कोंडी, अडकले वादाच्या भोवऱ्यात.
'फडणवीस तुम्हाला सरपंचाच्या...',देशमुखांच्या हत्येचे पडसाद विधानसभेत
'फडणवीस तुम्हाला सरपंचाच्या...',देशमुखांच्या हत्येचे पडसाद विधानसभेत.
गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्...
गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्....
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर.
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा.