Arbaaz Khan याचा निकाह, मलायका अरोरा खास फोटो पोस्ट करत म्हणाली…

Malaika Arora : सलमान खान याने मलायका अरोरा हिला पाठवली खास भेट, पहिल्या पतीने दुसरा संसार थाटल्यानंतर अभिनेत्री खास फोटो पोस्ट करत म्हणाली..., सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त मलायका अरोरा हिच्या पोस्टची चर्चा...

Arbaaz Khan याचा निकाह, मलायका अरोरा खास फोटो पोस्ट करत म्हणाली...
Follow us
| Updated on: Dec 25, 2023 | 9:27 AM

मुंबई | 25 डिसेंबर 2023 : अभिनेत्री मलायका अरोरा सध्या बॉलिवूडपासून दूर असली तरी अभिनेत्री सोशल मीडियावर आणि छोट्या पडद्यावर सक्रिय आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून अभिनेत्री कायम चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असते. आता देखील मलायका हिने इन्स्टाग्राम स्टोरीवर काही फोटो पोस्ट केले आहेत. एवढंच नाही तर, अभिनेता सलमान खान याने देखील मलायका हिला खास गिफ्ट पाठवलं आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त मलायका अरोरा हिच्या सोशल मीडिया पोस्टची चर्चा रंगली आहे.

फोटोमध्ये मलायका हिने ऑफ शोल्डर ड्रेसमध्ये काही फोटो पोस्ट केले आहेत. सध्या सर्वत्र मलायका हिचे फोटो तुफान व्हायरल होत आहेत. इन्स्टाग्राम स्टोरीवर फोटो पोस्ट करत अभिनेत्रीने कॅप्शनमध्ये तिच्या फॅशन संबंधीत लिहिलं आहे. वयाच्या 50 व्या वर्षी देखील मलायका अरोरा हिच्या फॅशन सेन्सची चर्चा होत असते.

हे सुद्धा वाचा

सांगायचं झालं तर, मलायका हिने ख्रिसमस पार्टीसाठी खाल लूक केला होता. मलायका कायम वेगवेगळ्या लूकमध्ये फोटो पोस्ट करत असते. आता देखील अभिनेत्री चाहत्यांना ख्रिसमस पार्टीसाठी लूट सेट करुन दिला आहे. एवढंच नाही तर, सलमान खान याच्या बिंग ह्यूमन ब्रॉन्डकडून मलायका हिला ख्रिसमस गिफ्ट देखील मिळालं आहे. याचा खुलासा खुद्द अभिनेत्रीने सोशल मीडियाच्या माध्यमातून केला आहे.

सध्या सोशल मीडियावर फक्त आणि फक्त मलायका अरोरा हिच्या पोस्टची चर्चा रंगली आहे. अभिनेता अरबाज खान आणि पहिल्या पतीच्या दुसऱ्या निकाह दरम्यान, मलायका हिने काही फोटो पोस्ट केले आहेत. म्हणून मलायका चर्चेत आली आहे.

अरबाज खान याने 41 वर्षीय शूरा खान हिच्यासोबत नव्या आयुष्याला सुरुवात केली आहे. 24 डिसेंबर रोजी अरबाज खान आणि शूरा खान यांनी मित्र आणि कुटुंबियांच्या उपस्थितीत लग्न केलं. अरबाज याच्या दुसऱ्या निकाहसाठी अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती. अरबाज खान आणि शूरा खान यांच्या निकाहचे फोटो सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.

मलायका अरोरा – अरबाज खान

मलायका अरोरा आणि अरबाज खान यांनी 1998 मध्ये लग्न केलं होतं. दोघांच्या लग्नाच्या चर्चा देखील सर्वत्र तुफान रंगल्या होत्या. पण लग्नाच्या 18 वर्षांनंतर अरबाज – मलायका यांच्या घटस्फोटाने चाहत्यांना धक्का बसला. दोघांना एक 21 वर्षांचा मुलगा देखील आहे.

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.